|
supermom tula samosa chat chi recipy milali ka? mi khajur chatni, puudina chatni , shev/fersan, dahi kale mith ghalun ani chole vaprun karte samosa chat havi asel ter detail recipy pathven
|
Aashu29
| |
| Sunday, July 09, 2006 - 7:23 am: |
| 
|
thanks ग पण मि या आधि एका चायनिज मैत्रिणीवर पोहे चा प्रयोग केला होता पण तिला ते तिखत वाटले ग्रीन चिलिमुळे , barfi is gud suggetion काहि अजुन सुचले तर बघाना प्लिज!!
|
Fulpakhru, pavbhaji barobar fruit desert chan vatel. Fruits(Pineapple, apple, grapes vagaire)chya fodi karunvar tyat 2 spoon condensed milk ani 2 mothe dav cool wheap ghal.Mix karun de..5 min tayar hote ani chan chav lagte. It will be nice combo!
|
thanks Mepunekar masta ahe fruit desert chi receoy kadhi try navti keli
|
Supermom
| |
| Monday, July 10, 2006 - 4:32 pm: |
| 
|
जया,फ़ुलपाखरू,मनापासून धन्यवाद. जया,तुझी टिप खरेच खूप छान आहे ग. पण इतक्या लोकांसाठी करायला जरा भीती वाटतेय.माझे काही चुकले अन बिघडले तर म्हणून.या महिन्यात दुसरी एक मैत्रीण नि तिचा नवरा यांना दोघांनाच एकदा बोलावणार आहे.तेव्हा तुझी टिप वापरून दहीवडे करीन म्हणतेय. शेवटी हा मेनू बघा कसा वाटतोय. भेळ, समोसा चाट, फ़्रूट चाट, गुलाबजाम केक चिप्स नि आईसक्रीम आता माझ्यासमोरचे काही यक्षप्रश्न असे, भेळ नि समोसा चाट या दोन्हीसाठी एकच चिंचेची चटणी चालेल का समोसा चाट ची वेगळी असते चटणी? समोसा चाट साठी २५ मोठी माणसे नि वेगवेगळ्या वयाची बारा मुले यांना किती समोसे पुरेत?जरा जास्तच सांगा.मला पदार्थ कमी पडायची नेहेमीच भीती असते. अन समोसा चाट ची सविस्तर रेसिपी पण मिळेल तर फ़ारच छान. फ़ळे कोणती कोणती घेऊ चाट साठी?मी नेहेमी सफ़रचंद,पेअर्स,द्राक्षे,मेलन वगैरे घेते. आणखी काही वेगळी कृती असेल तर जरूर सांगा प्लीज. आधीपासूनच खूप खूप धन्यवाद.
|
Supermom
| |
| Monday, July 10, 2006 - 4:43 pm: |
| 
|
अमया,तुझी रेसिपी वाचली मी. धन्यवाद. पण माझा जरा गोंधळ होतोय.तुझ्या रेसिपी मधे वाटाणे वापरायचेत अन फ़ुलपाखरू म्हणतेय की छोले. नेमके काय?
|
सुपरमॉम!मेनु छान आहे...२ केक असल्यावर गोडाची गरज नाही. आताशा सगळे गोडाच्या बाबतित जरा हात राखुनच असतात. मुलाना b'day च्या आणी तुला पार्टीसाठि शुभेच्छा.
|
Amayach
| |
| Monday, July 10, 2006 - 5:49 pm: |
| 
|
सुपर मॉम, अगं, मग तर आणखिन सोप्पे आहे तुला.. तुझ्याकडे जे असेल ते वापर ना.. पण मला आत्ता आठ्वले की मी इथे कधीतरी जी समोसा चाट खाल्ली होती त्यात छोले होते.. पण मला तरी असे वाटते की तु जरी वाटाणे वापरलेस तरीही काही खास फ़रक पडणार नाही.शेवटी, चिंच गुळाची चटणी शेव कांदा वापरुन साधा चिवडा देखिल छान लागतो ना?
|
सुपरमाॅम, मेनू छान आहे. पार्टी enjoy कर.....
|
सुपरमॉम! समोसा चाटची रेसिपी उपाहार मधे लिहिली आहे. अग!मगाशी सुचले नाही पण, तुला या मेनु मधे additional म्हणुन ढोकळा ठेवता येईल. एखादा गुज्जु grosery वाला जवळच असेल तर आधिच order देता येईल. वरचा मेनु अवघड वाटत असेल तर तु ईडली-सांभार गोड म्हणुन गाजर हलवा ठेवु शकतेस.मेनु कॉमन आहे पण,सुट्सुटित आहे. mtr इडली mix च्या ईडल्या छान होतात. मि तुला confuse केले कां ग?
