|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:43 pm: |
| 
|
डाळ्याचे लाडू हे लाडू कमी तुपात होतात अन अगदी पटकन होतात. आम्ही नेहेमीच करतो, कारण साहित्य उपलब्ध असतेच. साहित्य : चिवड्यासाठी असतात त्या पंढरपुरी डाळ्या अर्धा किलो, पावशेर पिठीसाखर, बेदाणे अन वेलदोडा पूड, बदाम, काजू काप. कृती : या डाळ्या थोड्याश्या कोरड्याच गरम करुन घ्याव्यात. म्हणजे कुरकुरीत होतात. मग त्यांचे मिक्सरमधुन बारीक पीठ करावे. एका परातीत किंवा मोठ्या ट्रे मध्ये हे पीठ आणि पिठीसाखर नीट एकत्र करावी. त्यात बेदाणे, वेलदोडा पूड, बदाम काजू काप घालावेत अन मग अर्धा ते १ कप साजूक तूप त्या मिश्रणात लागेल तसे घालुन पीठ नीट एकजीव करावे. तूप गरम किंवा पातळ करु नये. लाडू मात्र वळता आले पाहीजे.( वळता येतातच फक्त तुपाचा अंदाज आला पाहीजे तरी जास्त लागत नाही). झटपट तयार होतात.
|
Ami79
| |
| Friday, June 27, 2008 - 4:20 am: |
| 
|
अशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू सुद्धा करता येतील ना?
|
Dineshvs
| |
| Friday, June 27, 2008 - 7:23 am: |
| 
|
मूडीच्या वतीने लिहितो, दाण्याचे लाडूही करता येतील. पण या कृतीने डाळ्याचे लाडू फ़ार झटपट होतात. डाळ्याचे पिठ मुलायम व कोरडे असते, दाण्याचे पिठ जरा तेलकट होते.
|
Ami79
| |
| Tuesday, July 01, 2008 - 4:32 am: |
| 
|
दाण्याचे लाडू करण्याची पद्धत काय आहे, सांगाल का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 01, 2008 - 12:01 pm: |
| 
|
दाण्याचे लाडू करताना, जरा जाडसरच कूट करावे, म्हणजे तेल बाहेर येत नाही. मग त्यात गूळ व तूप घालून लाडू करता येतात. नुसत्या दाण्याचे लाडू तितकेसे चांगले लागत नाहीत. त्यात भाजलेली कणीक वगैरे घातली तर चांगली चव येते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|