|
कोणाला कणकेचे लाडू येतात का? असेल तर प्लीज कोणीतरी कृती टाकेल का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 10, 2006 - 1:42 am: |
|
|
रचना. नुसते कणकेचे लाडु बेसनाप्रमाणेच करायचे. फक्त ते कमी भाजावे लागते. बुलढाणा भागात वेगळे लाडु करतात. गहु पाण्याने भिजवुन पसरुन सावलीतच वाळवायचे. पुर्ण वाळले कि दळुन आणायचे. ते पीठ मैद्याच्या चाळणीने चाळुन घ्यायचे. मग ते तुपावर भाजायचे. त्यात किलो भर पिठाला अर्धा किलो पिठीसाखर घालायची आणि मग त्याचे लाडु वळायचे. यात फक्त तुपच वापरायचे. हवे तर सुका मेवा घालायचा.
|
Moodi
| |
| Wednesday, May 10, 2006 - 4:57 pm: |
|
|
रचना असे आहेत बघ कणकेचे लाडू. साहित्य : १ वाटी कणिक, अर्धी वाटी गुळ, एक छोटा टीस्पुन वेलदोडा अन जायफळ पुड. तुप अंदाजे अर्धी पाऊण वाटी. कृती : जरा जास्त तुपावर कणिक खमंग भाजुन घ्यावी. ताटात काढुन मग कोमट असतानाच गुळ किसुन घालावा अन वेलदोडा जायफळ पुड घालुन सर्व एकजीव करुन लाडू वळावेत. आधी यातील थोडे प्रमाण घेऊन करुन बघ, मग आवडले की जास्त करु शकतेस. दुसर्या पद्धतीत म्हणजे यात सुके खोबरे भाजुन त्याची पुड करुन घालु शकतेस. खारीक पण पुड करुन घातली तरी चालेल. मात्र खारीक, डिंक, बदाम, पोहे हे हिवाळ्यात जास्त वापरतात, पण बदल म्हणुन खारीक अन खोबरे केव्हाही चालेल.
|
thankyou मुडी, दिनेश, मिनोती.. सही झाले बरका लाडु माझे. Thankyou thankyou very much . दिनेश, चुर्म्याचे लाडू प्रकार थोडा अवघड वाटतो आहे. गोळीबंद पाक वगैरे म्हंटल की जरा भिती वाटते. पण मी करेन कधीतरी प्रयोग
|
Dineshvs
| |
| Friday, May 12, 2006 - 4:45 pm: |
|
|
चुर्मा लाडवाला पाक नाही केला तरी चालतो. त्यात पुरेसे तुप असतेच त्यामुळे पिठीसाखर वा साधी साखर, तशीच घातली तरी चालते. मजा म्हणजे लाडु नाही वळले तरी चालतात.
|
Moodi
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:03 pm: |
|
|
कणकेचा लाडू प्रकार २ साहित्य : २ वाट्या कणिक, २ वाटी चिरलेला किंवा किसलेला चांगला गूळ, १ वाटी चांगले तुप, वेलदोडा जायफळ पूड. कृती : कणिक कोरडीच खमंग भाजुन घ्यावी.( तूप घालुन नाही). गूळ कढईत घालून त्यावर चमचाभर पाणी टाकून गरम करावा. विरघळला की बंद करावा. तूप अगदी खमंग कढवुन झाले की त्याच वेळीस गूळ अन कणिक एकत्र करुन चमच्याने कालवावी. ( भारतात घरी साजूक तूप जे तयार होते ते वापरावे, बाहेर देशात मात्र तयार तूप गरम करुन वितळवुन घ्यावे) मग त्यावर गरम तूप ओतावे, वेलदोडा जायफळ पूड पण घालावी अन कोमट असतांना लाडू वळावे.
|
Moodi
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:09 pm: |
|
|
कणकेचा लाडू प्रकार ३. साहित्य : २ वाटी कणिक, अर्धी वाटी तूप, २ वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी खारीक पूड, अर्धी वाटी सुके खोबरे कीस, मोठा चमचा भरून खसखस,, काजू, बदाम काप, बेदाणे, वेलदोडा पूड. कृती : तूपावर कणिक खमंग भाजून घ्यावी. खसखस अन खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे अन मिक्सरवर अगदी बारीक करावे. कणिक भाजत आली की त्यातच खारीक पूड घालावी अन मिनिटभर परतावे. मग उतरवुन इतर सर्व जिन्नस घालून लाडू करावेत. पीठ फार कोरडे वाटल्यास गरम तुप घालावे. महिनाभर रहातात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|