|
Kal war pramane ladu kele khoopach kadak zhalet kay karu???
|
फ़ोड बत्त्याने! 
|
Manuswini
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:42 pm: |
| 
|
रुतुजा, ज्यस्तीत ज्यस्त टेनीस खेळायला वापरु शकतेस ते लाडू. :-) just kidding तु काय पिठ गरम असताना साखर टाकलीस? मी बेसनादल्या रात्री भाजून दुसर्या दिवशी साखर घालून मळते.
|
Sami
| |
| Friday, October 20, 2006 - 2:00 am: |
| 
|
पीठ कोमट असताना साखर घालावी. आणि पूर्ण गार झालं की चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे मग लाडू खुसखुशीत होतो. आणि कडक होत नाही.
|
रुजुता, मुम्बई मसाला वेब वरची कृति एक्दम परफ़ेक्ट आहे. मी बनवलेले लाडू एकदा त्या रेसिपि नूसार, मस्तच झाले होते
|
Hmm, mi garam astana sakhar ghatli ani battyabol zhala. Mahit nhavta na..lagna nantarchi pahili diwali na...Anyways mi cooker madhye shijawle ladu ani shira mhanun wattun takle zhala. Pan chan lagala to prakar. Ofcourse garam astanach khawu shaklo gar zhalyawar parat dagad... mumbai masala warchi recipe try karun pahate aaj... Tumha Sarvana diwali chya shubhecha...rutu
|
Manuswini
| |
| Friday, October 20, 2006 - 5:16 pm: |
| 
|
रुतुजा आणखी एक करु शकली असतीस आता आठवले ते लाडू microwave मध्ये ठेवून नरम करून त्यात घट्ट दूध घालून ढवळून मग आवळले की त्याची बेसन वडी करु शकलीस असती. पुढील खेपेस असे झाले की नवर्याला सांग तुला surprize दिले मला माहीती होते तुला बेसन लाडू पेक्षा वडीच आवडते म्हणून वडी केली
|
Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 2:50 am: |
| 
|
हे माझे दिवाळीचे बेसन लाडु 
|
Mepunekar
| |
| Monday, October 30, 2006 - 5:50 am: |
| 
|
Wow! मनु,काय सही दिसत आहेत लाडू..तू microwave मधे केलेस का? काय प्रमाण घेतलेस?
|
Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 6:25 am: |
| 
|
thanks ग, नाही गं मी microwave मध्ये नाही केले, मी अगदी Typical आई style २ वाट्या चणाडाळ भाजली, रवाळ वाटली mixie मध्ये, पुन्हा तूप गरम करून त्यात मंदाग्नीवर बेसन भाजले. हे अगदी रवाळ असे लाडु होतात. एकदम भुगा नाही होत(गुळगुळीत पिठाचा तुपकट असा भुगा नाही होत), मग जरासे भाजुन खंमग वास सुटला तेव्हा कडकडीत तापलेले दूध पाव वाटी ओतले Gas वर असतानाच, चमचाने mix केले, एकदम फसफसते ते दूध टाकल्यावर. मग किंचीत जरा परतले. नी काढले, सकाळी उठले हाताने छान मळले(हो चांगलेच मळायचे), मग वेलची,जायफळ,केसर नी साखर टाकून मळले. मग एक काजु नी बेदाणा खोचुन बांधले. ..... try करून बघ खुप खुसखुशीत नी रवेदार होतात
|
Nandita
| |
| Monday, October 30, 2006 - 4:40 pm: |
| 
|
मनु पिठी साखर किती घ्यायची २:२ की त्यापेक्षा कमी? अणि हो तुपाच ही प्रमाण सांग. तसच बेसन भाजताना तुप किती घालायच ते ही सांग plz 
|
Arch
| |
| Monday, October 30, 2006 - 5:58 pm: |
| 
|
मनु, धन्य ग बाई तुझी. हल्ली लाडूचे बेसन मिळते. जरा रवाळ असते. मी ते वापरते. पण खरच तुझी धन्य आहे डाळीपासून सुरवात करतेस म्हणजे. लाडू अगदी छान दिसतायत. रंगही सुरेख आला आहे. परत एकदा, तुझ्या ह्या गुणांच चीज करणारा नवरा मिळो. हा आशिर्वाद.
