|
Dineshvs
| |
| Thursday, September 14, 2006 - 4:47 pm: |
| 
|
यासाठी चिकन स्टॉक वापरावा लागतो. चिकनची मान, पंख वैगरे भाग, एखादे तमालपत्र एखादा कांदा, काहि ठेचलेले मिरीदाणे एक लिटर पाण्यात उकळायचे. चिकनचे मास हाडापासुन वेगळे झाले कि हे सगळे गाळुन घ्यायचे. हे आधी करुन ठेवायचे. वर जमा होणारी चरबी काढुन टाकायची. याचे तयार क्युब मिळतात. चिकन नको असेल तर बटाट्याची साले, कोबीचा मधला दांडा, पालकाचे देठ वैगरे वापरुन व्हेजीटेबल स्टॉक करता येतो. मनचाव सुपसाठी जरासे तेल तापवुन त्यात दोन चार लसणीच्या पाकळ्या परतायच्या. त्यावर एक कपभर मश्रुमचे तुकडे, एक कप बारिक चिरलेला कोबी, दोन तीन पातीचे कांदे बारिक चिरुन घालायचे. थोडी पात वगळावी. यात मीठ व दोन चमचे सोया सॉस घालायचा, आणि परतुन वरचा स्टॉक घालायचा. उकळले कि दोन तीन चमचे कॉर्नफ़्लोअर पाण्यात विरघळवुन लावायचे. चवीप्रमाणे वरुन मिरपुड, चिली सॉस वैगरे टाकुन प्यावे. वगळलेली पात व थोडा चिरलेला कोबी वरुन शिवरावा
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|