Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through September 28, 2006 « Previous Next »

Seema_
Monday, August 28, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समी सांजा किंवा शीरा कर.
नाहीतर अनायसे गणपती आहे,मोदक किंवा ओल्या नारळाच्या करंज्या.
तांदळाच्या भाकरी बरोबर मेथीची लसुन घातलेली भाजी,भरली वांगी किंवा शिमला मिरचीची दान्याचा कुट घालुन भाजी,उसळ,तीळाची किंवा खोबर्याची चटनी किंवा मेतकुट ताकात कालवुन त्यात बारीक कांदा कोथींबीर घालुन,मठ्ठा मस्त लागेल.
दहीभात पण कांदा आणि कडीपत्त्याची फ़ोडनी घालुन मस्त लागेल.


Sami
Monday, August 28, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, सीमा तोंडाला पाणी सुटलं. मी गोड म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या करेन puff pastry sheets मधे भरून. मस्त लागतात.
plain भात किंवा पुलावा ऐवजी तू म्हणतेस तसं दही भात करेन बहुतेक. thanks गं.


Sia
Wednesday, August 30, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी १० लोकन्ना डिनर साथि वीक डे ला बोलावल आहे. १ मल्लु कपल त्यान्चे आई बाबा. १ कन्नडा कपल, २ नॉर्थ इन्डीअन कपल आणि २ छोटी मुल. माला कही सुचत नहिये काय कराव ते. मी घरी लवकर ५ वाजता येउन करणार आहे.

Chioo
Wednesday, August 30, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग, खूप मोठ्ठे धाडसच आहे. वीक डेला १० जणांना डिनर.. (आश्चर्यचकीत इ. इ. )

तू दहीभात नक्की कर. कडिपत्त्याची फोडणी देऊन. इथे आलू-मटरची छान कृती आहे. त्याची gravy आदल्या दिवशी करून ठेवता येईल. आलूऐवजी पनीरपण घालू शकशील. non-veg चालेल का? चपाती, पुरी करणार आहेस का? starter शक्यतो तयार आण. गोड म्हणून ice-cream , वेगवेगळी फळे, cake असे देता येईल.


Sayonara
Wednesday, August 30, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समि, विकेंड तर गेला पण भाकरीबरोबर फणसाची भाजी पण ट्राय करुन बघ. छान लागते.

Sami
Wednesday, August 30, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं सायो नाही गेला वीकेंड गं. या वीकेंड ला येत आहे मैत्रिण. फणस कुठून मिळणार?

Karadkar
Wednesday, August 30, 2006 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समी, चायनीज दुकानात किंवा देसी दुकानात कन मधला फणस मिळतो बघ. त्याची भाजी छान होते.

Sayonara
Wednesday, August 30, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समि, कॅन मधला गं. मी पण त्याचीच केली होती. मस्त लागते भाकरीबरोबर.

Miseeka
Tuesday, September 12, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़णस can मधे?मला पण try कराय्ला आवडेल.पण sami जर can चा brand आणि काय लिहिलेले असते त्यावर? कुठे मिळतो तो can US मधे सन्गशिल का? please

Sayonara
Friday, September 15, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

miseeka , अगं indian store मध्ये मिळतो. पण दोन प्रकारचे कॅन असतात. एकात साखर असते आणि दुसर्‍यात मीठ. मीठ असलेला कॅन घे.त्याचा रंग हिरवा आहे.

Anupama
Monday, September 18, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी playgym मध्ये ठेवली आहे. दुपारी ११-१ अशी वेळ आहे. अमेरिcअन आणि देशी असा mix crowd आहे. Playgym असल्यामुळे साग्रसन्गीत जेवण करता येणर नही म्हणुन पोटभरीचे snacks ठेवायचा विचार करत आहे.
अत्तपर्यन्त दोक्यात
six layer dip & chips, ढोकळा , sweet corn and mozarella bites, चटणी सन्द्वित्चेस, लहान मुलान्ना पिज़्ज़ा एवढेच डोक्यात येत आहे. Please मेनु सुचवायला मदत करा :-)

Ek_mulagi
Wednesday, September 27, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शनिवारी एका Barbeq ला जायचे आहे.
देसी-अमेरिकन mix आहे crowd
एक डिश न्यायची आहे.

