Milindaa
| |
| Thursday, June 24, 2004 - 11:25 am: |
| 
|
सोयाबीन च्या काही रेसिपीज कोणी सांगू शकेल का
|
Dineshvs
| |
| Thursday, June 24, 2004 - 3:06 pm: |
| 
|
कडधान्य म्हणौन सोयानीनचे प्रकार करणे जरा अवघड जाते. कारण त्याला फ़ार उग्र वास येतो आणि ते लवकर शिजत देखील नाही. तरीपण काही प्रकार सुचवतोय. भारतात तरी मी बघितले नाहीत पण केनयात ओल्या सोयाबीनच्या शेंगा मिळायच्या. त्या शेंगा केसाळ असतात आणि सोलणे जरा कठीण जाते. पण जर तश्या मिळाल्या तर त्या दाण्याची उसळ फ़ार छान लागते. ओल्या मटारासारखीच करता येते. सोयाबीन भिजवुन ते वाटुन घट्ट पिळुन दुध काढावे. मग त्या दुढाची कढी करता येते. त्याला आले हिरव्या मिरच्या वाट्य्न लावायच्या. चिंचेचा कोळ घालायचा व हिंग जिर्याची फ़ोडणी देऊन उकळायची. ही कढी बराच वेळ उकळणे आवश्यक आहे. सोयाबीन भिजवुन ते भर्द वाटुन प्रेशर कुकरमधे शिजवुन ते उसळी भाजीत घालता येतात. साधारण खिम्यासारखे लागते. स्प्रिंग रोल, सामोसा वैगरेंच्या सारणात ते अश्या प्रकारे वापरता येतात. सोयाबीनचे पनीर म्हणजेच तिफ़ु बाजारात मिळते. त्यालाच बीन कर्ड असेही म्हणतात. ते पनीरसारखे वापरता येते. तळता येते. स्टीर फ़्राय करता येते. सुपमधे वापरता येते. त्याचे अनेक प्रकार आहेत. नशनल गिओग्राफ़िकच्या एका कार्यक्रमात ते दाखवले होते. पण ते बाहेर मिळत नाहीत. सोयाबीन भाजल्याशिवाय दळता येत नाहीत. त्यातल्या तेलामुळे दळणे अवघड जाते. पण त्याच्या पीठापासुन केलेला सांडग्यासारखा एक प्रकार बाजारात मिळतो. त्याला सोया चंक्स म्हणतात. त्याचा खिम्यासारखा पण एक प्रकार मिळतो. हे दोन्ही कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवुन, घट्ट पोळुन मटणाप्रमाणे आले लस्णाच्या वाटणात मुरवत ठेवुन मग मटणाप्रमाणेच वापरता येतात. मटणात पण घालता येतात. तेक्स्चरला आणि चवीला मटणाप्रमाणेच लागतात.
|
Lalu
| |
| Thursday, June 24, 2004 - 3:06 pm: |
| 
|
मिलिन्दा, तुझ्याकडे कालनिर्णय आहे का? त्यात एका पानावर सोयाबीनच्या आमटीची बरी रेसिपी आहे बघ. उद्या टाकते काही. तोपर्यन्त तुम्ही द्या हो दिनेश. अरे वा! मी सान्गायच्या आत दिलीसुद्धा.
|
Lalu
| |
| Thursday, June 24, 2004 - 5:52 pm: |
| 
|
हे करता येईल. http://www.bawarchi.com/contribution/soya.html soyaa Tophoo resipeej
|
Manaswii
| |
| Thursday, June 24, 2004 - 6:22 pm: |
| 
|
सोयाबीनची सोपी आणि झटपट रेसिपी, १ ते दिड वाटि or कप सोया चंक्स जिरे अर्धा कांदा बारिक चिरुन तमालपत्री ३ medium tomatoes ची puree २ t.spoon आल लसुण पेस्ट दिड t.spoon धणे पावडर दिड t.spoon जिरे पावडर तेलामधे जिरे,कांदा,तमलपत्री घाला. कांदा सोनेरी रंगावर आल्यानंतर आल-लसुण पेस्ट,धणे जिरे पावडर,तिखट घालुन जरा वेळ हलवा ंअंतर tomato puree घालुन सोया चंक्स घालुन झाकण ठेवुन उकळि येउ द्या.जरा जास्त वेळ शिजवा म्हणजे gravy चा स्वाद सोया मधे उतरतो. टिप सोय चंक्स आधी गरम पाण्यात अर्धा तास भिजवुन ठेवावेत.आणि नंतर पिळुन घेउन प्रत्येकाचे २ तुकडे करुन घ्यावे.
