|
Manuswini
| |
| Saturday, August 18, 2007 - 7:31 pm: |
| 
|
हे झटपट रवा लाडु, जर रवा भाजून ठेवला असेल तर अगदी अर्ध्या तासात होतात. मी कालच नैवेद्याला केले शुक्रवार म्हणून. बारीक रवा दोन वाटी, रोजचे वेलची पूड,काजु,केसर वगैरे वगैरे, खोबरे मात्र सुखे घ्यायचे,काळी पाठ(माझी आजी म्हणायची) काढुन किसलेले सुखे खोबरे नी किंचीत तूपात भाजून चुरून ठेवायचे गरम असतानाच(हे कधीही वापरता येते नी खवटत नाही), nestle sweetned condensed milk 250 gram डब्बा, तुम्हाला हवी तर साखर( मी अती गोड आवडत नाही), रवा तूपात खंमग भाजून झाला की त्यात किंचीत गरम दूध शिंपडून फुलवायचा नी आता gas मंद करून sweetened milk ओतून चांगले mix करायचे. आता खोबरे टाकून ढवळून घ्यायचे मिश्रण जवळपास कोरडे होत आले की काजु,वेलची,केसर टाकून बांधा रहु शकतील आरामात बाहेर १०-१२ दिवस करण मिश्रण कोरदेच असते. नी गरम असतानाच दाबून वळायचे तूपाचा हात घेवून. अजीबात दूध वगैरे टाकु नये नंतर. मी काल थोडेसे प्रसादाला आणलेले मावा पेढे पण टाकून ढवळून भाजुन घेतले, खोबरे टाकल्यावर. काय लागतात म्हणुन सांगु हे लाडू म्हणुन इथे लिहिले. करून पहा
|
वा मनु मस्तच वाटतेय रेसिपी!! खोबरे साधारण किती घ्यायचे? ईथे मिळणारे श्रेडेड सुके खोबरे घेतले तर चालेल का?
|
Manuswini
| |
| Tuesday, August 21, 2007 - 4:48 pm: |
| 
|
मी जवळपास सगळेच अंदाजाने घेते. खोबरे तु २ वाटी रव्याला पाव वाटी टाक. मी ह्या वेळेला देशात गेले तेव्हा,गावाहून खोबरे आणले. तिकडे खोबर्याच्या वाट्या काळी पाठ काढून किसून भाजून ठेवतात( आजकाल मशिन आहे- इती मामी). इकडचे खोबरे काय चोथा. तेच वापरावे लागते गं. नसते तेव्हा. देशात थोडी ना दर वर्षी जायला मिळते. इकडे थोडासा एकदम भुसा type मिळते ते घाल. threaded पेक्षा बारीक. करंजी पुरणाला वापरतो ना ते. ते मावा पेढे मिळाले ना तर ते भजौन टाकुन नक्की पहा, छान लागतात.
|
मनु, कालच केले ग लाडू. मस्तच लागतात!! मनापासून धन्यवाद.
|
Shonoo
| |
| Sunday, October 28, 2007 - 2:55 am: |
| 
|
आज आई ला विचारून, मावशीला विचारून घाबरत घाबरत रव्याचे लाडू केले पहिल्यांदा. चक्क चांगले जमले सुद्धा. म्हणून ही Idiot proof रेसिपी. चार वाट्या रवा साडे तीन वाट्या साखर दोन वाट्या ओलं खोबरं घरी नारळ होता म्हणून ताजं खोबरं घातलं नाही तर इंडियन स्टोअर मधलं फ़्रोझन पण चालेल. थॉ करून घ्यायला पाहिजे पूर्ण. साखरेच्या निम्मं पाणी पाउण वाटी तूप पाव ते अर्धा वाटी काजू तुकडा केशर्-वेलची पूड अर्धा टी स्पून कढईत अगर जाड बुडाच्या भांड्यात तूप पातळ करून घ्यावे व त्यात रवा मंद आचेवर भाजुन घ्यावा. रवा भाजत आला की त्यात खोबरं घालून परतावे. साखर अन पाणी एकत्र करून मध्यम आचेवर उकळत ठेवावे. उकळी फुटल्यावर पाचेक मिनिटांनी एक तारी पाक तयार होईल. पाक गरम असतानाच रवा-खोबरं मिश्रण त्यात ओतून चांगलं ढवळून घ्यावं. केशर्-वेलची पूड, काजू वगैरे घालून नीट मिसळून घ्यावं. चार पाच तास न झाकता ठेवावं. सुरुवातीला मिश्रण पातळ वाटेल. पण पूर्ण गार झालं की घट्ट होईल. मग लाडू वळावेत. अगदी घट्ट वाटलं तर सगळं एका वेगळ्या microwave safe भांड्यात काढून थोडा वेळ microwave करता येईल. पण मला तरी तसं करायची वेळ आली नाही. माझी वाटी १६० मि लि. ची आहे. त्या मापाने चाळीस लाडू झाले.
|
Chinnu
| |
| Thursday, November 08, 2007 - 4:08 am: |
| 
|
मनुबाई, सहीच झाले गं रवा लाडू. खूपच धन्सं!
