|
Dineshvs
| |
| Thursday, December 29, 2005 - 5:46 pm: |
|
|
हा पदार्थ खास मूडिसाठी, याचे नाव STOLLEN यासाठी तीन कप मैदा घेऊन त्यात १ कप आयसींग शुगर मिसळावी, त्यात एक कप कोमट दुध, तीन चहाचे चमचे यीस्ट, एक अंडे, चार मोठे चमचे पातळ केलेले बटर, चिमुटभर दालचिनी पुड, एका लिंबाची किसुन घेतलेली फ़क्त पिवळी साल, पाकवलेली संत्र्याची साल एक कप, एक कप किसमिस हे सगळे घालावे. चालत असेल तर दहा चहाचे चमचे रम घालावी. हे सगळे नीट मळुन रात्रभर झाकुन ठेवावे. ओव्हन 350 F किंवा 180 C वर तापवुन ठेवावा. हे पीठ फ़ुगलेले असेल ते परत मळुन ग्यावे. एका लोफ़ टिनला बटर लावुन मधे ते घालावे. वरुन एक चमचा दुध लावावे व ४५ मिनिटे बेक करावे. वरुन सोनेरी तपकिरी रंग आला पाहिजे. झाल्यावर थोडेसे थंड करुन म्हणजे कोमट असतानाच वरुन आठ चमचे पातळ केलेले बटर लावावे. हे आत मुरत जाते. वरुन चाळणीने आयसींग शुगरचा थर द्यावा. हा प्रकार खुप आधी करुन ठेवायचा असतो. आठवडाभराने त्याला छान चव येते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|