|
Manaswii
| |
| Thursday, June 24, 2004 - 9:53 pm: |
| 
|
वरच्या रेसिपी मधे मीठ सांगायचे विसरले. आणि सोया २ ते ३ वेळा पाण्यातून काढुन दर वेळेस पिळुन घ्या म्हणजे सोयाचा उग्र वास कमी होतो.
|
Dineshvs
| |
| Thursday, February 24, 2005 - 3:33 pm: |
| 
|
सोयाबीन काय किंवा शेंगदाणे काय दोन्हीचे दुध काढण्यासाठी ते भिजवुन वाटुन घट्ट पिळून त्याचा रस काढायचा. ( शेंगदाण्याच्या दुधात थोडी चुन्याची निवळी घालतात. )व तो उकळुन घ्यायचा. तरीपण यात ईंडस्ट्रीयल प्रोसेस करुन त्यातला उग्र वास कमी करुन त्यातला तेलाचा अंश देखील कमी केला जातो व कृत्रिम वास मिसळला जातो. शक्यतो सोयाचे दुध घरी काढु नये कारण त्याला फ़ारच उग्र वास येतो. व ते उकळल्याशिवाय पिऊ नये. आपल्या भारतीय पोटाला ते जास्त प्रमाणात प्यायले तर जड जाते. सोयाचे तयार पीठ ईतर पीठात मिसळणे किंवा सोया चंक्स किंवा ग्रॅन्युअल्स वापरणे सोपे आहे. त्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे ते तसे पचायला हलके असतात. त्याचे तिखटच प्रकार करता येतात असे नाही, तर ग्रॅन्युअल्स ची खीर वैगरेहि करता येते.
|
Arch
| |
| Monday, February 28, 2005 - 7:19 pm: |
| 
|
पुण्य, मी नुसत, Soya Milk उकळवल नाही. पण काही वेळा gravy साठी cream च्या ऐवजी वापरते. तेंव्हा ते फ़ुटत वगैरे नाही म्हणजे गरम करता येत असाव.
|
Chafa
| |
| Tuesday, March 01, 2005 - 6:03 pm: |
| 
|
saÜyaabaInsa ha kmaI fats maQaUna BarpUr proteins imaLNyaasaazI AitXaya ]<ama XaakaharI substitute Aaho. ihrvyaa saÜyaabaInsa caI BaajaI AitXaya pTkna AaiNa Cana hÜto. ho daNao frozen ikMvaa organic section maQao imaLtat. Frozen green Soybeans 1 p^koT thaw kravao. ³naahI kolao trI direct freezer maQalao pNa caalatat´ fÜDNaIt jaIrMÊ hLdÊ itKTÊ garma masaalaaÊ QaNaojaIro pavaDrÊ kZIp<aa TakUna saÜyaabaInsa Takayacao.
qaÜDosao ZvaLUna maIz TakUna ek vaaf yao} VayacaI. maga %yaat qaÜDo peanut butter TakUna sava- naIT mix krayacao. vaÉna BarpUr AÜlaa naarL va BarpUr kÜiqaMbaIr icaÉna TakayacaI. AitXaya mast saukI BaajaI hÜto.
ho saÜyaabaInsa iXajaayalaa Aijabaat vaoL laagat naahI. %yaamauLo dha imainaTaMcyaa Aatca hI BaajaI hÜto.
³ba^calasa-saazI A%yau<ama´. kÉna pha²
|
Swabhi
| |
| Friday, September 03, 2004 - 9:39 pm: |
| 
|
सोयाबीनचा खीमा बनवण्यासाठी वाटी भर soyaa granuals १ मोठा कांदा २ टोमेटो ची प्युरी २ चमचे धणे जीरे पुड २ चमचे आले लसुण पेस्ट लाल तिखट गरम मसाला कांदा बारीक चीरुन किवा किसुन घेणे एका मोठ्या कढयीत तेल तापवुन त्यात कांदा फोडणीस ताकणे कांदा लालरन्गावर परतत आला की त्यात आलेलसणाची पेस्ट टाकुन परतणे, नंतर हळद, तिखट, धणे जीरे पुड घालुन पुन्हा परतणे. चन्गले परतले की टोमेटो प्युरी घालुन अजुन थोडा वेळ परतणे एका पातेल्यात पाणी उकळत ठेवुन त्यात soyaa granuals घालुन एक उकळी आणुन मग चाळणीत घालुन पाणी काढुन टाकणे आता हे ग्रान्युअल्स वर बनवलेल्या ग्रेवीत घालावे. गरम मसाला मीठ घालुन थोडा वेळ शिजवणे, चांगले शिजले व मोकळे झाले की आच बंद करुन वरुन कोथीम्बीर शिवरावी.
