|
Moodi
| |
| Thursday, August 31, 2006 - 4:06 pm: |
| 
|
अगं राघवदास ना ही बघ माझ्याकडे लिहीलेली आहे ही कृती, जुन्या सकाळमध्ये आली होती. साहित्य : २ वाटी हरबरा( चणा डाळ) पावणे दोन वाट्या साखर, पाऊण वाटी सायीसकट दूध, काजू बदाम काप,बेदाणे, वेलदोडापूड, अर्धी वाटी तूप. कृती : हरबर्याची डाळ भिजत घालायची नंतर तीन तासांनी उपसुन चाळणीवर निथळावी. मग पुरणयंत्रातुन काढायची म्हणजे जाड रवाळ पीठ पडेल. मिक्सरवर काढली तरी रवाळच काढावी. जाड बुडाच्या कढईत अर्धे तूप घालुन डाळ परतत रहावी. रंग बदलु न देता कोरडी करत भाजायची. उरलेले तूप मधून मधून घालत मग खरपुस भाजावी. गॅस सुरुवातीला मोठा ठेवून मग दोन मिनीटांनी मंद करावा. डाळ चांगली भाजावी. मग साखरेचा एकतारी पाक करुन त्यात ही भाजलेली रवाळ डाळ तासभर मुरु द्यावी. मग लाडू वळतांना त्यात काजू बदाम काप आणि बेदाणे घालावे. प्रश्न हाच की आपल्या कडे दूधाला साय येत नाही त्याचे काय करावे? सकाळमधून साभार. 
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|