Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पाखडणे..

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » पाखडणे.. « Previous Next »

Bee
Monday, September 18, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा मी घर स्वच्छ केलं आणि मग संध्याकाळी शेंगदाण्याची चटणी करुन ठेवायची होती म्हणून दाणे भाजलेत पण घर पुन्हा स्वच्छ करावं लागलं. दरवेळेसच्या हा प्रश्न आहे. कुणाला ताटभरुन दाणे पाखडायचे झाले तर कमी पसारा केर होईल अशा टिप्स देता येतील का? मी वर्तमानपत्राचे दोन पानं पुड्यात घेऊन बसतो तरी देखील दाण्याची सालं त्या पानांच्याही पुढे जातात. जरा देखील वारा आला की मग घरभर उडतात आणि कुठे ओलसर जागा असेल तर तिथेच चिकटून बसतात. दाणे तसे कच्चे सालासकट छान लागतात. पण भाजले की सालं काढावीच लागतात नाहीतर कडुसर तुरट चव येते.

Chioo
Monday, September 18, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नेहमी बेसिनवर पाखडते. साले पाण्यला चिकटून बसतात आणि बेसिन पटकन धुतापण येते.

Bee
Monday, September 18, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, दाणे खाली सांडत नाहीत का? आणि बेसिनची जागा पण कमी पडते ना पाखडताना कारण ताट सारखे मागे पुढे वर खाली होत राहते. माझे तर दाणे खाली सांडतात आणि साल खूप उडतात. एकदा मी फ़ुंकर मारून साल काढण्याचा प्रयत्न केला पण त्यानी साल डोळ्यात जातात. आमच्याकडे मोठे छिद्र असलेली एक चाळणी आहे. त्यातून दाणे खाली पडत नाही पण चुरा अर्थात सालं खाली पडतात. तशी चाळणी मी इथे शोधली पण मला मिळाली नाही.

Chioo
Monday, September 18, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही. दाणे खाली नाही सांडत. हळूहळू पाखडायचं. थोडं सवयीने जमते. वाटल्यास एकदम सगळे न घेता थोडे थोडे घेऊन करायचे. मी खूप जास्त दाणे कधी भाजत नाही त्यामुळे जमते.

Sia
Monday, September 18, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
कोपर्‍यात पपेर टाकून दाणे पाखडायचे म्हणजे साल उडत नाहीत आणि गोळा पन नीट करता येतात.


Prajaktad
Monday, September 18, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी दाणे गरम असताना एका कापडी पिशवित(राईसच्या पिशव्या चांगल्या उपयोगि पडतात.)घालुन वरुन चोळावे म्हणजे साल पटकन निघतात. भाज़ी धुवायला एक प्लास्टिक colander मिळतो त्यात दाणे ओतुन किचन सिन्क मधे किवा दोन पेपर वर चाळले कि झाले.

Rachana_barve
Monday, September 18, 2006 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल साल काढलेले दाणे मिळतात. सरळ ते आणावेत

Bee
Tuesday, September 19, 2006 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साल काढलेले दाणे इथेही मिळतात पण त्या दाण्यांवर एक oil-paint सारखा कसला तरी थर दिलेला असतो. ही बहुतेक चिनी पद्धत आहे. भारतात खारे दाणे कसे छान मिळतात तसे इथे मिळत नाहीत. नाहीतर ते वापरले असते मी चटणी किंवा साबूदाण्याच्या उसळीला.


प्राजक्ता, colander मी नविनच ऐकतो आहे. इथल्या supermarket मध्ये शोधावा लागेल.

धन्यवाद ह्या टिपांचा नक्की उपयोग होईल असे वाटते आहे.



Prady
Tuesday, September 19, 2006 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी हा साबुदाण्याची उसळ काय प्रकार आहे.

Bee
Tuesday, September 19, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र, आमच्याकडे शेंगदाणे आणि साबूदाणे एकत्रीत करुन त्याला रगडलेल्या मिरींची फ़ोडणी देऊन उसळ करतात. शेंदी मिठं घालतात.

Dineshvs
Tuesday, September 19, 2006 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या साबुदाण्याला लोकानी काय काय नावं ठेवली आहेत बघा,
कोल्हापुरला याला शाबु किंवा शाबुतांदुळ म्हणतात.
बी ते शेंगदाणे बहुतेक तळलेले असावेत. अर्थात कुठल्या तेलात याची कल्पना तुच करु शकतोस.


Prady
Tuesday, September 19, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे कृती लिही ना उपासाच्या बीबी वर.

Saket
Tuesday, September 19, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रॅडी, साबुदाण्याच्या खिचडीला नागपूरला (किंवा इन जनरल विदर्भात (माझ्या माहितीप्रमाणे)) साबुदाण्याची उसळ म्हणतात.

Milindaa
Tuesday, September 19, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady, बी च्या कृतीत काळे मिरे वापरले जातात, जे उपासाला चालत नसावेत.. तेव्हा ती कृती तेथे योग्य होणार नाही (ती तेथे आधीच असेल तर मला माहिती नाही)

Bee
Wednesday, September 20, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे साकेतचे. मला खिचडीच म्हणायचे होते परंतू ओठावर वर्‍हाडी शब्द आला. तेंव्हा मला खिचडीची कृती लिहायची गरज नाही.

आमच्याकडे काळी मिरी उपासाला चालतात. ही काळी मिरी आणि शेंदी मीठ दोघांचा स्वाद अगदी जमून येतो.


Sandu
Tuesday, October 03, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दाणे भाजुन त्याचे साल काढुन ते व्हाकुम क्लिनरच्या नळीने काढतो. ती नळी फ़क्ता त्याच कामासाठी ठेवली आहे.

Naatyaa
Tuesday, October 03, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते व्हाकुम क्लिनरच्या नळीने काढतो. >>> नळीत दाणे येत नाहीत का?

Sandu
Tuesday, October 03, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडेसे जातात पण बरेच उरतात भाण्डयात. नळी काय दाण्याला नाही लावायची लाम्ब धरायची.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators