|
पूनम ( psg ), ही रेसिपी तुझ्या सांगण्यावरून: ६-८ छोटी वांगी-हिरवी किंवा जांभळी २ मध्यम आकाराचे कांदे १ टोमॅटो (नसला तरी चालेल) भरपूर कोथंबीर मीठ गरम मसाला हळद तीखट अर्धा चमचा चिंचेचा घट्ट कोळ एक छोटा खडा गुळाचा १ वाटी मुगवड्या २ पळ्या तेल (भाजीला शक्यतो तेलाच्या वाफेत शिजवावं म्हणून) *** कृती: * वांगी, टोमॅटो आणि कांदा हे सगळं धूउन पातळ आणि उभं चिरून घ्यावं. (वांग्याला पाण्यात टाकून ठेवलं तर त्यातली चांगली सत्व निघून जातात, तेव्हा पाण्यात टाकु नये). या सगळ्या भाज्या कापून एकत्र ठेवल्या तरी चालतील. * फोडणीत, तेल गरम करून मोहरी-हिंग घालून मुगवड्या घालाव्या. २-३ मिनिटं परतावं. * त्यावर थोड्या चिरलेल्या भाज्या घालून हळद, तीखट, मीठ, मसाला आणि चिंच घालून नीट परतावं. ऊरलेल्या भाज्या घालून परत सगळा मसाला नीट सगळ्या फोडींना लागेल इतकं ढवळून मंद आचेवर १० मिनिटं ठेवावं. त्यात वांग्याचा उग्र वास जाईल. * परत एकदा भाजी घाटून, पाण्याचा हलका शिपका देऊन झाकळ घट्ट लावून भाजी शिजवावी. मुगवड्या शिजल्या की ३-४ मिनिटं जास्त आचेवर भाजी फ्राय करावी. याच वेळी थोडा गुळ घालावा आणि बारिक चीरलेली कोथिंबीर पेरावी. *** यात कांदा व्यवस्थीत गळतो. चांगला ब्राऊन पण होतो. तेव्हा फोडणीत त्याला वेगळं परतुन घ्यावा लागत नाही. *** काही मुगवड्या शिजायला खूप वेळ लागतो. त्यांना फोडणीत घालण्याआधी १० मिनिटं पाण्यात भिजवून निथळून घ्याव.
|
Rajasi
| |
| Friday, August 18, 2006 - 3:05 pm: |
| 
|
bhaji chhanach vatate pan mala kahi prashn aahet mugvadya mhanje kay ? ani tya ghari banavayachya ki vikat milatat indian grocers madhye ani jar vikat milat asatil tar tya yach navane milatat ka?
|
Gautami
| |
| Friday, August 18, 2006 - 3:06 pm: |
| 
|
ही भाजीची receipe छान वाटतेय. मुगवड्याची पण receipe दे ना.
|
राजसी, मूगवड्या हा वाळवणातला एक प्रकार. इथे US मधे भारतीय दुकानात 'मूगवडी' याच नावानं मिळतो. (त्याखाली त्याचं ईंग्रजीत बारसं केलय ' spiceball ' या नावानी! या विकतच्या वड्या मात्र पटकन शीजतात. भारतात लोक घरी करतात या वड्या. त्या शिजायला ईतक्या सोप्या नाहीत. गौतमी, मुगवड्या करायला अगदी सोप्या. पण करून अगदी कडकडित उन्हात वाळवाव्या लागतात. १ वाटी मुगडाळ (सालासगट चालेल) पाव चमचा मीठ पाव चमचा तीखट अर्धा चमचा धने जीरे पूड (हिरवी मिरची optional ) ** मूगडाळ ४-५ तास पाण्यात भीजत घालून उपसावी. शक्य असेल तर पाणी न घालता किंवा अगदी कमी पाण्यात मिक्सरमधून वाटावी. फार बारिक नको. वाटतानाच तिखट मीठ, मसाले घालावेत. प्लास्टिक शीटला तेलाचा हात लावून त्यावर 'हर्शी कीस' एवड्या आकाराच्या वड्या घालाव्या. २-३ दिवस उन्हात वाळल्यावर हवाबंद डब्यात भराव्या.
|
Rajasi
| |
| Friday, August 18, 2006 - 6:19 pm: |
| 
|
thx Mrinmayee, udyach jaun gheun yete mugvadhy indian grocermadhun aani mag karun sanginach kashi bhaji zali hoti te
|
Moodi
| |
| Friday, August 18, 2006 - 6:36 pm: |
| 
|
मृण्मयी कृती मस्तच आहे आणि वाफेवर शिजवायचीय म्हणजे आणखीन छान होईल. मला वाफेवरच्या भाज्या जास्त आवडतात. 
|
Psg
| |
| Saturday, August 19, 2006 - 7:49 am: |
| 
|
धन्स मृण त्याच त्याच प्रकारची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला होता, ही ट्राय करीन. वांगं पातळ चिरल्यानी वेगळी लागत असेल असा अंदाज आहे. पण माझ्याकडेही मूगवडी नाही, मुगाची डाळ भिजवून घातली तर चालेल? तीच चव येईल का?
|
Dineshvs
| |
| Saturday, August 19, 2006 - 8:29 am: |
| 
|
वरीलप्रमाणे मुगवड्या करुन फ़्रीजमधे ताटात ठेवल्या तरी आठवडाभरात वाळतात.
|
Mrinmayee
| |
| Saturday, August 19, 2006 - 4:15 pm: |
| 
|
पूनम, मुगाची डाळ भिजवून या भाजीत घातली तर कशी चव येईल याची कल्पना नाही. पण वड्यांची चव नक्की येणार नाही
|
Surabhi
| |
| Monday, August 21, 2006 - 9:22 am: |
| 
|
मृण्मयी छान होते हं ही भाजी! केली मी आज मुद्दाम मूगवड्या आणून... आमच्या इथे दुकानात कायम मिळतात ह्या वड्या पण कधी खाल्ली नव्हती... पुढच्या खेपेस परवर घालून पण ह्या पद्धतीने करायची म्हणते आहे.
|
Psg
| |
| Monday, August 21, 2006 - 10:15 am: |
| 
|
सुरभी, पुण्यात असतेस का? आणि असशील तर कुठुन मिळवल्यास मूगवड्या तेही सांग प्लीज.. मृण, वाटलच होतं मला तरीही म्हणल खडा मारून बघावा
|
मुगवड्या घालून बर्याच भाज्या करतात. परवराची मी कधी खाल्ली नाही अशी, पण छानच लागेल बाटाटा-मुगवड्या रस्सा भाजी करायला सोपी, लागते पण चवदार. तसंच ऐनवेळी नुसत्या मुगवड्यांची फ्राय भाजी, (घरात इतर भाजी नसली की) करता येते. अगदीरश्श्या सगट!
|
Surabhi
| |
| Monday, August 21, 2006 - 3:55 pm: |
| 
|
पुनम, मला नेहमीच्या वाणसामानच्या दुकानात मिळाल्या. तुला ग्राहक पेठ किंवा तुळशी बागेच्या बाहेर मसाल्यांची दुकाने आहेत तिथे नक्की मिळू शकेल. 
|
Psg
| |
| Tuesday, August 22, 2006 - 7:09 am: |
| 
|
हो का? बघते मी मग.. मूगवडी म्हणूनच मिळतं ना? म्रुण, जास्त नावं घेऊ नकोस, तोंडाला पाणी सुटलं आणि कृतिही लिहावी लागेल, ते वेगळच
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|