Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काकडीचे पराठे

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पराठे » काकडीचे पराठे « Previous Next »

Bee
Thursday, September 21, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काकडीच्या पराठ्याची कृती हवी आहे. Thanks in advance!!!!!

Bee
Friday, September 22, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना काकडीचा दीड ग्लास रस आणि काकडीचे ४ छान खमंग पराठे हवे असतील त्यांनी ही कृती करुन बघावी.

सुरवात आणि रस :
मी नेहमी दोन मोठ्या काकड्या, मध्यम किस पडेल अशा किसून घेतो. माझ्याकडे लग्नात आलेलं एक पातळ उपरणं आहे त्यात मी हा किस गोळा करत जातो. दोन्ही काकड्या किसून झाल्यात की एक मोठा व्यास असलेलं पातेलं घेतो आणि जसे जिलेबी काढताना आपण कापड हाती धरून ठेवतो त्याप्रमाणे हे उपरण धरतो. त्यानी रस जास्त पडतो आणि काकडीचा जो किस असतो तो कोरडा होतो. असे जर केले तर, जवळपास एक ते दीड ग्लास छान ताजा स्वच्छ रस तुम्हाला प्यायला मिळेल आणि तुमची त्वचा कशी तुकतुकीत राहील :-) आमच्याकडे शहाळं मिळत नाही म्हणून, माझ्या ताईच्या नवव्या महिन्यात मी तिला रोज एक ते दीड ग्लास रस द्यायचो त्यामुळे ही कृती मला अगदी पाठ होऊन गेली आहे. पण मला इथे काकडीच्या पराठ्याची वेगळी कृती हवी होती म्हणून विचारून बघितले.

पराठा :
आता ह्या काकडीच्या किसात एक चमचा मीठ मिसळवून त्याला चांगले अर्धा तास मुरत ठेवा. एकीकडे जेवढा किस तेवढेच पिठ काढून ठेवा. दोन चमचे भाजून भरड कुंटलेले जिरे घ्या. त्यात थोडासाच ओवा घाला. चार पाकळ्या लसून आणि दोन चिमुकल्या हिरव्या मिरच्या घ्या. त्याला बारीक वाटा. आता काकडीचा किस मिठ घातल्यामुळे पाणी सुटून ओलसर झाला असेल. किस, पिठ, जिरे-ओवा-लसूण्-मिरचीचा ठेचा हे सर्व साहित्य छान तिंबून मात्र पाणी न घालता एकजीव करा. सानूल्या कढईत दोन चमचे तेल, एक चमचा हिंग, थोडी लाल मिरची पावडर, खायचा सोडा घालून अगदी मंद आचेवर कढत तेल करा आणि गरम गरम ते तेल मिश्रणावर सोडा. आता हाताला पाणी लावून परत एकदा कणिक तिम्बा. जर अजून पाणी लागले तर अजून एकदा पाण्याचा हात घ्या. असे करत करत सर्व कणिक सैल करा. मग एक पाचेक मिनिटांनी पोळी फ़ाटणार नाही इतपत पातळ पराठा लाटा. ह्या पराठ्यासोबत फ़ोडणीच दही खूप छान लागत.

फ़ोडणीचं दही :
फ़ोडणीचं दही करायच असेल तर, त्याच सानूल्या कढईत, दोन लसणीच्या पाकळ्या लाटण्यानी पोळपाटावर ठेचून गरम तेलात घाला. वर थोडी जाड जाड मोहरी घाला. घरात जर जाड तिखट असेल तर तेच तिखट घ्या. नाहीतर पित्झाचे तिखट वापरले तरी हरकत नाही. किंवा आपले बारीक तिखट घातले तरी चालेल पण जाड तिखट पावडर उत्तम राहील. तर एकदा तिखट तेलात घातले की सांडशी घेऊन ती कढई वर उचलायची आणि हातानी गोल गोल फ़िरवायची की सगळे तिखट गरम झालेल्या तेलात जाळाची आच न लागता होईल. असे जर नाही केले तर तिखट जळेल. माझे जळते म्हणून मी असे करतो. आता गाढे दही छान खवले असलेले दही खूपच बेष्ट होईल, ते ह्या कढवलेल्या तेलात ओतायचे आणि मस्त ठसका लागेल अशी एक आच देऊन जाळ विझवून टाकायचा. मग हे फ़ोडणीचे दही आणि काकडीचा पराठा, सोबत आधी प्यालेला रस, बघा कस झुंजुमुंजु वाटतं की नाही तुम्हाला.

समारोप :
कशी वाटली कृती? प्रतिक्रिया अवश्य द्या म्हणजे मी माझ्या पाककृती इथे तुम्हाला सांगत जाईन.


Sanash_in_spain
Friday, September 22, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, कृती सविस्तर आणि छान वर्णन करून लिहिली आहेस. आजच करुन बघते.

Dineshvs
Friday, September 22, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, छानच लिहायला लागलास कि. हा माझाहि आवडीचा प्रकार, पण मी तांदळाचे पिठ वापरुन करतो. तो प्रकार थापुन करावा लागतो.
आणि तुमचे ते तिखट खाणे मला सोसवत नाही रे. मी आपले साधेच दहि घेतो.


Chinnu
Friday, September 22, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी मस्त कृती. छान वाटलं वाचुन. करुन पाहीन नंतर.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators