|
Dineshvs
| |
| Tuesday, December 07, 2004 - 4:40 pm: |
|
|
मेथीच्या लाडवात फ़ार सुकामेवा घालायचे गरज नसते. सुकामेवा डिंकाच्या लाडवात घालतात. अर्थात त्या लाडवात मेथीही घालतात. तरीपण मेथ्याच्या लाडवांची एक कृति. पाव वाटी मेथ्या थोड्याश्या तुपात बदामी रंगावर भाजाव्यात. व त्यातच दोन वाट्या कणीक खमंग भाजुन घ्यावी. हे मिश्रण मिक्सरमधुन फ़िरवुन घ्यावे. म्हणजे आपसुक मेथ्यांचे पीठ होते. या मिश्रणात पाव वाटी खसखस, पाव वाटी तीळ, पाव वाटी खोबर्याचा किस हे सगळे भाजुन बारीक करुन घालावे. दोन चमचे अळीव भाजुन घालावेत. उपलब्ध असल्यास पाव वाटी डिंक तुपात फ़ुलवुन घालावा (हवाच असे नाही, त्याच्या जागी थोडे भाजके पोहे तळुन चुरडुन घेतले तरी चालतील.) अर्धी वाटी खारकेचा चुरा घालावा. अर्धे जायफ़ळ किसुन घालावे. हे सर्व मिश्रण परत किंचीत गरम करुन घ्यावे. आवडीप्रमाणे अर्धा ते पाऊण किलो गुळ बारिक चिरुन घ्यावा व हे मिश्रण गरम असतानाच त्यात तो मिसळावा. वळायला लागेल तसे तुप घालुन लाडु वळावेत. सुका मेवा हवाच असे नाही. घातला तरी चालेल. मेथीचे पीठ वापरण्यापेक्षा मेथी अशी भाजुन घेणे सोयीचे पडते, कारण मेथीचे पीठ सहजासहजी मिळत नाही.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|