|
Savani
| |
| Wednesday, August 02, 2006 - 3:20 pm: |
| 
|
sm इडल्या, डोसे कर. brunch साठी मस्त वाटेल. लहान मुलाना इडली आवडतेच.
|
Supermom
| |
| Wednesday, August 02, 2006 - 3:27 pm: |
| 
|
सावनी, मेनू सुटसुटीत आहे ग. पण इतक्यातच होऊन गेलाय
|
Prajaktad
| |
| Wednesday, August 02, 2006 - 3:58 pm: |
| 
|
पाव्-भाजी , वडा-सांभार , धिरडे-चटणी बटाट-वडा पालक्-पराठे
|
Arch
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:51 pm: |
| 
|
सांभार>> कशाचा भार ग प्राजक्ता? छोले भटुरे किंवा आलू पुरी किंवा रगडा Patties किंवा आलू बिर्याणी आणि रायता
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:02 pm: |
| 
|
आर्च, तुझा मेनू तोंडाला पाणी आणणारा!! पण हे सगळं खायला घालून पाहुण्यांची रवानगी लवकर करायला हवी. तासा-दोन तासांनंतर घरातल्या हवेच्या quality ची काही खात्री नाही. छोले, मैदा, बटाटा, भात....
|
Lalu
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:17 pm: |
| 
|
मेनू सुचवताना यापुढे ही पण काळजी घ्यायला पाहिजे.
|
Arch
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:52 pm: |
| 
|
मृ, ते सगळ एका दिवशी खायला बकासूराला नाही ग बोलवल तिने. आणि हो भटुरे whole wheat चेपण होतात हो.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:02 pm: |
| 
|
या वीकएंडला जेवायला येणार आहेत. तेव्हाचा मेनु: (त्यातले चार सीनीअर सिटिझन्स आहेत, तेव्हा पचायला सोप मेनु बघतेय. पण चण्याची डाळ आणि वांगी होताहेत मेनुत! जेवण दुपारचं आहे.) आंबा लस्सी गोबी मंचुरियन टोफु (मिरची कोथिंबीर पुदिना चटणी लावून grill केलेले तुकडे) ७ जणांना टोफु खूपच आवडतो ) जेवणात्: सगळे वेजिटेरिअन आणि ईतर प्रांतातले भारतीय. त्यांना मराठी जेवण हवय. पंचामृत किव्वा खमंग काकडी मिरचीचा ठेचा (वर्हाडी ष्टाईल!) वाटली डाळ फोडणीचं ताक भरली वांगी पालकाची पातळ भाजी मसुरिचा भात पोळ्या गोड्: चिरोटे आईसक्रीम यात काही आणखी वेगळं सुचवाल का? मराठी जेवणात वरचे स्टार्टर्स जरा विचित्र वाटतात का?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:09 pm: |
| 
|
आर्च ते 'किंवा' नंतर टाकल्यामुळे गोंधळ झाला माझा . whole wheat च्या भटुर्यांची रेसिपी टाक नं. मी नक्की करून बघीन.
|
Savani
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:11 pm: |
| 
|
मृ, धन्य आहेस बाई, अगं कधी करणारेस एवढं सगळं? आणि आत्त्ताच आलीस ना भारतातून मी दुपारी कोणाला जेवायला बोलावलं तर starters वर फारसा भर नाही देत कधी.
|
Savani
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:16 pm: |
| 
|
मृ, फ़ोडणीच ताक कसं करतेस? मसुरीच्या भाताची पण रेसिपी टाक. आर्च, तू भटुर्यांची रेसिपी दे. मागे मी ते pillsbury चे भतुरे केले होते पण ते पुरी सारखे फ़ुगलेच नाहीत आणि पिवळसर रंगाचे झाले तिखटमिठाच्या पुर्यांसारखे.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:20 pm: |
| 
|
सावनी, अगं jet lag चा मोठ्ठा फायदा म्हणजे अजुनही झोप ३ ४ वाजता उघडते पहाटे. तेव्हा स्वयंपाक करीन. तु म्हणतेस ते खरं. दुपारच्या जेवणात starters वर भर नको. पण पहीलं कुटुंब येतय ११ ला आणी पुढची २ कुटुंब १२-१ वाजेपर्यंत. तेव्हा काहीतरी तोंडात टाकायला हवं म्हणून! काही light starters सुचवा please !
|
Miseeka
| |
| Wednesday, August 02, 2006 - 7:27 pm: |
| 
|
कान्दा, बटाटा किवा पालक आशि mix plate भजी starter म्हणुन करता येइल.
|
Chinnu
| |
| Wednesday, August 02, 2006 - 7:58 pm: |
| 
|
मृण, कबाब नाहितर आलुटिक्की पण बरे पडतात स्टार्टर्स म्हणुन!
|
Zee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:12 pm: |
| 
|
मृण्मयी, या लिन्क वर पाहा भरपुर मेन्यु कॉम्बीनेशन्स आहेत. तुला नक्कीच यातुन काहीतरी सुचेल आणि मुख्य म्हणजे, प्रत्येका पदार्थावर क्लिक केलस तर त्याची रेसीपी सुद्धा मिळेल. फ़क्त ह्या पेज वर खाली स्क्रोल कराव लागेल. http://www.cuisinecuisine.com/IndianPartyMenusandThemes.htm
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:18 pm: |
| 
|
सीमा, चिन्नु आणी झी, thank you ! छान suggestions आहेत. झी तू दिलेली site उपयोगी आहे. मराठी जेवणाबरोबर भजी मस्तच. हरियाली कबाबाची रेसिपी शोधते.
|
Supermom
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:47 pm: |
| 
|
सावनी,आर्च,प्राजक्ता, मनापासून धन्यवाद ग. छोले भटुरे नि एखादं आपलं भारतीय चवीचं आईसक्रीम आणीन असा विचार करतेय. इंडियन स्टोर्स मधे मागे केशर पिस्ता बरं मिळालं होतं.सध्या गर्मी खूप असल्याने आईस्क्रीम बरं. नाही का? खरंतर मृण्मयीचा मेनू इतका आवडला की तोच करावा अन लंचलाच बोलवावं असाही एक विचार येतोय डोक्यात.फ़क्त आंबा लस्सी ऐवजी कैरीचं पन्हं करायचा विचार आहे.
|
Zee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:54 pm: |
| 
|
मृण्मयी, ही बघ आणखिन एक लिन्क एपेटायझर्स साठी. यातील क़्विक ब्रेड ढोकळा, सोजी ढोकळा, स्पायसी ग्रिल्ड वेजीस छान वाटतात आहेत. आणि होतिल सुद्धा पत्कन. http://www.indolink.com/Recipe/Appetizers/index.php
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:42 pm: |
| 
|
सावनी, अगं फोडणीचं ताक म्हणजे मठ्ठा. माझा तरी बिनडोकपणाच किनै. मठ्ठा ल्याहावं सरळ! करताना किंचित आलं, वाटून लावते. तुप जीर्याची फोडणी हिरव्या मिरचिचा एखादा तुकडा टाकून. बारिक कोथिंबीर अन मीठ साखर घातलं की झालं! भाताच्या BB वर टाकते मसुरिच्या खिचडीची रेसिपी. thanks झी. मस्त sites आहेत तुझ्याकडे!
|
Shonoo
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:21 am: |
| 
|
मृण्मयी ती स्लो कूकर मधल्या बिरयाणीची रेसिपी पोस्ट करायची राहिली आहे. वाट बघतेय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|