|
thanks mrinmayee मि भरली तोन्डली आणि मटकीची उसळ करायचे ठरवते आहे. आणि कान्दा भजी आता मझ्याच तोन्डाला पाणी सुटायला लागल आहे
|
Surabhi
| |
| Saturday, August 19, 2006 - 5:50 am: |
| 
|
मृण्मयी, मी पण मूग वड्या घालून भाजीची वाट पाहातेय! 
|
Prajaktad
| |
| Saturday, August 19, 2006 - 10:46 am: |
| 
|
सुरभी!अग म्रुण्मयी ने दिली आहे क्रुति कालच!भाज्याच्या बीबीवर आहे ब्रिंजल रेसिपी मधे..
|
Savani
| |
| Wednesday, August 23, 2006 - 3:41 pm: |
| 
|
मला उपासासाठी चालेल असा एक गोड पदार्थ सुचवा कोणीतरी. थोडासा नवीन, innovative असेल तर उत्तम.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:15 pm: |
| 
|
मी रताळ्याच्या करंज्या लिहिल्या होत्या. छान लागतो तो प्रकार. वर्याच्या तांदळाची खांडवी वा शिरा चांगला लागतो. त्याच तांदळाची गोड खिचडी चांगली लागते. रताळे, भोपळा यांचे आईसक्रीम. बटाट्याची जिलेबी, शेंगदाण्याचा मैसुर पाक, काजु कतली, रताळ्याचे गुलाबजाम, रसमलाई हेहि प्रकार छान आहेत.
|
Moodi
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:22 pm: |
| 
|
सावनी आणखीन एक. हे इथे बघ अमेरीकन स्टाईल मोदक. वाटल्यास काजू पूड घाल यात मिल्क पावडर ऐवजी. आणि कंडेंस्ड मिल्क पण वापरु शकतेस. http://www.esakal.com/esakal/08232006/NT00C9F97A.htm
|
Savani
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:22 pm: |
| 
|
ए मागे कोणीतरी इथे उपासाचे गुलाबजाम (बटाट्याचे बहुदा) बद्दल चर्चा केली होती न? कुठे आहे? किंवा कोणाला येत असतील तर रेसिपी द्या न.
|
Savani
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:25 pm: |
| 
|
दिनेशदा, वा! केव्हढे प्रकार माहित आहेत तुम्हाला. रताळ्याच्या करंज्या मी वाचल्या पण त्याच्या कव्हर साठी उपासाची भाजणी वापरू का कणकेऐवजी? आइस्क्रीम कसं करायचं आणि?
|
Savani
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:28 pm: |
| 
|
मूडी, मस्तच आहे ग रेसिपी. करायला पण सोप्पी वाटतीये. बघते, अगदीच काही नाही सुचलं तर हेच करीन.
|
Moodi
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:33 pm: |
| 
|
सावनी काजू आणि बदामाची किंवा पिस्त्यांची भरड पूड वापरु शकतेस याकरता. तयार तर मार्केटमध्ये मिळतेच. आणि बीबीसीची ही लिंक बघ, यात प्रसिद्ध शेफ मधूर जाफरी यांनी ही बर्फी दिलीय, मी पाहिली होती, सोपी आहे. मात्र मी अजून केली नाही, विसरते सारखी. पण वर्ख आणि खसखस नको वापरुस. http://www.bbc.co.uk/food/recipes/database/coconutpistachioswee_5096.shtml
|
Prady
| |
| Wednesday, August 23, 2006 - 5:42 pm: |
| 
|
मोदकाची रेसेपी आहे छान पण देवधर बाईंनी त्याला अमेरिकन स्टाईल मोदक का नाव दिलय देव जाणे. ते असामी असामी मधे हिंदमाता वगैरे घातलं उखाण्यात की छान त्यातला प्रकार वाटतो.
|
Storvi
| |
| Wednesday, August 23, 2006 - 8:54 pm: |
| 
|
आम्ही रताळ्याचे काप करतो, गुळ घालुन सोप्प असतं आणि छान लागतात
|
Dineshvs
| |
| Thursday, August 24, 2006 - 3:33 am: |
| 
|
रताळ्याच्या करंज्यासाठी भाजणीपेक्षा राअज्गिर्याचे पीठ चालेल. आईसक्रीमसाठी शिजवलेला गर थोडा आटवुन त्यात अरारुट लावलेले आटवलेले दुध आणि साखर घालायची. परत परत घोटुन आईसक्रीम करायचे. जाहिरातीत दाखवतात ते आईसक्रीम बटाट्याचेच असते, कारण तीव्र प्रकाशात खरे आईसक्रीम वितळते.
|
Surabhi
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:43 am: |
| 
|
सावनी, तुझ्या रविवारच्या पार्टीसाठी उपासाच्या पदार्थचे एक तिखट व एक गोड suggestion. तिखटात- "साबुदाण्याचे दहीवडे". पार्टीत गरम गरम साबुदाणेवडे सर्व्ह करणे कठीण असते तेव्हा हे करणे सोपे जाईल. बटाटे उकडून त्यात भिजवलेले साबुदाणे, शेंग्दाण्याचे कूट, आले-मिर्ची वाटून घालून गोल वडे तळून काढलेस की ते सर्व्हिंग डिश मधे रचून घे. ताजे लावलेले दही फेटुन त्यात मीठ, साखर व वरुन जीरे, कडेपत्ता, लाल मिर्चीची फोडणी घालून ते दही सर्व्ह करण्याआधी पांच मिनिटे गार वड्यांवर ओतून कोथंबीरीने सजावट कर. गोड पदार्थ तू "बटाट्याचा हलवा" करू शकतेस. उकडलेल्या बटाट्याच्या लगद्याच्या अर्ध्याने साखर घालायची, खवा किंवा क्रीम लगद्याच्या पाव पटीने घालायचे व थोडे साजूक तूप घालून घट्ट होई पर्यन्त ढवळायचे. वेलचीपूड घालायची. पेपर कप्स मध्ये हलव्याच्या लहान लहान मुदी पाडून त्यावर बदाम पिस्त्याचे काप टाकुन हे सर्व पेपर कप्स एक डिश मधे रचले की छान दिसतील. पार्टी कशी झाली ते सांगायला विसरू नकोस. 
|
Prajaktad
| |
| Thursday, August 24, 2006 - 2:50 pm: |
| 
|
बटाट्याचा शिरा / हलवा microwave मधे पटकन होतो. रताळे-बटाटे एकत्र करुन केलेला शिरा जास्त चविश्ट होतो.
|
Sami
| |
| Monday, August 28, 2006 - 1:51 pm: |
| 
|
मला तांदळाच्या भाकरीबरोबर कुठलीतरी झणझणीत भाजी सुचवा please . पिठलं नकोय. वीकेंड ला मैत्रिण आणि तिचा नवरा येणार आहेत. तेव्हा करायचा विचार आहे. एकदा भरली वांगी आलं होतं मनात पण दुसरी कुठली भाजी असेल तर जास्त बरं होईल. आणि dessert काय असावं?
|
Prady
| |
| Monday, August 28, 2006 - 2:01 pm: |
| 
|
तांदळाच्या भाकरी बरोबर भरली वांगी, हवं तर वांग्या बरोबर थोडे बेबी पोटॅटो पण भरून घालू शकतेस, तसेच काळ्या चण्याची किंवा काळ्या वाटाण्याची उसळ, वांग्याचं भरीत ही combinations चांगली आहेत.
|
Savani
| |
| Monday, August 28, 2006 - 2:07 pm: |
| 
|
सुरभी, साबुदाण्याचे दहीवडे हीट. मस्त वाटला नवा प्रकार. सगळ्यानी मेनु सुचवल्याबद्दल धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Monday, August 28, 2006 - 3:35 pm: |
| 
|
भाकरीबरोबर चालत असतील तर भरली अंडी, किंवा मेथीडाळ, मेथीची गोळाभाजी, भरली शिराळी आणि शिरांची चटणी, लाल भोपळ्याची लाल मिरच्या घालुन केलेली भाजी, टोमेटोची भाजी, सिमला मिरच्यांची भरुन भाजी. फ़्लॉव्हरची रस्साभाजी वैगरे करता येईल.
|
Sami
| |
| Monday, August 28, 2006 - 4:23 pm: |
| 
|
prady, dinesh धन्यवाद. prady मला शक्यतो भरली वांगी नको होती पण तू म्हणतेस तसं वांग्याबरोबर baby potatoes ची idea चांगली आहे. दिनेश, मेथीची गोळा भाजी करावीशी वाटतेय. आणि लाल भोपळ्याचि लाल मिरच्या घातलेली भाजी कशी करायची? आणि एखादा गोड पदार्थ सुचवा ना जो या सर्वाबरोबर suit होईल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|