Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 14, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through August 14, 2006 « Previous Next »

Psg
Thursday, August 03, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मठ्ठा आणि पालकाची भाजी दोन्ही ताकातलच होतय ना? मसूर भाताबरोबर दाल फ़्राय का नाही करत? मस्त लागतं :-) किंवा मराठी लोक असतील तर चक्क चिंच गुळाची आमटी.. पोळीलाही होईल.. अर्थात आवडत असेल तर..

Supermom
Thursday, August 03, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण पालकाची भाजी--लग्नातल्यासारखी, मी ताक टाकून नाही करत. तशी असली तर चालेल की.

Mrinmayee
Thursday, August 03, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, अगदी बरोबर तुझं! पालकाची भाजी लग्नातल्यासारखी. त्यात ताक नाही घालत.
या non मराठी लोकांना आपल्या पध्दतीचं जेवायचय. म्हणून दालफ्रायचा विचार केला नाही. चिंचगुळाची आमटी आत्ताच करते. घरच्यासाठी:-)


Lalu
Thursday, August 03, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान्चुरिअन, टोफू कॅन्सल, त्याऐवजी भजी आहे ना? वाटली डाळ नाही केली तरी चालेल. तशा २ भाज्या आहेतच. सुपर, काय ठरलं मग?

Mrinmayee
Thursday, August 03, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं भजी करते. वाटल्या डाळी ऐवजी तोंडी लावणं काय करु? कुरडया पापड्या तळु का?

Supermom
Thursday, August 03, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक जेवायला बोलवायचाच विचार करतेय ग लालू.
मला पण इच्छा होतेय खास मराठी बेत खायची


Lalu
Thursday, August 03, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं २ भाज्या आहेत ना, वाटल्या डाळी ऐवजी काही नसलं तरी चालेल असं म्हणत होते मी. कुरड्या, पापड्या चालतीलच.

Miseeka
Thursday, August 03, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो कुरद्या पापाड च तळ.म्हणजे तुला आधी तळुन डब्यात पण ठेवता येतिल म्ह्णजे कुरकुरीत रहातिल.

Prady
Wednesday, August 09, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे week end ला ७ लोकं जेवायला आहेत. त्यात ३ लहान मुलं. सगळे मराठीच आहेत. पुढील मेनू कसा वाटतो.

Starters सुरळीच्या वड्या, डाळ वडा,चिंच खजूराची चटणी
main course : फुलके, साधा पुलाव, टोमॅटो सार, भरली वांगी आणी बटाटे, नवरतन कुर्मा, कांदा काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
गोड्: fruit salad with ice cream

मुलांच्या दृष्टीने ठीक वाटतोय का मेनू? काही बदल करावेसे वाटले तर जरूर सांगा.


Mrinmayee
Wednesday, August 09, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, मेनु छानच ग! starters मधे दोन्ही पदार्थ डाळीपासूनच असं नाही का वाटंत? डाळवड्यांच्या ऐवजी ग्रील्ड पनीर किंवा कॉर्न पकोडे कसे वाटतील?

Prady
Wednesday, August 09, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी थोडं करायला पटकन म्हणून डाळ वड्याचा विचार करत होते पण corn पकोडा हरकत नाही. किंवा हराभरा कबाब.

Sampada_oke
Wednesday, August 09, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, सुरळीच्या वड्या घरी करतेस... (परत एकदा.:-))सही.:-):-):-)

Prady
Wednesday, August 09, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं झटपट होतात गं सुरळीच्या वड्या. रुचिरा मधलं प्रमाण पण परफेक्ट आहे.

Sampada_oke
Wednesday, August 09, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदाच केल्या होत्या, पण मला वाटते खाली काढायला जरा उशीर झाला, म्हणून मग जरा जाड जाड वड्या झाल्या.:-) आता करेन पुन्हा. मला जाम आवडतात.

Psg
Thursday, August 10, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

microwave मधेही सुरळीच्या वड्या मस्त होतात हं! जे आपण गॅस वर शिजवत बसतो, त्या ऐवजी ३ मि. ठेवायचे, बाहेर काढून सारखे करायचे आणि पुन्हा ३ मि. ठेवायचे. बाहेर काढून वड्या पसरवायच्या.. इथे (भांड्याच्या) बूडाला मिश्रण चिकटणे, सारखे हलवणे प्रकार नाही आणि पटापट होतात :-)

मेनू मस्त आहे..


Moodi
Thursday, August 10, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg पण ३ मिनिटे हे मिश्रण नॉर्मलवरच ठेवायचे ना?

Sampada_oke
Thursday, August 10, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स पूनम. या वीकेंडला करेन. पदार्थ बिघडवण्यापेक्षा मायक्रोवेव्हमध्ये करणे बरे,.:-)

Savani
Thursday, August 10, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, मला वाटतं तु सुरळीच्या वड्यांबरोबर पुन्हा डाळ वडा नको ठेवूस. त्यापेक्षा कटलेट, कबाब असे काहीतरी ठेव. शिवाय मुलांच्या दृष्टीने काहीतरी dry snacks पण ठेव. आणि मेन मेनु मधे मी म्हणेन की नवरतन कुर्मा ऐवजी मटार उसळ बघ. वांगी बटाटा मुलांना आवडेलच असं नाही मग पुन्हा कुर्मा मधे सगळ्या भाज्याच येतात त्यापेक्षा मटार सगळ्याना तसे आवडतात. हे माझं मत अर्थात.
बघ, तुला काय वाटतं.
सुरळी वड्या कुकर मधे करतेस का? जमल्यास रेसिपी टाक.


Asira
Monday, August 14, 2006 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सर्वजण आयत्या वेळी पराठे, फुलके करता की करुन ठेवून आयत्या वेळी गरम करता?

Bee
Tuesday, August 15, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयत्या वेळी शक्यच नाही असिरा. मी सगळ्या चपत्या aluminium foil मध्ये नीट थप्पी लावून ठेवतो. त्या तशा खूप गरम नाही पण कडक होत नाहीत. किंवा मग जाड कापडात जर शिदोरी सारख्या बांधून ठेवल्यात तर तो aluminium foil पेक्षा चांगला उपाय आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators