|
Nalini
| |
| Wednesday, October 11, 2006 - 2:20 pm: |
| 
|
वजन कमी करायचेय परंतु डायट न करता.. मग हे करुन पहा. टिप: पोट अगदी साफ हवे, अपचन असेल तर वजन उशीरा कमी होते. १) सकाळी उठल्यावर थोडा योगा(रामदेवबाबांचा येत असेल तर उत्तम)१ तास करणे. २) योगा नंतर १ ग्लास गरम पाणी लिम्बाचा रस घालून पिणे. याने पोट साफ होण्यास मदत होते. ३) सकाळच्या breakfast मध्ये oatmeal, cereal किंवा १-२ bread slice skim milk बरोबर घेणे. खात असाल तर उकडलेले अंडे पण चालेल. (skim milk ने लवकर वजन कमी होते) ४) १०.०० १०:३० वाजता एखादे फळ खावे. (शक्यतो सफरचंद) ५) १.००-१:३० वाजता दुपारचे जेवण. Lunch heavy चालेल, २ पोळ्या, भाजी, वरण भात किंवा जे हवे ते. बर्याचदा लोक lunch light घेतात आणि dinner heavy करतात, ते चुक आहे. ६) दुपारी चहा बरोबर biscuits किंवा light snack खाणे. ७)रात्री salad अथवा soup , आणि salad मध्ये beans, ricotta cheese, tomatoes, salad leaves etc पोटभर खाणे. ८) protein साठी tofu, beans, lentils खाणे जरुरी आहे. ९) सकाळीदुपारी lunch मध्ये भात आणि बटाटा चालेल, पन ३:०० नंतर मुळीच खाऊ नये. १०) चहात किंवा कशातही साखर घेऊ नये. एखादे फळ खावे. अगदीच जमत नसेल तर साखरेचा intake कमी करावा, साधारण पहिल्यापेक्षा अर्धा. ११) योगा बरोबर संध्याकाळी वेळ मिळेल तसे तास्-अर्धा तास jogging किंवा अगदी fast walking करावे. १२) butter, cakes वजन target इतके होईपर्यंत खाण्याचे टाळावे, नंतर थोडे खाण्यास हरकत नाही, पण ३.०० च्या अधी. महत्वाचे म्हणजे white bread मुळीच खावु नये. Grain bread उत्तम, नहितर brown bread खाणे. वरील सर्व माहिती मला भाग्याने दिलीय. तिचे मनापासुन आभार. तिच्या परवानगीशिवायच मी ही माहीती ईथे लिहित आहे. भाग्या, ह्याचा खरच खूप खूप फायदा होतो. मला योगा येत नाही त्यामुळे मी सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसा अर्धा तास cindy crawford चे exercise workout करते आणि अर्धा तास जोरात चालण्याचा व्यायाम.
|
Zee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 2:55 pm: |
| 
|
नलिनी, रामदेव बाबांचा योगा म्हणजे काही खास आसनं आहेत का? भाग्या, तु यात भर घातलीस तर आणखिनच छान होईल.
|
Megha16
| |
| Wednesday, October 11, 2006 - 3:05 pm: |
| 
|
नलीनी खुप छान माहीती दिलीस. कारण माझ्या नवरयाला डायटींग काही जमत नव्हत. हा उपाय त्याच्या साठी योग्य आहे. आता रामदास स्वामी ची योगासन बघायला हवीत.
|
Shmt
| |
| Wednesday, October 11, 2006 - 8:20 pm: |
| 
|
मला पण हवी आहेत रामदेव बाबांचे योगा प्रकार. नलिनि, सांगशिल का कोणती आसन??
|
Prady
| |
| Wednesday, October 11, 2006 - 9:03 pm: |
| 
|
रामदेव बाबा चा प्राणायामा वर जास्त भर असतो. इतरही बरीच आसनं त्यांच्या शिबिरात ते दाखवतात. त्यांच्या सी डी देशात उपलब्ध आहेत. कुणी येणार असेल तर मागवून घ्या.
|
Nalini
| |
| Wednesday, October 18, 2006 - 10:03 am: |
| 
|
zee , shmt , मला योगाबद्दल फारशी माहिती नाही. मी योगाऐवजी अर्धा तास exercise करते. भाग्या, जरा ईकडे चक्कर मारतेस का? अजुन कोणी आहे का ज्यांनी कुठलेच डायट न करता वजन कमी केलेय? आपले अनुभव येथे लिहाल का?
