|
Supermom
| |
| Monday, September 11, 2006 - 1:58 pm: |
| 
|
आवळ्याची चटणी चांगले मोठेसे,डाग नसलेले आवळे कुकर मधे उकडून घ्यावेत. दोन शिट्या पुरेत. फ़्रोजन पण चालतील. इंडियन स्टोर्स मधे gooseberry या नावाने मिळतात. बिया व जमतील तितक्या शिरा काढून टाकाव्यात. हाताने नीट कुस्करावेत.मोठ्या किसणीवर किसले तरी चालेल. मग यात चवीप्रमाणे मीठ,तिखट,जिरेपूड व थोडा गूळ किसून मिसळावा. नीट एकजीव करावे. वरून मोहरी,हिंग व हळदीची खमंग फ़ोडणी द्यावी. हिन्ग नेहेमीपेक्षा किंचित जास्त असावा.पुन्हा नीट एकत्र करावे. नागपूरला आवळ्यांच्या दिवसात ही चटणी बरेचदा होते. आंबटगोड, रुचकर लागते.
|
Dineshvs
| |
| Monday, September 11, 2006 - 5:22 pm: |
| 
|
सुपरमॉम, सहज उत्सुकता म्हणुन विचारतोय. या आवळ्याना कोकणात डोंगरी आवळे म्हणतात. पण ते तसे ईथे दुर्मिळ आहेत. ईथे राय आवळे जास्त असतात. त्याची ईथे मिरची, खोबरे घालुन चटणी वाटतात. या चटणीला निळसर हिरवा रंग येतो. असे आवळे तुमच्या विदर्भात मिळतात का ? या दोन्ही आवळ्यांची झाडे एकमेकापासुन बरिच वेगळी असतात.
|
Supermom
| |
| Wednesday, September 13, 2006 - 11:37 am: |
| 
|
दिनेश, तुम्ही म्हणता ते राय आवळे व नेहेमीचे आवळे-दोन्ही विदर्भात मिळतात.फ़क्त राय आवळे नेहेमीच बाजारात दिसत नाहीत. नेहेमी दिसतात ते आकाराने थोडे मोठे आवळे. त्यांनाच तुम्ही डोंगरी आवळे म्हणताय बहुतेक. राय आवळे त्यामानाने लहान. अन कधी कधीच येतात विकायला. अर्थात खेड्यात नेहेमी असतील तर नाही माहीत. माझ्या लहानपणी दारावर बनारसी आवळे म्हणून एक प्रकार विकायला येई. नेहेमीच्या आवळ्यापेक्षाही खूप मोठ्ठा अन चमकदार असायचा तो. ते आवळे मिळाले की आई ते आवर्जून घेऊन त्याचा मोरावळा करून ठेवीत असे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|