|
Moodi
| |
| Monday, September 11, 2006 - 10:12 am: |
| 
|
कोथिंबीरीची चटणी साहित्य : १ जुडी कोथिंबीर, १ टीस्पुन लाल तिखट, चवीपुरते मीठ, ४ लसणाच्या पाकळ्या, थोडे भाजलेले शेंगदाणे. कृती : कोथिंबीर निवडुन धुवुन ती किचन पेपर अथवा स्वच्छ कपड्यावर थोडा वेळ पाणी जाईपर्यंत सुकवावी. नंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, मीठ, लसूण, तिखट आणि आवडत असल्यास चिमुटभर साखर घालुन हे सर्व मिक्सरमधून बारीक करावे आणि चटणी एअरटाईट डब्यात भरावी अन फ्रिझमध्ये ठेवावी. कोथिंबीर ही पूर्ण कोरडी नसल्याने ही बाहेर टिकणार नाही. पोळी, भाकरी किंवा ब्रेड कशाबरोबरही चांगली लागते. वाटल्यास वरुन थोडे तेल घ्यावे. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावे. माझी आई ही चटणी नेहेमी करते.
|
मूडी, शेंगदाण्याचे प्रमाण अंदाजे सांगतेस का प्लीज? आणि दाणे जरा भरड ठेवायचे का? मला consistency कशी असेल चटणीची ह्याचा अंदाज येत नाहीये ना म्हणुन...
|
Moodi
| |
| Monday, September 11, 2006 - 12:39 pm: |
| 
|
आश्विनी शेंगदाणे पाव वाटी (अर्धी मुठ) असले तरी चालते. तशी ही चटणी मोकळी होत नाही, गोळ्यासारखीच असते. किंवा २ टेस्पुन भरुन घाल.
|
मूडी, thanks गं. २-३ दिवसातच करून बघते, कोथिंबीरही आहे सध्या घरात.
|
Dineshvs
| |
| Monday, September 11, 2006 - 5:28 pm: |
| 
|
या प्रकाराला चटणी नाही म्हणता येणार, पण जास्त असलेली कोथिंबीर सत्कारणी लावायचा एक प्रकार. पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या बारिक कापुन घ्याव्यात. तेलाची हिंग हळद घालुन फ़ोडणी करुन त्यात या मिरच्या घालाव्यात. त्यात चिमुटभर मीठ व पाव वाटी साखर घालुन मंदाग्नीवर ठेवावे. साखर विरघळली कि त्यात अर्धी वाटी दाण्याचे कुट घालायचे व एक वाटी वा जास्त बारिक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅसवरुन उतरुन जरा निवु द्यायचे. मग त्यात अर्धा कप लिंबाचा रस घालायचा. फ़्रीजमधे हा प्रकार आठदहा दिवस टिकतो. मिरची, कोथींबीर आणि साखर हे कॉंबिनेशन वाचायला विचित्र वाटेल खरे, पण होणारे रसायन मात्र अजोड चवीचे होते. दिसायलाहि छान दिसते.
|
Bee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 2:24 am: |
| 
|
काल मी ही चटणी करुन बघितली. पण माझे mixer काही फ़िरले नाही. म्हणून मी वरतून घट्ट दही ओतले. तरी देखील मिक्सर फ़िरतच नव्हते. शेवटी मी दोन तीन चमचे पाणी ओतले मग कुठे मिक्सर फ़िरले. हा problem येईल हे मला चांगले ठावूक होते. दही घातल्यामुळे मुळ कोथिन्बीरीची चव गेली. कोथिंबीर लवकर वाळत नाही. पाणी होतच त्याला. मी एक पुर्ण वाटी दाणे, एक वाटी कोथिंबीर, ४ मोठ्या लसून पाकळ्या, एक चमचा तिखट असे प्रमाण घेतले होते. काल वांग्याची भाजी केली होती तेंव्हा मिक्सरला चिकटलेले कुट मी आणखी पाणी ओतून ते वाटण वांग्याच्या भाजीत घातले. मूडी, तुझे मिक्सर कसे काय फ़िरले? मी दोन्ही जार वापरूण बघितले. ती चटणी चांगली बाऊलभर झाली आहे. मी झाकून आत ठेवून दिली आहे.. फ़्रिजच्या आत.. दाणे मी नीट भाजून घेतले होते. आधी भरड करून घ्यायचे होते का?