|
Manuswini
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:24 am: |
| 
|
मी diet कधीच करत नाही पण साधारण पथ्य बाळगते. ते असे की अती गोड खात नाही, तेलकट,तुपख़ट खात नाहे. bread,cookies,bhaat तर बिलकुल खात नाही. सारस्वत कोकणी असुन भात नाही हे एक आच्स्याची गोष्ट आहे त्याचे कारण मला कुठलेही मैद्याचे पदर्थ जरा कमि पचतात कचित खाते. वेळी अवेळी जेवणे टाळावे. वजन control करायचे असेल तर ७ नंतर काहीही आहार घेवु नये. भरपुर फळे दिवसभरात खावी. fish खुप खावे, mutton,chicken avoid करावे जर वजन कमी करायचे असेल तर veggeie protiens वर भर द्यावा. कडध्याने दुपारी खावी रात्री साधा आहार घ्यावा. भात वगैरे टाळावा रात्रिचा. मी गेली कित्येक वर्षे हेच करत आहे. सकाळी ७ ते ९ मध्ये ओटमील मिश्र फळे, cinnamon powder, strawberry खावून पहा, वजन कमी रहाते साधारण सकाळी १० वाजता एक सफ़रचंद खावे, जेवण कमी जाते. ३ ते ४ मध्ये वाजता मुग sprouts, brokkoli खावी. नाहीतर बदाम,अक्रोड खावे. ६ वाजता एक केळ खावे नी workout करावा ७ ते ८ नी जेवण maximum ८ ते ८:३० नंतर काहीच खावू नये. खुप फरक पडतो. मासे नेहमी grilled, pan fried असे खाते. indian hotels मधील खाणे us मध्ये टाळावे. काहीच्या काय heavy असते ते. मह्ये travelling करताना एकच indian hotel जवळ होते चक्क एका आठवड्यात बरिच्शी अधोगती झाली माझी helath बाबतीत. आधीच तेलकट खायची सवय नसल्याने ते heavy food ने नेहमी Acidity
|
Bhagya
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:05 am: |
| 
|
नलू सॉरी ग, उशीरा आले. पण हो मंडळी, मला स्वत्:ला या प्रकाराचा खूप फ़ायदा झाला. मी ६७ किलो वरून ५५ किलो वर आले. नलिनिने सगळं व्यवस्थीत लिहिलय. पण रामदेवबाबाची सी डी कोणी भारतातुन येणार असल्यास जरुर मागवावी. त्यांचे प्राणायाम, पोट, मांड्या ई. कमी कमी करण्याचे व्यायाम खरेच छान आणि सोपे आहेत. हे व्यायाम मला इथे सांगता येणार नाहीत कारण त्याला प्रात्यक्षिक लागते. सी डी त हे सगळे करुन दाखवले आहेत त्यांनी. शिवाय कोणाला काही विकार असतील तर काय काळजी घ्यावी, ते पण सांगितले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, at the end of the day calories burnt should be more than the calories consumed. तरच वजन कमी होते. आणि शक्यतोवर तेलकट, तुपकट पदार्थ खाऊ नयेत किंवा कमी खावे. फ़ळांमध्ये द्राक्षे, आंबा टाळा. गाजरे, बीट यात साखर फ़ार असेल तर कमी खा. ही मला नवीन मिळालेली माहीती. सगळ्यांना शुभ दिपावली.
|
Manuswini
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:44 am: |
| 
|
हे सुद्धा करून पहा जर वजन कमी करायचे असेल नी malnutrition avoid करायचे असेल तर १) नेहमी एक तरी sprouts खा लिंबू पिळून दुपारला किंवा भाजी त्याची. मुग, राजम, चवळी (हो, चवळीला sprouts आणले तर पचायला हलकी), २) दही( 2%fat or fatfree ) ३)चपाती आणी भात complete avoid करणे आता तुम्ही म्हणाल भाजी कशाबरोबर खाअची. बाजरी नी ज्वारी ह्यात carbs कमी असतात चपातिच्या मानाने. takes lot of time to digest so u feel full .. sugar does not shoot up ... fat वाढायचे कारण शरिरातील साखरेचे नीट पचन न होणे वा उशीरा होवून किंवा fat मध्ये साठवणे. ४) वर भाग्या म्हटल्याप्रमाणे फळे ही citrus गटातील नी गोल किंवा pear shape मधील खावी. ५) during weight reduction, watch your vitamins, take atleast super B complex, slow release iron(this is for ladies who tend to have low iron,specially indian ladies ), दह्यात Calcium मिळेलच once in a while hog your fav cookies or cake if you like ,too mcuh deprival causes depression. apple, oranges,pear,all kinds of berries वगैरे.
|
Prajaktad
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:25 pm: |
| 
|
भाग्या ! रामदेवबाबाच्या cd वरिल टायटल सांगु शकशिल का?कुठेही मिळु शकेल का? मनुने,नलुने छान info दिलिय.
