|
Dineshvs
| |
| Wednesday, January 04, 2006 - 3:28 pm: |
|
|
सोपा चॉकलेट केक १२५ ग्रॅम बटर, २५० ग्रॅम साखर आणि एक चमचा व्हॅनिला ईसेन्स एक बोलमधे घेऊन व्हिस्क करा. मिश्रण मुलायम झाले पाहिजे. दोन अंडी थोडीशी फ़ेटुन हळु हळु या मिश्रणात घाला. घालताना सतत फ़ेटत रहा. केकमधे घालायची अंडी नेहमीच रुम टेंपरेचरला असावीत. १५५ ग्रॅम किंवा सव्वा कप ऑल पर्पज फ़्लोअर, ४५ ग्रॅम किंवा अर्धा कप कोको, दीड टिस्पुन बेकिंग पावडर आणि एक टिस्पुन सोडा हे सगळे एकत्र दोनतीनदा चाळुन घ्या. चाळतेवेळी चाळण जरा ऊंचावर धरावी म्हणजे घटक नीट मिसळले जातात. हे पीठ आणि २५० एम एल म्हणजेच १ कप दुध, आलटुन पालटुन अंड्याच्या मिश्रणात मिसळा. कट आणि फ़ोल्ड पद्धतीने हे मिसळुन घ्या. गोल भांड्याच्या मधोमध कापल्यासारखे करुन, अर्धा भाग ऊरलेल्या अर्ध्या भागावर घाला, मग भांडे काटकोनात फ़िरवा, व परत असे करा. ७ ईंचाच्या चौकोनी टिनला बटर लावुन ग्रीजप्रुफ पेपर लावुन घ्या. त्यात हे मिश्रण घालुन, १८० से तपमानावर साधारण ४० मिनिटे बेक करा. मधे टोचलेली काडी स्वच्छ बाहेर यायला हवी. टिनमधेच ५ मिनिटे ठेवुन वायर रॅकवर थंड करा. आयसिंगसाठी १२५ ग्रॅम डार्क चॉकलेट ६० ग्रॅम बटर आणि पाव कप डबल क्रीम, गरम पाण्यात दुसरे भांडे ठेवुन सतत ढवळत घट्ट करुन घ्या. तेहि किंचीत थंड करुन केकवर ओता. व्हॅनिला आईसक्रिम बरोबर खा. प्रमाण नीट पाळले तर हा केक सहसा बिघडत नाही. अगदी पदार्थ बिघडवण्यात माहिर असलेल्या लोकानी केला तरी.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|