Please Help !!


Mrinmayee
Wednesday, September 27, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बार्-बी-क्यु ला स्नॅक, जेवण, डीसर्ट यातलं काय न्यावसं वाटतय? अश्याच मिक्स्ड क्राऊडमधे मी वडापाव नेला होता. सगळ्यांना आवडला. वेजीटेरियन्सची पण सोय झाली, मला धरून :-)
तसंच बार्-बी-क्यु साठी सोप्प आणि छान डीजर्ट्: केळी आणि चॉकोलट घेऊन जायचं. सगळ्यांची खाणी पिणी संपली की ग्रिल च्या उरलेल्या आचेवर 'न सोलता फक्त लेंथवाईज खाच केलेली आणि त्यात चॉकलेट भरलेली केळी अल्युमिनम फॉईल मधे (वेगवेगळी) गुंडाळून' १०-१५ मिनिटं ठेवायची. आतलं चॉकलेट वितळून केळ्यांबरोबर शिजलं की छान लागतं. (केळी बेताची पिकलेली असावीत)


Dineshvs
Wednesday, September 27, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केळ्याची कल्पना चांगली आहे. केळ्याबरोबर अननस, स्टारफ़्रुट, पपई, हिरवे सफरचंद अशी फ़ळे घेऊन त्याचे तुकडे करावेत. ते कबाब स्टिक मधे ओवुन, थोडे ग्रिल करावेत. त्याबरोबर तेजपत्ता किंवा अशीच एखादी हर्ब पण घ्यावी. मग त्यावर लिंबुरस आणि चाट मसाला घालुन खावे.

Saket
Thursday, September 28, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे शुक्रवारी आणि रविवारी काहीजण जेवायला येणार आहेत.माझा सध्याचा ठरलेला मेनू असा आहे.

शुक्रवार
- पनीर बटर मसाला,पुलाव,काकडी \ पायनॅपल रायता, एखादी उसळ, आणि पोळ्या. नवरात्रात आमच्याकडे वरण आणि पांढरा भात चालत नाही त्यामुळे उसळ आणि पुलाव ठेवते आहे. हा मेनू कसा वाटतो आणि यात गोड फ़्रुट सॅलाड कसे वाटेल? किंवा दुसरे काही स्वीट काय ठेवता येईल?

रविवार
- मेथीची डाळभाजी, खमन्ग काकडी, मसाले भात, एखादी कोरडी भाजी,मठ्ठा आणि पोळ्या. मला या स्वयंपाकात कांदा-लसूण वापरता येणार नाही.मला या मेनूला साजेलसा गोड पदार्थ सुचवा नं.

मी वर सांगितलेल्या मेनूपेक्षा दुसरा काही छान मेनू सुचवला तरीही चालेल.
थॅंक्स इन एडव्हांस.


Bee
Thursday, September 28, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे नवरात्राला आई नेहमी केळीचे शिकरण करते. इतके छान करते ना ती.. मज्जा येते अष्टमीच्या नैवेद्याला..

तांदूळाच्या पिठाची आईच्या हातची खीर just amazing असते..

आणि माझ्या हातच्या कापण्या इतक्या खुसखुशीत होतात ना.. आई गं जीभेला तोंडभरुन पाणी सुटले माझ्या.. लहान पोरांचा अगदी आवडीचा आहे हा पदार्थ.. simple and tasty..


Sayuri
Thursday, September 28, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, कापण्या म्हणजे काय?

Milindaa
Thursday, September 28, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sayuri, शोधा म्हणजे सापडेल

/hitguj/messages/103383/84809.html?1090637295

Milindaa
Thursday, September 28, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा असं शोधा
search

Priya
Thursday, September 28, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, इथे विचारतेय म्हणून सॉरी, पण तू देवनागरी मध्ये कसे लिहीतोस गुगलवर शोधण्यासाठी?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators