|
डाळ वांग्याची ऑथेंटीक रेसिपी कोणाला माहिती आहे का?
|
Karadkar
| |
| Friday, September 08, 2006 - 6:16 pm: |
| 
|
refer, Ogale Ajji's Ruchira That recipe turns out really nice.
|
Bee
| |
| Saturday, September 09, 2006 - 2:50 am: |
| 
|
माझ्याकडे इथे कुठलेच cook-book नाही आहे. कुणीतरी ही कृती लिहून काढाल का?
|
Nayana
| |
| Monday, September 11, 2006 - 2:29 pm: |
| 
|
साधी माणसे ही site http://www.mumbai-masala.com/maharashtrafood/dalvang.html चेक कर. मी ही करुन पाहीली आहे. मला खूप आवडली.
|
Dineshvs
| |
| Monday, September 11, 2006 - 4:16 pm: |
| 
|
कमलाबाई ओगल्यांची कृति अशी आहे. एक वाटी तुरीची डाळ शिजवुन घ्यावी. तेलाची फ़ोडणी करुन त्यात एक वाटी वांग्याच्या फ़ोडी घालाव्यात व परतुन घ्याव्यात. आवडीप्रमाणे तिखट मीठ, गुळ व चिंच घालावी. दोन चमचे काळा मसाला घालावा. त्याशिवाय दोन चमचे धणे, एक चमचा जिरे, पाव वाटी सुके खोबरे भाजुन वाटुन घालावे. डाळ घोटुन घालावी व उकळावे. वरुन कोथिंबीर घालावी. मला स्वतःला कोल्हापुरी चटणी घालुन केलेला प्रकार जास्त आवडतो. हि आमटी शिळी होवु द्यावी व शिळ्या भाकरीबरोबर खावी. काय मिनोती, बरोबर ना ?
|
Karadkar
| |
| Monday, September 11, 2006 - 10:35 pm: |
| 
|
हो दिनेश, डाळ वांगे करताना जर कांदा लसुण मसाला वापरला तर अप्रतिम होतो. पण सगळ्याना तो आवडतोच असे नाही. मी शिळी भाकरी अजिबात खात नाही, कारण आमच्या भाकरी एकदम पातळ असतात आणि त्या शिळ्या झाल्या की कडक होतात. त्यामुळे मी आपले ताज्या भाकरीबरोबर खाणेच पसंत करते.
|
डाळ वांगं विदर्भात माझ्या सासरी अजुन वेगळ्या पध्दतीने करताना पहिलय . कुकर मधे वांगी आणि डाळ एकत्र तेलावर परतून घेतात . त्यात मसाला , धने जीरे पूड आणि परतलेला कांदा पण घालतात . मग त्यात पाणी , किसलेले आले आणि हळद घालून कुकर मधे दोन ते तीन शिट्ट्यां पर्यंत शिजवतात आणि नंतर वरून लाल मिर्ची , थोडे नुसते लाल तिखट , लसूण आणि हिंगाची फ़ोडणी देउन serve करतात . यात वांगी जरा जास्त मऊ होतात पण दाल आणि वांगी एकत्र शिजवल्याने स्वाद छान येतो . त्यांचा काळ्या मसल्या सारखा वाटणारा मसाला पण बर्या पैकी strong असतो , यात इतर मसाल्यां बरोबर star anis, बडी इलायची वगैरेही असते . शिवाय मसाला करताना तेलावर नुसता परतत नाहीत तर deep fry करून घेतात सगळे आणि मग mixer मधून काढतात . छान लागते ही पण डाळ वांग्याची recipe. 
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 9:35 am: |
| 
|
धन्यवाद ही कृती इथे लिहिल्याबद्दल. एकदा मी तुरीची डाळ न घालता हरभर्याची डाळ घातली होती.
|
Raina
| |
| Friday, September 29, 2006 - 11:45 am: |
| 
|
विचारणा-या आणि सांगण्या-या सर्वांचे आभार! आज केले होते डाळवांगे..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|