|
Mrinmayee
| |
| Monday, October 09, 2006 - 1:23 pm: |
| 
|
झक्की, ही आणखी एक रेसिपी, भरपूर टिकणार्या टोमॅटो लोणच्याची. २०० टोमॅटोचं लोणचं घातल्यावर एक चतुर्थांश भाग मला पाठवला तरी चालेल प्रत्येक टोमॅटोचे २ भाग करून ५ मिनिटं ब्रॉइल करून घ्यावेत पेपर टॉवेलवर कापलेला भाग उपडा करून पाणी शोषल्या जाऊ द्यावं (साधारण अर्धा तास तरी) भर तेलात काप तळून घ्यावेत लोणच्याचा तयार मसाला घालून मीठ, गुळ आणि तळणीचं थंड झालेलं तेल घालून फ़्रीज मधे घट्ट झाकणाच्या बाटलीत ठेवावं. (हिरव्या टोमॅटोचा जॅम पण करतात. पण रेसीपी माहीती नाही)
|
Dineshvs
| |
| Monday, October 09, 2006 - 5:40 pm: |
| 
|
हिरव्या टोमॅटोच्या बारिक फ़ोडी करायच्या. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल मिरच्या वा मिरची पुड, मोहोरीपुड, साखर घालायची. त्यात शक्य तर मोहोरीचे तेल किंवा साधे तेल आणि व्हीनीगर यांचे मिश्रण घालुन, मंद आचेवर घट्टसर होईपर्यंत शिजवायचे. यात हवे तर बेदाणेहि घालता येतात. हा प्रकार थंड झाला कि बाटलीत भरायचा. हे लोणच्याप्रमाणे वर्षभर टिकते. साधारण दोन वाट्या टोमॅटोच्या फ़ोडीना एक वाटी तेल आणि एक वाटी व्हीनीगर लागेल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|