|
Uno
| |
| Thursday, October 19, 2006 - 5:15 pm: |
| 
|
Prajaktad, google video madhe yoga ramdev search kar. 2 parts (2 cds) aahet online for free.
|
Prajaktad
| |
| Thursday, October 19, 2006 - 6:21 pm: |
| 
|
uno thanks! karate aata search..
|
Maku
| |
| Wednesday, December 27, 2006 - 4:00 am: |
| 
|
मला आजुन एक विचारयचे आहे कि मी रोज सकाळी फ़ळे खाते. अनी १ नारळचे पानी पिते. दुपारी रोजचे ज़ेवण करते (२ पोळी,भाजी,दही,भात,वरण) आनी दुपारी 1 वाटी मोड आलेली कडधान्ये लिन्बु पिलुन खाते. रात्रि सुप अनी सलाद ऊकड्लेला मासा घेते. रोज १० गास्ल पानी पिते. मला एक सान्गा की माज़ा आहार बरोबर आहे का.
|
Robeenhood
| |
| Wednesday, December 27, 2006 - 4:05 pm: |
| 
|
zee , shmt , मला योगाबद्दल फारशी माहिती नाही. मी योगाऐवजी अर्धा तास exercise करते. भाग्या, जरा ईकडे चक्कर मारतेस का? अजुन कोणी आहे का ज्यांनी कुठलेच डायट न करता वजन कमी केलेय? आपले अनुभव येथे लिहाल का? >>> नलिनी बर्याच अशास्त्रिय पद्धतीचा वापर करतेस असे दिसते.वजन कमी करणे महत्वाचे तर आहेच पण कमी झालेले वजन मेनटेन करणे अधिक महत्वाचे आहे... people dig their grave by their TEETH हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे...
|
Maku
| |
| Monday, February 12, 2007 - 5:08 am: |
| 
|
मी विचारले पण कोनिच ans देत नाही. मी एकदा bee ला पण yoga चे विचारले होते पण त्याने सुद्धा ans दिले नाही. i think नवीन लोकांना तुम्ही ans देत नाही . मला खरेच वाईट वाट्ते सान्गायला maayboli site चांगली नहीये.
|
Zakki
| |
| Monday, February 12, 2007 - 12:34 pm: |
| 
|
खरे तर या विषयातील माझे ज्ञान फार थोडे, पण कुणीच तुम्हाला उत्तर देत नाही म्हणून मी लिहीले. शिवाय मी लिहीले की अनेक लोक मी किती वेडा आहे ते लिहायला येतात. मग त्यातले काही सज्जन तुम्हाला सल्ला देतील. खरे तर चरबी, साखर, कॅलरी जास्त असलेले अन्न शक्यतो जास्त खाऊ नये. भाज्या फळे भरपूर खावीत. अति तेलकट, तळलेले पदार्थ कमी खावे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अथवा पोट तुडुंब भरण्यासाठी न खाता शरीराला ज्याची खरी गरज आहे ते खावे. थोडे थोडे खावे. दारू प्यायली नाही तरी चालेल. सिगारेट, तंबाखू मात्र वर्ज्य करावी! की झाला डायेट! ते काही कठिण नाही. पण व्यायाम हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे. सूर्यनमस्कार यास सर्वांगसुंदर व्यायाम म्हणतात. अनेक सूर्यनमस्कार सकाळी उठून घातले की अन्नातील सर्व प्रकार पचतात. साखर, चरबी पचून जाते, कॅलरिज जळून जातात! हे साधे गणित आहे. एका वेळी जमले नाही तर दिवसातून दोनदा किंवा तीनदा, जसे जमेल तसे हा व्यायाम करता येतो.
|
Bee
| |
| Tuesday, February 13, 2007 - 4:47 am: |
| 
|
झक्की, उत्तम माहिती. सुर्यनमस्कार simply great! आहे. पण हा व्यायाम रिकाम्या पोटी करावा लागतो. ह्याची आणखी एक महती म्हणजे बीजाक्षरापासून सुरू झालेली सुर्याची बारा नावे जर प्रत्येक नाव एका सुर्यनमस्कारानंतर घेतले तर अध्यात्मिक शांतता देखील लाभते. खूपच प्रभावी. पण असे आहे ना.. अनुभव घेतल्याशिवाय आपण जीव तोडुन काय सांगतो आहे हे ऐकणार्याला कळत नाही. १२ काय अगदी ४ सुर्यनमस्कारही सुरवातीला जड जातात पण नंतर किमान ६ तरी घालता येतातच. मी ६च घालतो.
|
Zakki
| |
| Tuesday, February 13, 2007 - 10:51 am: |
| 
|
धन्यवाद. मी पण प्रयत्न करतो, पण वयोमानाप्रमाणे आळस येतो, नाहीतर सहा नमस्कार काही कठिण नाहीत.
