|
सु.मॉ, चवळीच्या शेंगांची भाजी खालीलप्रमाणे, बघ आवडली तर: बारिक चिरलेल्या शेंगा खालील प्रमाणे हिरवं वाटण: ओला नारळ, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर, अगदी छोटा दालचीनीचा तुकडा लिंबु रस मीठ थोडा शेंगदाणा कूट चिरलेला कांदा तेल, हिंग मोहोरीच्या फोडणीत कांदा परतून वर चिरलेल्या शेंगा घालून आणखी परतायचं. त्यावर हिरवं वाटण घालून भरपूर कलसायचं. मीठ घालून पाणी न घालता तेलाच्या वाफेवर शिजवायचं. भाजी शिजत आली की दाण्याचा कूट आणि लिंबाचा रस घालायचा.
|
Vrushs
| |
| Tuesday, April 17, 2007 - 10:55 pm: |
|
|
चवळीच्या शेंगा दिसायला बारीक,लांब आणि हिरव्या असतात का?
|
Supermom
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:13 pm: |
|
|
हो. पण लांब, बारीक आणि हिरव्या जवळपास सगळ्याच शेंगा असतात. शेवग्याच्या अपवाद वगळता. तेव्हा तू कोणत्या म्हणतेस नाही माहीत. पण या शेंगांची वर मृ ने दिलेली भाजी अप्रतिम होते. अगदी शेंगा पाहून नाक मुरडणार्या माझ्या लेकाने पुन्हा पुन्हा मागून खाल्ली.
|
Bee
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:52 am: |
|
|
चवळीच्या शेंगामधे दाणे असतातच त्यावरून ही चवळीची शेंग मी वालाची की मूगाची ओळखता येणे सहज शक्य आहे. चवळीची उसळ घरी करतेस ना कधीकधी.. फ़क्त ती सुकी उसळ असते..
|
Vrushs
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:42 pm: |
|
|
Thank u supermom and Bee for quick reply. मी चवळीच्या शेगांबद्दल विचारत होते कारण त्यात चवळीचे दाणे होते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|