|
Milindaa
| |
| Wednesday, April 05, 2006 - 12:51 pm: |
|
|
असा सर्च करता येतो मॉड्स, हे पोस्ट आर्काईव्ह्ज मध्ये गेलं की उडवायला हरकत नाही
|
Aandee
| |
| Friday, September 15, 2006 - 9:00 am: |
|
|
युनो,हि खान्देशी शेव भाजीची रेसीपी... मी साहित्य सागते पण अंदाजाने सागते २ कान्दे पातळ उभे चिरुन,२ मोठे चमचे किसलेल खोबर,१ चमचा खसखस, १ मोठ चमचा धणे, १ चमचा जिर कोरड साहित्य तेलात भाजुन घ्याव थोड लाल होत आल की त्यातच कान्दा लालसर परतुन घ्यावा थंड होउद्याव मग त्यात ४ ५ लसणाच्या पाकळ्या घालुन वाटुन घ्याव. भरपुर तेल फ़ोड्णी साठी घ्याव त्यात मोहरी,जिर टाकुन तड्तडल्यावर त्यात १ मोठा चमचा तिखट लगेचच कान्द्याच वाटण १ चमचा गरम मसाला हे सगळ तेल सुटेतोवर परतायच, त्यात जेव्हढी भाजी हवी तेव्हढ पाणी घालायच, त्याला छान उकळी येउ द्यायची वाढायला घ्यायच्या पाच मिनीट आधी जाड तिखट शेव त्यात घालायची वरुन कोथीभार आवडत असेल तर बारीक कान्दा,लिम्बाची फ़ोड आणि बाजरीची गरम भाकरी.एकदम छान बेत आणि नाक डोळ्यातुन पाणी यायला हव असेल तर तिखट जास्त घालाव, फ़ोडणीत तिखट टकलना तर छान तवग येतो.
|
Ek_mulagi
| |
| Wednesday, September 20, 2006 - 3:17 pm: |
|
|
झटपट खजूर बर्फ़ी ही अगदी सोपी झटपट होणारी, न बिघडणारी खजूर बर्फ़ी. नाॅनस्टीक भांड्यात अर्धा चमचा तुप घालायच. Pitted Dates १-२ कप घालायचे. मन्द आचेवर गरम करायचे. ग़रम होताना ते खजूर नरम पडायला लागतात. दबायला लागले की Masher ने दाबून त्याचा चुरा करायचा. सगळे खजुर crush करता येण्या इतपत झाले कि भांड गसवरुन उतरवून खजूर मोठ्या पातेल्यात काढायचे. हाताने कणीक मळतो तसे हा गोळा चान्गला मळायचा. त्यात पाहिजे ती Dry Fruits काजु, पिस्ता,बदाम घालायचे त्या गोळ्याची पापडाच्या लाट्या करतो तशी Cylinder सारखा गोळा करायचा. 1/4 -1/2 inch जाडीच्या वड्या कापायच्या. आणि मजेत खायच्या,खिलवायच्या.
|
Manuswini
| |
| Wednesday, October 04, 2006 - 6:56 pm: |
|
|
केळ्याचे वडे छान लागतात. पिकलेली केळी ३ ते ४, रवाळ तांदूळ पिठ २ वाट्या, थोडी कणीक. मिठ, गूळ(केळी गोड असतील तर गरजेनुसार गुळ कुस्कुरावा), पणी जराही न टाकता केळी कुस्कुस्करून घट्टसर भिजवावे. केळ्याचा ओलसरपणा काफ़ी असतो. वेलची,केसर टाकवे. थोड्या वेळ ठेवून वडे थापावे नी तेलात तळावे. नाहीतर त्याच पिठात दही टाकून अप्पे बनवू शकतेस. आंबले छान असेल तर जाळी छान पडते अप्प्यांना
|
Shonoo
| |
| Saturday, October 07, 2006 - 2:49 am: |
|
|
फार पिकत आलेली केळी असतील तर त्याचे गोड थालीपीठ करावे. केळे कुस्करून त्यात गव्हाचा रवा, मीठ, थोडे दूध अथवा पाणी, चिरलेला गूळ ( ऐच्छिक) आणि ओले खोबरे ( ऐच्छिक) घालून थालीपीठा सारखे कालवावे. कधी कधी बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घालतात. मग पाण्याच्या हाताने तव्यावर थापावे आणि कडेने तूप सोडून खरपूस भाजावे. गरम किंवा थंड कशीही छान लागतात.
|
Ashwini
| |
| Friday, October 13, 2006 - 5:25 pm: |
|
|
भोपळा कार्व्ह केल्यावर आतला गर फेकून द्यायला नको वाटतं. त्याचं काय करता येईल, भोपळघार्या सोडून?
|
Lasagna छान होतो गं त्याचा. ऑलिव्ह तेलावर कांदा, लसूण, मिरची, मिरपूड परतून त्यात भोपळ्याचा गर घालून वाफेवर शिजवून घे. चवीनुसार मीठ आणि साखर. जायफळ पण थोडं छान लागतं. मग बेकिंग शीटवर पास्ता, हा गर, चीज आणि आवडता पास्ता सॉस याचे एकावर एक थर द्यायचे आणि १५ मिन बेक करायचं. मुलांना आवडतं. बाकी गर शिजवून फ्रीझ करून ३ महिनेपर्यंत टिकतो. कणीक भिजवताना त्यात मिसळायचा. ( मी एरवीही मिसळते.) भाजी न खाणार्या मुलांना गंडवायला एक उपाय.