|
supermom you can use either chole or vatane whatever you like better. but if you go outside generally they use chole
|
Aashu29
| |
| Tuesday, July 11, 2006 - 2:45 am: |
| 
|
supermom, can i also come for the party?
|
Jayavi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:45 am: |
| 
|
supermOm , अगदी पाणी सुटलं गं तोंडाला. मस्त वाटतोय मेनू. समोसा चाट साठी छोले किंवा वाटाणे दोन्ही खूप छान लागतं! मला वाटतं ५०-५५ समोसे भरपूर होतील. कारण एक समोसा सुद्धा बराच heavy होतो चाट सोबत. समोसा चाट मधलीच चटणी भेळेला सुद्धा चालेल. त्यात चिंचेसोबत गूळ उकळवताना त्यात गरम मसाला, जिरेपूड, चाटमसाला, black salt टाक. छान चव येते. थोडी घट्ट कर चटणी. समोसा चाट देताना समोसा फ़ोडून त्यावर आधी छोले नाहीतर वाटाण्याची उसळ घालायची. मग त्यावर हिरवी आणि गोड चटणी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव, चाट मसाला घाल. बरेच लोक त्यावर दही पण घेतात (दह्यात मिठ, साखर, जिरेपूड घालून तयार करायचं). हे दही घालून पण समोसा गोड चटणी सोबत खूप छान लागतो. fruit chat मधे जी फ़ळं मिळतील ती घे. त्यात water melon चे scoops (छोटे छोटे) घातले की मस्त दिसतं. डाळींबाचे दाणे पण दिसायला छान दिसतात. सफ़रचंदाची साल काढू नकोस. pear चा हिरवा, सफ़रचंदाचा लाल रंग छान दिसतो. हं! मला वाटतं जरा जास्तच दिला सल्ला तुझ्या पार्टीला शुभेच्छा!
|
Savani
| |
| Thursday, July 13, 2006 - 2:22 pm: |
| 
|
मला जरा कोणी सुचवाल का की कढी, मुगाची खिचडी याबरोबर आणखी काय चांगलं वाटेल?
|
भजी मस्त वाटतील, कढीबरोबर भजी सही लागतात!
|
Miseeka
| |
| Thursday, July 13, 2006 - 8:57 pm: |
| 
|
Papad aani Limbache/kairi che lonche jar sobtila aasel tar maja kahi aur ch yeil.
|
Chiku
| |
| Thursday, July 13, 2006 - 10:30 pm: |
| 
|
कढी, मुगाची खिचडी (त्यावर तुप, ओले खोबरे, कोथिंबिर, लिंबू) , लिंबाचे किंवा कैरीचे लोणचे, भरल्या वांग्याची भाजी, पापड पोह्याचा असेल तर उत्तमच
|
Mugachya khichdi barobar raita chan vatel. Dahyatli koshimbir! Sobat papad, lonche, ole khobre, kothimbir Kiva masala papad!
|
Supermom
| |
| Monday, July 24, 2006 - 8:09 pm: |
| 
|
प्राजक्ता,जयु, आशू,अमया,लालू, सगळ्यांना धन्यवाद. माझ्याकडची वाढदिवसाची पार्टी एकदम सुपर हिट झाली. शेवटी मेनू असा होता, समोसा चाट भेळ फ़्रूट चाट यात मी मेलन,स्ट्रॉबेरी, ब्ल्युबेरी, लाल अन हिरवी सफ़रचन्दे अन संत्र्याचा गर टाकला.फ़ारच छान दिसत होते. रसगुल्ले नि चम चम मुलांसाठी केक,पिझ्झा अन चिप्स समोसा चाट चे समोसे विकत आणले. छोले,दही,नि चिंचेची चटणी घरी केली.भेळेचे कोरडे मिश्रण आदल्या रात्री मिक्स करून ठेवले.बाकी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर नि टोमॉटो अगदी वेळेवर केले. अगदी सोपी नि तरीही हिट झाली पार्टी. समोसा चाट थोड्या मोठ्या मुलांना पण खूप आवडली. अन लहानापासून मोठ्यापर्यंत सार्यांनी मिक्स फ़ळे वर चाट मसाला टाकून आवडीने खाल्ली. नेहेमीसारखा स्वैपाकाचा थकवा मुळीच न जाणवल्याने मी पण खूप एंजॉय करू शकले.
|
Supermom
| |
| Wednesday, August 02, 2006 - 2:55 pm: |
| 
|
मला दोन जोडप्यांना ब्रंच ला बोलवायचे आहे. सोबत दोन सहा सात वर्षाची मुले पण आहेत. एखादा सोपा तरीही वीकएंडला साजेसा मेनू सुचवा ना प्लीज. सारे महाराष्ट्रीयन आहेत. अन शाकाहारी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|