|
Moodi
| |
| Monday, December 05, 2005 - 3:17 pm: |
|
|
अळिवाचे लाडु साहित्य : २ नारळाचा चव ओले खोबरे, ५० gram अळीव, अर्धे जायफळाची पुड, २ वाट्या चिरलेला गुळ, अर्धी वाटी साखर, ५-६ वेलदोड्यांची पुड, कृती : एका पातेल्यात निवडलेले अळिव नारळ्याच्या चवात म्हणजे त्या किसलेल्या ओल्या खोबर्यात ३-४ तास झाकुन ठेवावे. नंतर ते फुलल्यावर त्यात गुळ अन साखर घालुन ते gas वर मंद आंचेवर शिजायला ठेवावे, मधुन मधुन ढवळावे. शिजत आले की त्यात वेलदोडा अन जायफळ पुड घाला. कडेने मिश्रण सुटत आले की पातेले खाली काढुन ते घोटुन घ्या अन तुपाच्या हाताने मिश्रण कोमट असताना लाडु वळा. वरील लाडुन साखर घातली नाही तरी चालते. अन हवे असल्यास लाडुचे मिश्रण शिजताना एखादे चमचा तुप घाला. काही लोक अळीव नारळ्याच्या गोड पाण्यात ३-४ तास भिजत ठेवतात अन मग फुलले की नारळाच्या चवात घालुन शिजवतात.
|
Karadkar
| |
| Monday, December 05, 2005 - 6:43 pm: |
|
|
मूडी तुला अनेकानेक धन्यवाद. मी आज हि रेसीपी विचारणार होते
|
Moodi
| |
| Tuesday, December 06, 2005 - 2:15 pm: |
|
|
कराडकर एक कृती अजुन देतेय, बघ कशी आहे ती, अर्थात पटली तर करुन बघावी सर्वानी. साहित्य : २ वाटी गाजराचा किस, पाव वाटी अळिव, २ वाटी गुळ, वेलदोडा अन जायफळ पुड, १ वाटी ओले खोबरे म्हणजे नारळाचा चव. अळीव धुवुन खोबर्यात २ तास ठेवावेत. नंतर अळिव, खोबरे अन गाजराचा किस एकत्र मंद आंचेवर शिजत ठेवावा. अर्धवट शिजत आला की गुळ घालावा अन परत शिजायला ठेवावे, मधुन मधुन हलवावे. पूर्ण शिजला की उतरवण्या आधी वेलदोडा अन जायफळ पुड घालावी अन घोटावे. मग उतरवुन तुपाच्या हाताने लाडु वळावेत. अर्थात जर अळिवाचे लाडु करशील तेव्हा त्यातलेच मिश्रण वेगळे काढुन त्यात गाजराचा किस घालुन थोडा नमुना म्हणुन करुन बघ, म्हणजे नाही आवडले तरी वाया जाणार नाही
|
Sis_trio
| |
| Tuesday, September 12, 2006 - 4:50 am: |
|
|
Aliwala English kinwa Gujrati madhye kay mhantat konala mahit aahe ka? Also, SF bay area madhye which grocery store carries it, anyone knows? Thank you much, Sis
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|