|
Beti
| |
| Tuesday, August 12, 2003 - 1:31 pm: |
| 
|
Daf Taf तुला एक डेंजर तैवानी बुद्धिस्ट रेसिपी देते soy granules ची cook the soygranules as per instructions on the packet. add peanuts and once both the ingredients are cooked, remove excess water. heat lots of soyoil in a pan and add the cooked ingredients to it.. add just a pinch of salt so that its taste would not be rcognisable... आणि एक माझ्या बंगाली मैत्रिणीने केलेली छान लागते.. soy granules शिजवायचे / भिजवायचे as per instructions . २ वाटी granules ना एक मध्याम कांदा, ७ - ८ पाकळ्या लसूण आणि हिरवी मिरची उभी चिरून तेलात परतायची. मग त्यात बारीक चिरलेले २ मोठे टोमॅटो, चवीनुसार मीठ, साखर आणि २ चमचे गरम मसाला घालायचा आणि रस जरा आटला कि soygranules घालून झाकण न ठेवता शिजवायचे.. भाजीत खूप रस नाही ठेवायचा कोथिंबीर घालून वाढायचे...
|
Leenas
| |
| Friday, June 02, 2006 - 10:28 am: |
| 
|
कोणाला सोयाबिन गहु दळताना द्यायचे असल्यास कसे द्यायचे ते माहित आहे का?
|
Bee
| |
| Friday, June 02, 2006 - 10:45 am: |
| 
|
माझी बहिण पाच किलो गव्हामागे फ़क्त एकच शेर सोयाबिन टाकते. खूप जास्त सोयाबिन घेतले तर पोळी कडक तर होतेच शिवाय नीट लाटताही येत नाही. हे तिचे अनुभव पण.. तुला गहू सोयाबीन एकत्र करूनच दळायचे आहे ना?
|
Zee
| |
| Friday, June 02, 2006 - 3:38 pm: |
| 
|
mee soya flour ghalate kanik bhijavatanna 3:1 ratio madhe. polya naram hotat.kadak vagaire hot nahit aani soya beans cha ugra vaasahi yet nahi
|
Dineshvs
| |
| Friday, June 02, 2006 - 4:44 pm: |
| 
|
leenas सोयाबीन आधी भाजावे लागतात. नाहीतर पिठ चिकट होते व त्याला वासहि येतो. सोयाबीनमधले पचायला जड असणारे घटक काढुन केलेले पिठ व चंक्स वैगरे बाजारात ऊपलब्ध आहेत. ते वापरणे चांगले. गव्हात चण्याची डाळ व मेथी मिसळुन म्हणजे, पाच किलो गव्हाला एक किलो डाळ व १०० ग्रॅम मेथी एकत्र करुन दळली तरी चालते.
|
Leenas
| |
| Saturday, June 03, 2006 - 5:21 am: |
| 
|
धन्यवाद बी, ज़ी आणि दिनेश.
|
सोयाबिनचे पदार्थ २ वर्षाच्या मुलांना देता येतिल का?देता येत असतिल तर काय द्यावे?
|
Shreeya
| |
| Sunday, June 04, 2006 - 5:13 am: |
| 
|
प्राजक्ता, मी कणीक मळताना टोफ़ु वापरते. मी त्या कणकेची पोळी माझ्या मुलाला देते. कारण इथे पीठ दळणे हा प्रकार नाही न ग!
|
Amayach
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:28 pm: |
| 
|
मी ग्रीन सोया आणला आहे. मला अमेरीकन ग्रोसरी स्टोअर्समधे फ़्रोझन सेक्शन मधे मिळला. वर चाफ़ा ने दिलेल्या उसळी शिवाय इतर काही रेसीपिज आहेत का? कोणीच ग्रीन सोया वापरत नाही का? (एक भा. प्र.)
|
Dineshvs
| |
| Thursday, July 13, 2006 - 1:19 am: |
| 
|
जसे हिरवे मटार वापरतो तसे हे हिरवे सोयाबीन वापरायचे. पण हे शिजायला वेळ लागतो आणि जरा वास येतो.
|