|
Prady
| |
| Monday, October 16, 2006 - 12:15 am: |
|
|
कुणी खजूर रोलची रेसेपी लिहील का. मला गोडवा मधे नाही मिळाली. ती खजूर थोड्या तुपावर परतून करतात ती हवी आहे. झी मराठी वर एकदा मानसी मधे दाखवली होती खूप पूर्वी. Exact आठवत नाहीये. Please कुणीतरी लिहाल का.
|
Dineshvs
| |
| Monday, October 16, 2006 - 6:48 pm: |
|
|
मी मागे मुलांच्या खाण्यात लिहिली होती. खजुन फारसा परतु नये, जास्त परतला तर तो कडवट लागतो. त्यामुळे कुटुन नीट मऊ करुन घ्यावा. अगदी अर्धा मिनिटभर मंद आचेवर परतावा. पोलपाटावर खोबर्याचा बारिक किस परतावा, आणि त्यावर खजुराचा लगदा घालुन लाटण्याने लाटावा. वरुन आक्रोड किंवा काजुची भरड पुड घालुन परत हलक्या हाताने लाटणे फ़िरवावे. मग स्विस रोल प्रमाणे गुंडाळी करावी. आणि फ़्रीजमधे थंड करुन चकत्या कापाव्यात. खोबरे किस नको असेल तर वगळावा, त्या ऐवजी पोलपाटाला थोडे तुप लावावे, किंवा प्लॅश्टिकचा कागद घ्यावा. खजुराचा लगदा निदान अर्धा सेमी जाडीचा असावा, त्याहुन पातळ लाटला तर रोल वळता येत नाही.
|
Rajshri
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:25 pm: |
|
|
नूट्रिला चन्क्स रेसिपिस कुणी सान्गेल काय
|
Chafa
| |
| Thursday, October 26, 2006 - 8:39 pm: |
|
|
राजश्री, न्यूट्रीला चंक्स, वांगं - बटाटा भाजीत फार छान लागतात (अर्थात न्यूट्रीला हा प्रकार मुळात आवडत असेल तर). भाजीत भरपूर टोमॅटो आणि कांदा लांब चिरून घालायचा आणि रस्सा भाजी करायची. शक्यतो ही भाजी कूकर मधेच करावी, त्याने सोयाचे गोळे छान मऊ शिजतात. किंवा ते मायक्रोवेव्हमधेही वेगळे शिजवता येतात. दिनेशनी लिहिल्याप्रमाणे आधी कोमट पाण्यात मीठ घालून भिजवून घ्यायचे.
|
भाज्यांच लोणचं कसं करायचं? फ्लॉवर,मटार,गाजर,तोंडली,हिरवी मिरची अस सर्व असलेल.? रुचिरामधल सोडुन. मी आतापर्यन्त जितके प्रकार टेस्ट केलेत त्यातल एक मला खूप आवडलेल. त्यात भाज्या छान करकरीत लागत होत्या. बारीक बारीक तुकडे होते भाज्यांचे. आणि वर छान लाल तवंग होता तेलाचा. आह! लवकर द्या बरं रेसिपी.
|
Prarthana
| |
| Friday, December 08, 2006 - 6:10 am: |
|
|
ज्या भाजीचे लोणचे करावयाचे आहे ती भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. त्यात तिखट मीठ चवीप्रमाणे साखर घालावी. लोणच्याचा मसला १ चमचा व लिंबाचा रस २ चमचे घालावा व वरून नेहेमीप्रमाणे फ़ोडणी द्यावी मी कालच गाजराचे लोणचे केले होते छान झाले फ़्लाॅवर व वाटाणा एकत्र करायचे असल्यास एक वाफ़ देऊन केले तरी छान होते
|
Dineshvs
| |
| Friday, December 08, 2006 - 4:15 pm: |
|
|
शर्मिला, आपल्याकडच्या लोणचे घालायच्या जा पद्धति आहेत त्यात लोणचे मुरणे म्हणजे फोडी मऊ होणे अपेक्षित असते. फोडी करकरीत राहण्यासाठी भाज्या व्हीनीगरमधे बुडवुन घेणे आवश्यक आहे. भाज्या साधारण चार तास व्हीनीगर मिश्रीत पाण्यात बुडवुन फ़्रीजमधे ठेवल्या तर त्या करकरीत होतात. या पाण्यात मीठहि घालावे. ईथे व्हीनीगर वर बरीच चर्चा झाली होती. खुप जणानी पर्याय विचारला होता. जर लोणचे टिकवायचे नसेल तर अर्धा लिटर पाण्यात पाव कप लिंबाचा रस घालुन त्यात भाज्या बुडवुन फ़्रीजमधे ठेवायच्या. याने भाज्या करकरीत होतील. पण हे लोणचे फार टिकणार नाही. मसाले, तेल वैगरे आपल्या आवडीप्रमाणे. वरच्या यादीत, बीट, शलजम, मुळा, छोटे कांदे, आवळे असे बरेच काहि add करता येईल.
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 19, 2006 - 10:23 am: |
|
|
Swa-26 असे काहि नाही.मलाच सापडत नव्हते ते पोस्ट. मला वाटते उरलेल्या दिवाळीच्या पदार्थांचे काय करावे, अश्या चर्चेत मी ते लिहिले होते. कारली पोखरुन मीठाच्या पाण्यात वाफवुन घ्यायची. करंजीच्या पुरणात तिखट, मीठ, चिंचेचा कोळ घालायचा आणि ते सारण भरुन कारली दोर्याने बांधायची. मग तेलात परतायची. अहमदाबादी बोरे खाऊनच संपवावी लागतात. गावठी बोरे वाळवुन ठेवता येतात. त्या त्या मोसमात मिळणारी फळे आवर्जुन भरपुर खायची. मह्त्वाची खनिजे त्यात भरपुर असतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|