|
Surabhi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:12 pm: |
| 
|
"षटरसात्मक चटणी" रोज इथे नव्या नव्या चटणींच्या varities वाचून एका आयुर्वेदिक मासिकात आलेली गुढी पाडव्याच्या दिवशी, चैत्रात बनवायची ही चटणी आठवली. गुढी पाडव्याला वेळ आहे तरी ती आताच लिहितेय. चटणी खरच छान लागते. किंचीत कोवळी मध्यम आकारची एक कैरी, कडुनींबाची (गुढी पाडव्याला वापरला जातो तो) पंधरा पाने, अर्धा नारळ, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, सुपारी एवढा गूळ एक चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ. फोडणीसाठी एक चमचा तेल, १ / २ चमचा मोहरी, १ / २ च. जिरे, एक चिमूट हिंग, पाव चमचा हळद. कैरी साल काढून किसावी. इतर साहित्या बरोबर वाटावी. वरून फोडणी दिल्याने ह्या चटणीची लज्जत वाढते. कोवळ्या कैरीत आंबट बरोबर तुरट रस ही असतो. कडुनिंबाचा कडू रस, गुळाचा मधुर रस, तिखटाचा तिखट रस, मीठाचा खारट रस अशा सहा रसांनी ही चटणी आरोग्यकारक आहे.
|
Prady
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:15 pm: |
| 
|
छानच वाटतेय गं ही चटणी. आणी कोवळी कैरी... पाणीच सुटलं तोंडाला.
|
छान लागते पण कडू लागते बरका ही चटणी... आठवत आहे ना सगळ्यांना?....
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 12, 2006 - 4:16 pm: |
| 
|
आमच्या घरी गुढीपाडव्याला हि चटणी पानात हवीच. ती खाऊनच जेवणाची सुरवात करायची असते. ख्रिशचनामधे पण नववर्षाची सुरवात कारल्याचा रस पिवुन करतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|