|
Moodi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 1:56 pm: |
| 
|
खजूर पनीर लाडु साहित्य : दिड कप किसलेले पनीर, अर्धा कप पिठीसाखर, ३ चमचे क्रीम, खजुर वाटीभर, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, अर्धा चमचा वेलदोडा पावडर. कृती : खजूर चिरावा अन मिक्सरमधुन बारीक करावा. एका pan मध्ये क्रीम घालून खजुराचा लगदा, खोबरे अन पनीर हे सर्व घालुन नीट परतुन घ्यावे. उतरवुन कोमट झाले की त्यात पिठीसाखर अन वेलदोडा पुड घालुन लाडु वळावे. अन थोड्या खोबर्याच्या किसात घोळवुन घ्यावे.
|
मूडी! वर दिलेल्या खजुर लाडुत मिश्रण किति वेळ परतायचे?
|
प्राजक्ता, मी मूडीच्या कृतीनी केलेल्या ह्या खजूर लाडवाचं मिश्रण मंदं आचेवर १० मिनिटं परतलं. ( non-stick pan मधे पनीरचा जरा खमंग वास येईपर्यंत.) २ दिवसांपूर्वीच केले हे लाडु. मूडी thank you for the recipe ! छान झाले आहेत. फ़्रिज मधे ठेवले तर साधारण किती दिवस टिकतात? by the way, मी शेवटी घोळण्यासाठी ठेवलेला नारळचा चुरा देखिल तव्यावर गुलाबी भाजला. चांगला लागतोय.
|
Jadoo
| |
| Monday, December 10, 2007 - 5:13 pm: |
| 
|
खजुर लाडु खजुर १ कप बिया काढुन dry fruits पिस्ता बदाम काजु आवडीप्रमाणे तुप १ tbl sp क्रुति खजुर एकदम बारिक चिरुन घ्या dry fruits ची जाड्सर पुड करुन घ्या. or अर्धवट कुटुन घेतले तरी चालतिल non stick pan मधे तुप टाकुन खजुर ४-५ मिनिटे मंद आचेवर परतवा. त्यातच dry fruit चि पुड टाकुन नीट एकत्र करुन घ्या. ताटाला थोडा तुपचा हात लावुन ह्या सगळ्या मिश्रणाच roll करुन घ्या. हा roll थंड झाल्यावर त्याच्या वड्या (चकत्या) कापा. Roll न करता नुसत्या वड्या सुद्धा थापु शकतो किंवा लाडु सुद्धा करता येतिल. roll करुन चकत्या कापल्याने flat surface वर dry fruits छान दिसतात. थंडि चे खायला चांगले आहेत आणि होतात सुद्धा २० मिनिटात. तुप हि कमी त्यामुळे एकदम हलके वाटतात खाताना.खजुर गोड असल्यामुळे साखरेचि गरज पडत नाहि.
|
मागे एकांकडे दाणे-ख़जूर लाडू ख़ाल्ले होते. खूप छान लागले. ज्यांचाकडे खाल्ले ते मूव्ह झाले ईथून. कोणाला येतात का? प्लिज रेसिपी द्या.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|