|
मझे लाडु असेच दिस्ले होते फ़क्त रंग थोडा बिघड्ला होत, आकर थोडसा बिघड्ल होत, साखर थोडी कमि पड्ली होती, अणि दग्डी झले होते, बाकि अस्सेच हो..्अ ह ह ह
|
मनु छानच अहेत लाडु आग्दी रुख्वतत ठेवावेत असे
|
Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 8:49 pm: |
| 
|
thanks very much for आशिर्वाद आर्च, अग मला cooking आवडते, मजयाकडे freinds पण पडीक असतात ने coooking is relxation लाडु बेसन चांगले असते माझी बहिण वापरते ना तेच, मी आपले आवडीने डाळ वाटुन करते गं नंदिता, मी पिठीसाखर नाही वापरली, इथे जी मिळते ना ती वाटते परत, माझे साखरेचे प्रमाण नेहमीच अंदाजाने असते कारण मी लाडु खुप गोड किंवा गोडच नाही असे नाही करत. specially बेसनात चुकुन ज्यास्त साखर पडली तर चव बिघडते. २ वाट्या बेसनाला(वाटलेल्या ) मी US मधील रोजची साखर १ वाटी टाकते, नी चव घेते परत मळते एक सारखे पिठ, कमी वाटली तर टाकते परत. मी पिठीसाखर चे प्रमाण सांगु शकत नाही, तरी साधारण १ ते दीड वाटी लागते साखर माझ्या खव्वय्या friends म्हणली की बेसन लाडु व्यवस्थीत गोड आहेत. तर बघ चव घेवुन नी टाक ज्यस्त तुला साखर आवडते असेल तर. २ वाट्या बेसन तर दीड वाटी साखर, तूप हे मी परत अंदाजाने घेते. बेसन आधीच साधरण भाजलेले, त्यात डाळ पण भाजलेली तेव्हा मी बहुतेक बेसनच्यावर तूप जरा राहील असे टाकते. एक काम कर २ वाट्या बेसन असेल तर तु १ वाटी तूप गरम कर. त्यात बेसन टाक, नी बघ तूप बेसनच्या वरती किंचीत येते आहे का? किंवा कमी वाटले तर टाक आणखी. sorry ग मी हे सर्व अंदाजाने घेते तेव्हा मी नीट सांगु शकत नाही. एवढेच सांगेन की बेसनच्या जरा वर तूप लागेल टोपात. In short असे २ वाट्या बेसन, तूप जरा वर बेसनापेक्षा, साखर दीड वाटी(चव घेवून मळून कमी वाटली तर आणखी टाक्त्यात).
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 31, 2006 - 1:50 am: |
| 
|
मनुस्विनी, लाडु छानच आहेत. या लाडवाना ईतकी मेहनत घ्यावीच लागते. फक्त फोटो काढताना फ़ॉईल वा ताटाच्या जागी, नॉन ग्लेझ्ड डिश वापरायची म्हणजे रिफ़्लेक्शन न येता छान फोटो येतो.
|
Mepunekar
| |
| Tuesday, October 31, 2006 - 5:51 am: |
| 
|
Thanks मनु, फ़ार छान महिती दिलियेस तू! मी पण Arch म्हणाली तस लाडू चे बेसन वापरले. अता मी पण तुझ्या पद्धतिने करुन बघेन नक्की!
|
Manuswini
| |
| Tuesday, October 31, 2006 - 6:44 am: |
| 
|
thanks दिनेशदा, खरेच तुमच्याकडून अशी पावती मिळणे म्हणजे छानच, i mean it, because you have rich knowledge in this area, personally, maayboli site has been always encouragement for me since I joined. it has been my 'sakhee' for my loneliness........... thanks मीपुणेकर
|
Nalini
| |
| Tuesday, October 31, 2006 - 10:00 am: |
| 
|
मनु, लाडू मस्तच झालेत. अगदी उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय. चुर्म्याचे लाडू पण छानच जमलेत तुला. आर्च म्हणते तसा ह्या गुणांच कौतुक करणारा नवरा मिळो.
|
Nandita
| |
| Tuesday, October 31, 2006 - 10:14 am: |
| 
|
THANK U MANU मी करुन बघतेच आता अणि नंतर लिहते कसे झाले ते
|
Manuswini
| |
| Tuesday, October 31, 2006 - 7:33 pm: |
| 
|
thanks नलिनी, नंदिता सांग नक्की लाडु झाले की
|
Akhi
| |
| Monday, February 18, 2008 - 4:06 am: |
| 
|
बेसनाचे लाडु करताना ते सोनेरी रंगाबर भाजुन झाल्यावर त्यावर दुध कींवा पाणी शिंपडतात. उच्च तापमानामुळे त्याची वाफ होउन ती बेसनात शिरते व बेसनातिल अमायलोज अ अमाय्लोबे पेक्टीन विरघळुन बेसन फुलते व हलके बनते. बेसनाचे कण मोठे झाल्याने लाडु घशाला चिटकत नाही.
|
Archana77
| |
| Tuesday, March 25, 2008 - 12:09 am: |
| 
|
Thanks Manuswani.Tumhi lihalelya pramane me 2.5kg che ladoo kele hote hya holi la,aagadi dalun aannyapasun tayari keli hoti,aani result mhanaje sagalyana kupach aavadale .agadi hit zale Besanache Ladoo.ashyach chan chan recipes lihat ja thanks again!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|