|
Bee
| |
| Monday, September 18, 2006 - 8:27 am: |
|
|
मला श्री सत्यनारायणाच्या पुजेच्या वेळेला आपण केळी वगैरे घालून तसा शिरा करतो तसा शिरा हवा आहे. मी एकदा केलेला आहे पण आता मात्र दुध साखर आणि केळी घालण्याचा क्रम आठवत नाही.
|
Bee
| |
| Monday, September 18, 2006 - 8:48 am: |
|
|
BTW, ह्याच प्रसादाच्या शिर्यसंबंधी मला एक विचारायचे होते की हा शिरा सगळे साहित्य सव्वा वाटी घेउनच करायचा असतो ना.. घरी विदर्भात सव्वा वाटीपेक्षा एक कण कमी नाही की जास्त नाही इतके मोजुन मापून साहित्य घेतलेले असते. बाकी साहित्य ठिक आहे पण सव्वा वाटी तुप म्हणजे, तेही न विरघळलेले, म्हणजे खूप जास्त नाही का झाले आजच्या diet conscious काळात :-) गेल्या वेळी मी तुप विरघळुन मग त्याचे सव्वा वाटी प्रमाण घेतले होते. त्यामुळे थोडे तुप कमी लागले.
|
Jayavi
| |
| Monday, September 18, 2006 - 12:34 pm: |
|
|
बी, अरे मी दर महिन्यात करते सत्यनारायणाची पूजा म्हणून प्रसाद सुद्धा दर महिन्यात होतो. माझं प्रमाण मी इथे मिळणार्या सामानाप्रमाणे केलंय. मी रवा (इथे ३-४ प्रकारचे रवे मिळतात) Turkish superfine semolina वापरते....... हा अगदी बारीक असतो. सव्वा वाटी रवा अगदी तेव्हढ्याच तुपात मस्त खमंग भाजून घ्यायचा. वर मस्तपैकी तूप तरंगतं. रवा भाजतांनाच त्यात बदाम, काजू, पिस्त्याचे जे तयार काप असतात ते टाकते म्हणजे ते सुद्धा खरपूस लागतात. दुसरीकडे सव्वाच्या दुप्पट दुध घ्यायचं म्हणजे अडीच वाट्या आणि तापायला ठेवायचं. ह्यात केशर घालयचं. दुधाला उकळी आली की हे केशराचं दुध रव्याच्या कढईत हळुहळु ओतायचं. छान मस्तपैकी मिसळायचं. मग त्यात २ वाट्या साखर आणि २ केळी अगदी बारीक करून घालायची. व्यवस्थित मिक्स केल्यावर अगदी मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत झाकून ठेवायचं. साधारण ३-४ मिनिटं लागतात. हे झालं की मग थोडा वेळ शिरा तसाच झाकून ठेवायचा म्हणजे मस्त शिजतो. माझं हे प्रमाण तुला जरा विचित्र वाटेल पण इथल्या वस्तू वापरुनच हे प्रमाण मी ठरवलंय. फ़ारच सुरेख लागतो हा शिरा आणि रंगही छान मंद केशरी दिसतो.
|
Bee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 8:14 am: |
|
|
नाही जयवी प्रमाण विचित्र वगैरे नाही वाटलं शेवटी आपल्याकडे जस पिकतं आणि विकलं जातं त्याचा अंदाज बांधूनच आपण आपले पदार्थ प्रमाणात कमी अधिक करावे असे माझेही मत आहे. कृती छान दिली आहे. धन्यवाद! मला आता क्रम लक्षात आलेत परत.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:22 pm: |
|
|
जयाविची कृति छान आहे. वेलची केळी मिळाली तर छान स्वाद येतो. या केळ्याचे तुकडे करुन तुपात परतुन घ्यायचे. एक संकेत म्हणुन यातले घटक सव्वा या मापात घ्यायचे असतात. म्हणजे सव्वा कप रवा, सव्वा कप साखर, सव्वा कप दुध, सव्वा कप तुप, सव्वा केळे वैगरे. पण ईतक्या तुपात रवा भाजला तर ईतक्या दुधात शिजत नाही. जास्त दुध घालावेच लागते.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 19, 2006 - 5:53 pm: |
|
|
बरोबर दिनेश केळी ही तूपात परतूनच छान खमंग वास येतो. पाहिजे असेल तर केळी परतून ठेवून द्यावी शिर्यातच किंवा काढून टाकावी. आम्ही परतून काढून टाकतो आणी मग हे केळ्याचे तूपातच रवा भाजतो. आणी दूध हे नेहमी ज्यास्त लागते कारण तूपकट नी तूपात डूबलेला रवा शिजायला दूध ज्यास्त लागते.
|
Milindaa
| |
| Tuesday, December 04, 2007 - 12:39 pm: |
|
|
Jayavi, तुझ्या पध्दतीने शिरा करुन बघितलाअ. एकदम छान झाला होता.
|
Zakasrao
| |
| Tuesday, December 04, 2007 - 2:05 pm: |
|
|
Jayavi, तुझ्या पध्दतीने शिरा करुन बघितलाअ. एकदम छान झाला होता.>>>>>>>>>>>>.... त्यासाठी इतके दिवस गायब होतात का तुम्ही????????? जरा जास्तच दिवस लागले
|
Sayuri
| |
| Tuesday, December 04, 2007 - 4:53 pm: |
|
|
मी पण जयावि यांच्या पद्धतीनेच शिरा करते. अतिशय सुरेख होतो. धन्यवाद जयावि!
|
Jadoo
| |
| Tuesday, December 04, 2007 - 7:52 pm: |
|
|
मी सुद्धा जयवि यांच्या method ने शिरा केला होता.. चव छान आली पण थंड झाल्यावर खूप घट्ट झाला होता..कोणि सांगु शकेल क का असे होते ते?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|