|
Surabhi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 7:09 am: |
| 
|
दिनेश, तुम्ही लिहिलेल्या प्रकाराची consistency कशी असायला हवी? पंचामृतासारखी की भाजी प्रमाणे मोकळी? साखर पाणी घालून विरघळून घ्यायची आहे का? कशा बरोबर ही चटनी खाल्ली तर चांगली लागते म्हणजे ब्रेड / चपाती सोबत की शेव, फ़रसाण, वडे अशा सारख्या snacks बरोबर?
|
Moodi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 9:04 am: |
| 
|
बी मी एकदम सगळे नाही फिरवले. थोडे थोडे करुन घालते नेहेमी. दह्याच्या ऐवजी पाणी चालते, पण मग चटणी जास्त टिकत नाही. दाणे जास्त असले तरी चालतात.
|
Surabhi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 9:53 am: |
| 
|
बी कोथंबीर चिरून मग मिक्सर मधून नाही का फिरवत तू? देठासकट न कापता कोथंबीर घातली होतीस का? मुडी, प्रवासाठी सॅंडविचला लावायला छान वाटतेय ही चटणी. शेंगदाण्याऐवजी सुकं खोबरे घातले तर चालत असेल ना?
|
Moodi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 10:01 am: |
| 
|
सुरभी मी कधी खोबरे घातले नाही गं. घालुन बघ थोडेसे. म्हणजे अर्धी दाण्याची अन अर्धी खोबरे घालुन करुन बघ. चांगली लागेल असे वाटतेय. मी पण कोथिंबीर भरपूर आणुन ठेवलीय. हो सॅंडविचसाठी पण मस्त होईल. 
|
Bee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 10:04 am: |
| 
|
१) मी आधी कोथिम्बीरीला स्वच्छ धुवुन घेतलं. २) मग पंख्यासमोर अर्धातास वाळवली तिला. ३) मग पाने पाने खुडून, देठं दिलीत टाकून. ४) मग वर दिलेल्या कृतीप्रमाणे सगळे एकत्र करुन मिक्सर मध्ये चटणी केली. मिक्सर फ़िरता फ़िरेणा इतके जॅम झाले होते. मला चटण्या प्रकार खूप आवडतात पण दरवेळी हा मिक्सर न फ़िरण्याचा प्रश्न हमखास उपस्थित राहतो. माझ्याकडुन फ़क्त एक ती काकडीची चटणी सोडता इतर ओलसर चटण्या होत नाही. पण मी दाण्याची, तिळाची, जवसाची, लसणीची, सुक्या खोबर्याची ह्या सर्व चटण्या करुन बघितल्या आहेत. त्या नीट होतात. पण ह्या ओलसर चटण्या मला जमत नाही. काहीतर गणित चुकतय माझं करताना.. खास चटणी करण्याच मिक्सर निघाल असतं तर! जाउ दे :-(
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 12, 2006 - 4:09 pm: |
| 
|
सुरभी साखर पाण्यात विरघळवुन नाही घ्यायची. मिरचीच्या वाफेमुळे ती पातळ होतेच. वरुन लिंबुरस घातल्याने तिचे परत खडे होत नाहीत. व रसाला पिवळा रंग येतो. पंचामृतापेक्षा जरा पातळ असते हि. चपाती बरोबर छान लागते. फरसाणाबरोबरहि चांगली लागेल. मला स्वतःला ताकभाताबरोबर हा प्रकार आवडतो.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 12, 2006 - 4:12 pm: |
| 
|
बी तुझ्या मिक्सरचे व्हीपर बटण वापर व मिक्सरमधे थोडे थोडे मिश्रण घालुन बघ. जर दहि वैगरे घालणारच असशील तर तेलात कोरडीच परतलेली उडदाची वा चण्याची डाळ घाल. यामुळे चटणीला घट्टपणा येतो.
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 10:25 am: |
| 
|
दिनेश, मी होती नव्हती सगळी बटणे वापरुन बघितली आहे. शेवटी दही पाणी टाकावेच लागले. आई पाट्यावर वाटून कशा मस्त चटण्या करायची की एकदम फ़स्त व्हायच्या. ह्याबाबतीत मिक्सर डोम्बल!!!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 13, 2006 - 5:48 pm: |
| 
|
हल्लि बर्याच जणाना पाट्यावरच्या चटण्यांची चव कळु लागली आहे. आता अगदी छोटे पाटे वरवंटे मिळतात. छोटा दगडी खलहि मिळतो. अगदीच नाही तर एखादा लंबगोल दगड घरात ठेवला पाहिजे. माझ्या घरी आहे. बी, तुला न वाटता करायच्या चटण्याहि मिळतील कि ईथे. शिराळ्याच्या सालांची, खवलेल्या खोबर्याची, कच्च्या रताळ्याची, लसुण मिरीची, लसणीची चटणी न वाटता होते.
