|
Prady
| |
| Tuesday, August 15, 2006 - 12:31 pm: |
| 
|
असीरा जर जेवायला पंजाबी ग्रेवीच्या भाज्या किंवा चिकन वगैरे असेल तर नान बरोबर पण चांगले लागतात. ईंडीयन ग्रोसरी स्टोर मधे फ्रोजन मिळतात. ते अगदी आयत्या वेळेला गरम करून देता येऊ शकतात. पण फुलके किंवा पोळ्या घरीच करायच्या असतील तर स्वयपाक करताना सगळ्यात शेवटी फुलके करावे आणी बीने सांगितल्या प्रमाणे foil मधे ठेवावं त्यामुळे नरम आणी ताजे राहातात.
|
Asira
| |
| Tuesday, August 15, 2006 - 6:57 pm: |
| 
|
me pan foil madhech thewate. Pan aayatyaa welich karaawya lagataat nahitar waatad hotaat. Amachya ithe egyptian bread mhanun naan sarakhach prakar milato to garam karun dete jewha chicken wagaire kele asel tewha.
|
Chiku
| |
| Tuesday, August 15, 2006 - 8:28 pm: |
| 
|
असिरा मी कधी कधी फ़ॉइलमधे गुंडाळुन ओव्हनमधे गरम करते किंवा पोळ्यांच्या डब्यात घट्ट झाकण लावुन, कुकरमधे प्रेशर न लावता १०-१२ मिनिटे गरम करते.
|
Rajasi
| |
| Tuesday, August 15, 2006 - 10:13 pm: |
| 
|
chinch gulachi amtichi recipe koni deil ka?
|
Psg
| |
| Wednesday, August 16, 2006 - 7:13 am: |
| 
|
rajasi, hi ghe /hitguj/messages/103383/114534.html?1155712280
|
Mepunekar
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:59 am: |
| 
|
माझ्याकडे शुक्रवारी हळदीकुन्कू आहे, त्यासाठी आधी तयार करुन ठेवता येइल असा एक गोड आणी एक तीखट प्रकार सुचवा प्लीज. मसाला दूध आहेच त्याबरोबर..
|
Mrinmayee
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:29 pm: |
| 
|
श्री, हे मेनु कसे वाटतात? * वाटल्या डाळीच्या करंज्या (चटण्यांसहित) - गुलाबजाम * किंवा एखादी उसळ (कांदा शेव वगैरे घालून) -जिलब्या ( US मधे जर जवळपासच्या गुजराथी दुकानात मिळत असतील तर. या आटीव दुधाबरोबर छान लागतील) * पाव भाजी (जर पोटभर असं काही द्यायचं झालं तर, की हळदी कुंकवाला द्यायला जरा विचित्र वाटतेय?) - जे करायला सोपे जातील असे कुठलेही लाडु
|
Chioo
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:36 pm: |
| 
|
- दहीवडा (एकात दोन्ही होईल.) - मेदूवडा, चटणी, गाजर / दुधीभोपळा हलवा.
|
Mepunekar
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:33 pm: |
| 
|
म्रु अणी चिऊ धन्यवाद!.. मी पालक कबाब/ किवा उसळ अणी हलवा किवा जिलबी करायचा विचार करतिये...कुठले काॅम्बिनेशन छान वाटेल?
|
Mrinmayee
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:48 pm: |
| 
|
उसळ आणि हलवा हे छान मराठी पध्दतीचं वाटतं!
|
Prady
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:48 pm: |
| 
|
मीपुणेकर शुक्रवारचं हळदीकुंकू म्हणजे चणे पण असतील ना. पुढील प्रकार बघ कसा वाटतोय. अर्थात पोटभरीचा नाही पण एक variety . चणे नुसते द्यायच्या ऐवजी बघ असे देता आले तर. नारळाचं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची,चवीला मीठ, साखर, आणी लिंबू पिळून एकत्र करून ठेवावं. आणी आयत्या वेळी चणे त्यात मिसळून खायला द्यावं. आधी मिसळलं तर चणे मऊ पडतात. बघ आवडलं तर try करून.
