Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चॉकलेटेस आणि त्याचे प्रकार ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » वड्या » चॉकलेटेस आणि त्याचे प्रकार « Previous Next »

Moodi
Saturday, September 02, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चॉकलेट फज

साहित्य : १ डबा नेस्ले मिल्कमेड, ३ फूल टेस्पून कोको पावडर, २ ते३ टेस्पुन साखर, ५० ग्रॅम बटर(घरचे लोणी चालेल),१ कप / वाटी नट्स( बदाम आणि अक्रोड)

कृती : जाड बुडाच्या पॅनमध्ये थोडे लोणी नीट सर्वत्र लावुन उरलेले लोणी(बटर),साखर आणि कोको एकत्र करुन ते पॅनमध्ये घालावे अन मंद आंचेवर घोटत रहावे.
नंतर त्यात मिल्कमेड आणि थोडे नटस घालुन मिश्रण परत मंद आंचेवरच शिजवावे.मिश्रण कडेने सुटु लागले की थाळी किंवा चौकोनी ट्रेच्या उलट्या( मागच्या) बाजूला लोणी / बटरचा हात लावुन हे मिश्रण थापावे, वर उरलेले ड्रायफ्रुट्स घालुन नीट थापावे अन गरम असतानाच चौकोनी वड्या पाडाव्या. ही वडी मऊ रहिली पाहीजे.

सोर्स संजीव कपूर


Moodi
Saturday, September 02, 2006 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधे चॉकलेट.

साहित्य : १ वाटी कोको पावडर, १ वाटी स्कीम्ड मिल्क पावडर, १ वाटी मैदा, ४ वाटी साखर, २ वाटी लोणी (बटर), अर्धा टीस्पुन( किंवा 5-6 थेंब) व्हॅनिला इसेन्स.

कृती : कोको, मैदा आणि स्कीम्ड मिल्कपावडर एकत्रच चाळा म्हणजे ते नीट मिक्स होईल.
नॉनस्टीक पॅनमध्ये दूध व साखर एकत्र गरम करा. साखर पूर्ण विरघळली म्हणजे लोणी आणि इसेन्स घाला. नंतर एकत्र चाळलेले मैदा, कोको आणि मिल्कपावडर त्यात घालुन लाकडी चमच्याने ढवळत रहा. मिश्रण दाट होऊन कडेने सुटू लागले की आंचेवरुन उतरवा.( ते घट्ट गोळा होण्याची गरज नाही)

आधी तयार असलेल्या चॉकलेटच्या रबरी मोल्ड मध्ये ते मिश्रण ओता. जर मोल्ड नसतील तर पुसटसा तेलाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये ओता आणि साधारण थंड झाले की वड्या कापा. आणि त्या वड्या बटर पेपर किंवा जिलेटीन पेपरमध्ये गुंडाळा.

जर प्रेझेंट द्यायचे असेल तर आधी बटर पेपरमध्ये गुंडाळुन मग गिफ्ट पेपरमध्ये नीट गुंडाळा आणी त्याची दोन्ही टोके मग ट्विस्ट करा.

दुसर्‍या प्रकारात अर्धे चॉकलेटचे मिश्रण ट्रे किंवा मोल्डमध्ये ओतुन त्यावर भाजलेले नट्स( बदाम, शेंगदाणे किंवा पिस्ते वगैरे) घालुन मग उरलेले चॉकलेटचे मिश्रण ओता.

सोर्स लोकप्रभा.


Moodi
Saturday, September 02, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी चॉकलेट्सचे प्रकार करतांना जे चॉकलेट आणणार आहात(ज्याला कुकिंग चॉकलेट म्हणतात. सौम्य चवीकरता पांढरे(व्हाईट चॉकलेट) वापरावे.) ते ताजे असले पाहीजे, त्याचा तुकडा जर मोडला तर वाळकी काडी तुटताना जो कट( कटकन तुटलेली काडी) आवाज येतो ना तसा आवाज आला पाहीजे.

चॉकलेटचे मिश्रण करताना म्हणजे सॉस किंवा केक वगैरे करता आधी मोठ्या पॅनमध्ये पाणी उकळत ठेवुन ( किंवा गरम पाणी घालुन) त्यात दुसरे दांडी असलेले भांडे(जसे सॉसपॅन)ठेवावे. अन त्यात हे चॉकलेट वितळावे, पण बाहेरचे पाणी त्यात उडले नाही पाहीजे.(बॉयलर असल्यास उत्तम)


Moodi
Wednesday, September 06, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चॉकलेट फज प्र. २

साहित्य : ५० ग्रॅम बटर (थोडे अजून बटर वेगळे ठेवावे), १०० ग्रॅम प्लेन चॉकलेट (तुकडे करावेत), ५ टेबलस्पून इव्हॅपोरेटेड मिल्क, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, ४५० ग्रॅम आईसिंग शुगर चाळुन घेतलेली, ५० ग्रॅम बदाम, अक्रोड, हॅझलनट चे भाजलेले बारीक तुकडे( ऐच्छीक), १०० ग्रॅम प्लेन चॉकलेट वेगळे सजावटीकरता.

कृती : साधारण 18-20 सेमीचा( 7-8 इंच) चौकोनी टिनला आतुन सर्वत्र बटर नीट लावुन घ्यावे(चोळावे)

एका सॉसपॅनमध्ये किंवा छोट्या हिटप्रुफ बाऊलमध्ये ( हा बाऊल गरम पाण्याने भरलेल्या भांड्यावर बसवुन घ्यावा / ठेवावा म्हणजे बाहेरचे पाणी तर आत उडणार नाही पण त्याने मिश्रण डायरेक्ट गॅसवर ठेवायची गरज पडणार नाही) बटर, इव्हॅपोरेटेड मिल्क आणि साधे चॉकलेट एकत्र करावे अन वितळवुन घ्यावे. सारखे चमच्याने मऊ होईपर्यंत हलवत रहावे. त्यात मग व्हॅनिला इसेन्स घालावा.

नंतर हे मिश्रण दुसर्‍या भांड्यात काढलेल्या आईसिंग शुगरमध्ये ओतावे. आणि भाजलेले नट्स घालुन मग नीट हलवुन एकत्र करावे. एकजीव होईपर्यंत फेटावे. नंतर ते त्या टिनमध्ये ओतुन गार हवा असलेल्या जागी सेट होण्यास ठेवावे. जेव्हा पूर्ण थंड होईल तेव्हा दुसरे सजावटीकरता ठेवलेल चॉकलेट आधीच्याच पद्धतीने वितळवुन घ्यावे. मऊ होऊ द्यावे. नंतर ते गार झालेल्या टिनमध्ये तयार फजवर ओतावे. स्पॅट्युलाने हलकेच दाबुन बसवावे. आणि फोर्कने दाबल्यासारखे करावे( फोर्कने टोचे मारु नयेत, फक्त उलटी मुठ दाबतो तसे दाबावे). परत गार होऊ द्यावे मग सेट झाले की चौकोनी वड्या पाडाव्यात. आणि एअरटाईट कंडेनरमध्ये भरावेत.

साधारण ५० ते ५० फज होतात. नटसच्या ऐवजी ग्लेझ्ड चेरीजचे तुकडे वापरु शकता. सौम्य चव हवी असेल तर व्हाईट चॉकलेट वापरावे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators