|
Prady
| |
| Friday, August 11, 2006 - 5:39 pm: |
| 
|
साहित्य: १) १ वाटी बारीक चिरलेली मेथीची पानं २) १ वाटी चणा डाळ ३) अर्धी वाटी उडदाची डाळ ४) हिंग ५) हळद ६) तिखट ७) मीठ कृती: १) चणा डाळ व उडीद डाळ वेगवेगळी भिजवावी. मग उपसून वाटून घ्यावी. ऊडदाची डाळ थोडी भरड वाटावी. २)आता त्यात मेथीची पानं, हळद, हिंग, मीठ, तिखट आणी कडकडीत तेलाचं मोहन घालावं. आणी कुरकुरीत पकोडे तळावेत. ह्यात तिखटा ऐवजी वर्हाडी ठेचा घातला तर खूप छान चव येते. उडदाच्या डाळीमुळे छान कुरकुरीत होतात. आणी पावसाळ्याच्या दिवसात चहा बरोबर हे पकोडे खूप छान लागतात.
|
Moodi
| |
| Friday, August 11, 2006 - 5:59 pm: |
| 
|
प्रज्ञा यात ताजी मेथीच तर घालता येईलच पण कसूरी मेथीची पाने जरा भिजवुन घातली तर चालतील का? म्हणजे मी प्रयोग करुन तर बघते दोन्ही प्रकारचे. मग सांगते. यात ठेचा घालता येईल म्हणजे कृती झणझणीत आहे. 
|
Prady
| |
| Friday, August 11, 2006 - 6:03 pm: |
| 
|
कसूरी मेथी नाहीगं कधी try केली सांग तूच try करून.
|
Moodi
| |
| Friday, August 11, 2006 - 6:05 pm: |
| 
|
अगं हो ह्या दोन्ही डाळी साधारण ३ ते ४ तासच भिजवायच्या ना? बरं ते कसूरी मेथीचे करुन बघते आणि मग सांगते 
|
Prady
| |
| Friday, August 11, 2006 - 6:12 pm: |
| 
|
हो तेवढा वेळ पुरतो गं डाळ भिजायला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|