|
Akshitija
| |
| Thursday, August 17, 2006 - 7:36 pm: |
| 
|
माझ्याकडे ४० लोक जेवायला आहेत गणपतिमध्ये.कुणी सोप्पा मेनु सुचवाल का? मी confuse अहे की मराठी मेनु करावा कि mix? like पोळी उसळ बटाटा भाजी भात सार or नान, मटार पनीर सुकी भाजी पुलाव अणि सार.
|
Fulpakhru
| |
| Friday, August 18, 2006 - 12:04 am: |
| 
|
माझ्याकडे शनिवारी २ bachlors जेवायला येणार आहेत. दुपारी येणार आहेत. मला छानसा मराठी मेनु कोणितरी सुचवाल का? मला तेच ते पालक पनीर आणि छोले करायचे नाहि आहेत या वेळी गोड मी ठरवले आहे. गव्हाची खीर आणि डाळ मेथीचे वरण आणि भात मला भाज्या सुचवा please आणि apitizer पण जो करायला सोपा असेल.
|
Mrinmayee
| |
| Friday, August 18, 2006 - 12:39 am: |
| 
|
क्षितिजा, तुझा बटाटा, उसळ, सार भात हा मेनु जास्त छान वाटतोय गणपतीच्या जेवणात! फुलपाखरु, डाळमेथी आणि गव्हाची खीर तर झकासच! त्यातला डाळमेथी हा प्रकार झाला पातळ आणि भाजी असलेला. मग कोरड्या भाजीत भरली भेंडी / भरली तोंडली, / सिमलामिरचीची पीठ पेरलेली भाजी / मुगवडी-वांग फ्राय / फ्लावर-बटाटा-मटर यातली एखादी भाजी कशी वाटते? अगदी मराठी मेनूत बसणार्या भाज्या सांगतेय
|
Mrinmayee
| |
| Friday, August 18, 2006 - 12:45 am: |
| 
|
फुलपाखरू, starters मधे तयार आळुवडी किंवा सुरळीच्या वड्या (एकाहून एक मस्त रेसिपीज आहेत सुरळीच्या वड्यांच्या इथे) किंवा अगदी विकतचा असेल तरी..शेव-चिवडा! कांदा, मिरची, कोथिंबीर घालून. किंवा अगदी गरम गरम मुग भजी / कांदाभजी.. ही तर सगळ्यांना आवडणारी!
|
प्रज्ञा, मस्त अहे आयडिया..मी ट्राय करेन उद्या. आणि म्रु, मटकि उसळ, कान्दा, कोथिम्बिर, शेव आणी गाजर हलवा फ़ायनल..धन्यवाद..उद्या या सगळ्या जणी हलदिकुन्कवाला
|
Psg
| |
| Friday, August 18, 2006 - 7:29 am: |
| 
|
मृण्मयी, ते मूगवडी- वांगफ़्राय कसं करतेस? पार्ले बीबीवर पण वाचलं रेसिपी टाक ना प्लीज
|
Mrinmayee
| |
| Friday, August 18, 2006 - 12:38 pm: |
| 
|
श्री, आलोच सगळ्याजणी हळदीकुंकवाला. मटकीची उसळ तर आवडीचीच. वर गाजरहलवा पण असणार! पूनम, टाकते हं रेसिपी लवकरच. तसंही मुगवड्या टाकलेल्या भाज्या खूप छान लागतात!
|
thanks a lot mrinmayee.हा फ़ुलपाखरु काय प्रकार अहे? कोरड्या भाजीमध्ये मला कमी चिरायची भाजी सुचव ना.भेंडी, तोंडली म्हणजे फ़ार चिराचिरी होइल आणी वांगी खुप जणांना आवडत नाहीत.
|
क्षितीजा, अगं 'फुलपाखरु' नावाची ID आहे कुणाची! कमी चिरायची भाजी म्हणजे मग बटाटा-फ्लॉवर, अख्खे छोटे बटाटे वापरून केलेली फ्राय भाजी किंवा अजीबात न चिरावं लागणारी frozen फावा बीन्सची भाजी. ढोबळ्या मिरच्या देखील पटकन चिरून होतात. या भाज्यांपेक्षा कांद्याचा झुणका केला तर? अगदी मराठमोळा! तोंडीलावणं म्हणून खमंग काकडी किंवा एखादी कोशिंबीर.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|