|
Prajaktad
| |
| Saturday, November 10, 2007 - 4:02 am: |
| 
|
यंदाचे बेसन्-रवा लाडु 
|
Manuswini
| |
| Saturday, November 10, 2007 - 8:48 am: |
| 
|
प्राजे, लाडू छान दिसताहेत. कुठे असतेस तु? US ला का? (नाही पाठवायची सोय आहे का म्हणून विचारते.) तुझे चुर्मा पण झाले की चांगले पण ते असे brown का दिसताहेत? brown सुगर वापरली?
|
Prajaktad
| |
| Saturday, November 10, 2007 - 9:05 pm: |
| 
|
मने!मी उसगावातच असते..बॉस्टनला.. चुर्मा लाडुला साधिच साखर वापरलीय..फोटो वाटतायत तसे..मुळात फ़िकुटलेत जरा रंगाला... पुर्ण फ़राळाचाच फोटो टाकतेय..सांग काय काय पाठवु ते? 
|
Manuswini
| |
| Sunday, November 11, 2007 - 3:44 am: |
| 
|
thanks ग एवढ्या प्रेमाने विचरलेस. मला चिवडा खुप आवडतो मी तो केला नाही ह्या वेळी. कंटाळले दोन दिवसात पाच पदार्थ करून. थकले ग. आता kitchen मध्ये एक दिवस तरी जाणार नाही.
|
Suparna
| |
| Thursday, November 29, 2007 - 10:40 am: |
| 
|
हल्ली ते रव्याचे fatless लाडू करतात ना... छान लागतात व सोपे पण आहेत.... एकदा टिव्हीवर सविता प्रभुणेनी करून दाखवले होते..... काल करून पाहीले... मस्त होतात.. एक वाटी रवा कोरडा भाजून घ्यायचा. त्यात मग एक वाटी ओले खोबरे आणि एक वाटी खवा मिसळून एका डब्यात हे मिश्रण ठेवून प्रेशर कुकरमधे ३-४ शिट्या होईपर्यंत वाफवावे. मग बाहेर काढून थोडे गार झाल्यावर त्यात एक ते दिड वाटी पीठीसाखर, वेलचीपूड, काजू-बेदाणे-बदाम इ. घालून छान मळून घ्यायचे.... थोडा दुधाचा शिडकावा द्यायचा... म्हणजे मळायला सोपे जाते... लाडू वळायचे.
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 11:22 am: |
| 
|
खवा आणि fatless जास्त fats असतात आणि protiens काहीच नाही. दुध जास्त आटवल ना की त्यातिल सत्व निघुन जाते.
|
Prajaktad
| |
| Thursday, November 29, 2007 - 11:22 am: |
| 
|
सुपर्णा! रवा मुरतो का ग छान? खवा न घालता करता येईल का?
|
Suparna
| |
| Thursday, November 29, 2007 - 2:35 pm: |
| 
|
प्राजक्ता आपण रवा, खव्या-खोबर्याबरोबर वाफवल्यामुळे थोडा मऊसरच होतो त्यामुळे लाडू छान होतात शिवाय दुधाचा हबका पण मारायचा. काल पहिल्यांदाच प्रयोग केला बिनपाकचे कसे होतील म्हणून. पण छान झाले. तुला खवा घालायचा नसेल तर मिल्क पावडर घालून पहाता येईल का? पण थोडं प्रमाण घेऊन कर हं.
|
Wel123
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:17 pm: |
| 
|
Thanks superna,khup diwaspasun hi recipe shodhat hote karan mala praman mahit navte.
|
Shmt
| |
| Thursday, December 13, 2007 - 3:31 pm: |
| 
|
Please मला कोणितरी लवकर मदत करा माज़े रव्याचे लाडु बिघडले आहेत. रवा पाकात टाकल्यावर मिश्रण आळुन आले नाही. मला वाटते पाक एकतारि होण्या आगोदर मी रवा पाकात टाकला. आता मी मिश्रण आळुन येण्यासाठि काय करु? please लवकर सांग.
|
Karadkar
| |
| Thursday, December 13, 2007 - 4:58 pm: |
| 
|
मायक्रोवेव मधे ठेवुन १-१ मिनीट गरम करुन थंड करुन किती आळतेय ते पहावे लागेल. शक्य असेल तर एका लाडवाचे करुन पहा आणि किती वेळात आळतेय ते लक्षात येईल.
|
Shmt
| |
| Monday, December 17, 2007 - 9:17 pm: |
| 
|
Thanks Karadkar मी microwave मध्ये ठेवुन गरम केल पण ते आळुन आल नाही जस लडवाला लागत तस मिश्रन झाल नाही. शेवटी मी gas वर मिश्रण आळे पय्रन्त आटवल आणि मग त्याच्या सान्जच्या पोळ्या केल्या.मस्त झाल्या होत्या.
|
Nyati
| |
| Monday, March 24, 2008 - 5:39 am: |
| 
|
shoonu, ravyache ladu kele tuzya padhtine,.masta zale ekdam..thanks 
|
उरलेले पेढे वापरुन वरील लाडू करता येतील का? कसे करावेत?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|