|
Sunidhee
| |
| Tuesday, February 13, 2007 - 9:50 pm: |
| 
|
आता व्यायामाबद्दल चर्चा चालुच आहे तर.. आसनं शिकु आणि करु, करु म्हणत नुसताच वेळ वाया जात होता म्हणुन हे सुरु केले. मी करायला सर्वात सोपा असा व्यायाम करते. रोज दोरीवरच्या निदान १०० उड्या मारते. बाकी काही करायला झालं नाहीतर हे बरं पडतं. एकदम १०० जमल्या नाहीतर थोड्या-थोड्या वेळानी मारते. आणि बाकी वाचलेली, ऐकलेली माहिती म्हणजे, सकाळी शक्यतो फळे नकोत डायबिटीसवाल्याना.. त्यानी साखर जास्त वाढते. दुपारनंतर खावी. दुपारी प्रथिने जास्त खावीत आणि रात्री कार्बोहायड्रेट्स जास्त खावेत. हे सर्वसाधारण निरनिराळ्या लेखात वाचलेले आहे. असेच का अशी कारणे मला आठवत नाहीत.
|
Dakshina
| |
| Monday, June 02, 2008 - 7:51 am: |
| 
|
खरंतर रोजच्या खाण्यापिण्यात काही सुक्ष्मं बदल केले तर न व्यायाम करताही, हळू हळू वजन कमी होते. पण त्या करिता थोडी Consistancy असणं अत्यंत गरजेचं आहे. १. रोजचा आहार अज्जिबात कमी करायचा नाही. २. नाश्ता, जेवण यांच्या वेळा काटेकोरपणे पाळायच्या. ३. जेवणात दोन पोळ्या (तूप लावून) भाजी भरपूर, या व्यतिरिक्त सॅलड कंपल्सरी हवेच. ४. त्याचबरोबर (म्हणजे दुपारच्या जेवणातच किमान ३०० ml ताक, किंवा कोणतंही सरबत... ५. रात्री नेहमीचंच जेवण पण खुप अगदी तुडूंब नाही... चार घास कमीच, आणि रात्रीचं जेवण झाल्यावर किमान पुढचा अर्धा तास तरी झोपु नये. ६. सर्वात महत्वाचं म्हणजे, दिवसभरात भरपूर पाणी हे प्यायलंच पाहीजे. असं म्हणतात की जर पोटाचे चार भाग केले, तर एक भाग अन्न, एक भाग पाणी, एक भाग फ़ळं आणि उरलेला भाग हवेसाठी मोकळा राहीला पाहीजे. म्हणजे नेहमी एक चतुर्थांश जेवण झाले पाहीजे, योग्य ती फ़ळं शिवाय योग्य प्रमाणात पाणी ही पोटात गेलं पाहीजे. मला स्वतःला व्यायामाचा प्रचंड कंटाळा आहे. पण गेल्या ४ महीन्यात नकळतपणे पाळल्या गेलेल्या वेळापत्रकामुळे माझे महीन्याला १ किलो, याप्रमाणे (४ महीन्यात ४ किलो) वजन आपोआप कमी झाले. मी वरील सर्वं गोष्टी, काही नकळत आणि काही ठरवून केल्या होत्या. तुम्ही पण करून पहा..
|
माझा फ़ंडा... जी काही खावंसं वाटतं ते मी खाते. फ़क्त दिवसभरात अगदी वडापाव, चिप्स वगैरे सुद्धा. सकाळचा नाश्ता मी एकदम हेवी करते. दुपारी एकदाच लंच करण्यापेक्षा दहा वाजता थोडे, एक वाजता थोडे, तीन वाजता थोडे असं खाते. संध्याकाळी सहा वाजता परत एकदा भूक असेल त्याप्रमाणे खाते. (इथे मनाची मर्जी चालते.) संद्याकाळी मात्र अगदीच हलकं जेवण. आणि एक ग्लास दूध. व्यायामासाठी... मी शक्यतो लिफ़्ट वापरत नाही. चढताना आणि उतरतानाही. ऑफ़िसमधे दर दोन तीन तासानी स्ट्रेचिंगचे साधे व्यायाम मी करते. (रेस्टरूममधे जाऊन) मी चहा अति पिते... (किती कप ते विचारू नका) पाणी मात्र मी भरपूर पिते. कच्च्या भाज्या आणि फ़्रुट्स यावर मी भर देते. रात्री जेवल्यावर थोडंसं फ़िरून घेते. आणि मग झोपते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी हे सर्व महिन्यातून फ़ार फ़ार तर एकदा करते. दिवे घ्या बरे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|