|
Lajo
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:32 am: |
| 
|
कोथिंबीरीच्या चटणीचा एक नवीन पाश्चात्य प्रकार. साहित्य: एक जुडी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. पाने थोडावेळ किचन पेपर वर वाळत ठेवावीत. मोकळी करावीत, फ़ार देठ नकोत. एक मुठ (१०-१२) कच्चे काजू लसूण पाकळ्या (ऐच्छिक) ऑलीव तेल पारमाजाना चीज़ चा चुरा २ टेबल स्पून (फ़्रेश आसेल तर उत्तमच नाही तर पावडर चालेल (भारतात आमुल ची चीज पावडर मिळते ती सुध्धा चालेल) लिंबाचा रस १ चमचा ताजी कुटलेली मीरेपूड आणि मीठ चवी पुरते चिमुटभर साखर (हवी आसल्यास, मला थोडी आंबट गोड चव आवडते) कृती: ऑलीव तेला व्यतिरीक्त सर्व साहित्य मिक्सर मधे घालावे व एकदा फ़िरवावे. आता थोडे थोडे तेल घालत मिश्रण फ़िरवत रहावे. काजू फ़ार बारीक होता कामा नयेत. साधारण आपल्या चटणी सारखी पण थोडी रवाळ दिसायला लागली की वाडग्यात काढून त्यावर थोडे फ़्रेश पारमाजाना चीज़ घालून सजवावे. ही चटणी पीटा ब्रेड, साधा टोस्ट, पोळी, मोनाको बिस्किटे, चीज़ स्टीक्स ई. बरोबर छान लागते. टीप: या चटणीला तेल थोडे जास्त लागते परंतू ऑलीव तेल वापरल्यामुळे आरोग्यास हानीकारक नाही.
|
Meggi
| |
| Saturday, September 16, 2006 - 7:34 am: |
| 
|
दिनेश, तुम्ही दिलेली कृती मी आज करुन बघनार आहे. पण एक शंका आहे. लिंबाचा रस घालुन पदार्थ जास्त दिवस फ्रीज मध्ये ठेऊ नये असं म्हणतात. मग ही चटणी लिंबु रस घालुन फ़्रीज ठेवली तर टिकेल का?
|
मूडी, कोथिंबिरीची चटणी करून बघितली मी. मला न अगदी थोडी करायची होती म्हणुन मी कोथिंबीर(चिरून घेऊन) आणि बाकी सगळं साहित्य सरळ छोट्या खलबत्यात कुटले, वाटण्याऐवजी. ५ मिनीटात मस्त चटणी तयार...मी थोडे लिंबू पण पिळले. धन्यवाद कृतीसाठी.
|
Shonoo
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:31 pm: |
| 
|
बी गेल्या पाच्-सात वर्षांपासून मुम्बै मधे for Osterizer असे लिहिलेली छोटी मिक्सर ची भांडी मिळायला लागली आहेत. ती इथल्या hamilton beach किंवा oster ब्रॅंडच्या मिक्सर ना परफेक्ट बसतात. साधारण दीड्-दोन कप व्हॉल्यूम असतो त्या भांड्यांचा. असली भांडी कोरड्या चटण्या, पिठी साखर फारसे पाणी न घालता वाटायच्या ओल्या चटण्या, सी के पी पद्धतीचे इतर मसाल्यांचे वाटण इत्यादीला बरी पडतात. अर्थात पाट्यावर वाटलेल्या गोष्टींचं texture वेगळंच!
|
Bee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 2:36 am: |
| 
|
शोनू, मला खरच अस छोटश एकट्यापुरत आणि चटण्या करता येणार मिक्सर किंवा आहे त्या मिक्सरला बसणार भांड हव आहे. जर still च असेल तर फ़ारच छान. कुणाला नक्की पत्ता सांगता येईल का मुंबईत कुठे मिळेल? माझ्याकडे जे काचेच भांड आहे त्याला आधी मला उलटं कराव लागत मग त्यात साहित्य ठेवाव लागत. परत मग भांड्याच तोंड खाली मिक्सरवर बसवाव लागतं. मी त्याला वाळूच घड्याळच म्हणतो कारण मला ते तसच वाटत..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|