|
Seema_
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:10 am: |
| 
|
गुलकंदाची बर्फ़ी साहित्य: १ लिटर दुध १०० gram साखर २ चिमुट सायट्रीक acid १ सपाट चमचा cornflour चार चमचे गार दुध १० चमचे गुलकंद (आवडीनुसार कमी जास्त) क्रुती जाड तळाच्या भांड्यात मंद आचेवर दुध उकळायला ठेवावे. तळाला लागु नये म्हणुन सतत हलवत रहावे.साधारण half quantity व्हायला पाहिजे. आता साखर घालावी आणि आणखी चार-पाच मिनिटे उकळत ठेवावे. ३ चमचे पाण्यात सायट्रीक acid mix करुन ते अगदी हळु हळु दुधात घालावे. सतत ढवळत रहावे. मिश्रण थोड curdle झाल कि सायट्रिक acid घालण थांबवाव.बहुदा सायट्रिक acid सगळ लागत नाही. जास्त सायट्रिक acid घातल तर बर्फ़ी आंबट होते. आता ह्यात केशर किंवा वेलची घालावी. ४ चमचे गार दुधात cornflour mix कराव आणि हे आता वरच्या mixture मध्ये घालाव.दुध सतत उकळत ठेवावे.आणि मिश्रण घट्टसर होत आल की उतरवावे. मिश्रणाचे दोन भाग करावेत. एका भागात गुलकंद घालावा. आणि दुसरा भाग plane तसाच ठेवावा. तुप लावलेल्या tray मध्ये प्लेन mixture घालाव. सेट होवु द्याव. आणि मग गुलकंद mix केलेल मिश्रण त्यावर पसराव. व्यवस्थित सेट झाल्यावर बर्फ़ी कापावी. decoration ला वरती थोडा (चालत असेल तर) चांदीचा वर्ख किंवा खाणेबल गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात.
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:00 am: |
| 
|
सीमा मस्त कृती आहे गं. सायट्रीक acid मात्र चिमुटभर पुरेल का?( २ चिमटी ऐवजी) मी मागे मलई पेढे केले त्यात सायट्रीक acid बहुतेक २ चिमटीपेक्षा जास्त घातले होते, त्यामुळे ते थोडे आंबट लागले, पण बाकी छान झाले होते. आता बर्फी करुन बघते. 
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:03 am: |
| 
|
हो आणि प्लेन बर्फी सेट करतांना बाहेरच ठेवायची की रुमटेंपरेचरला आली की फ्रिझमध्ये ठेवायची?
|
Psg
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:25 am: |
| 
|
citric acid कशासाठी घालायचे? म्हणजे त्याचा उपयोग काय? आपण बाकी बर्फ़्यांमधे घालत नाही ना म्हणून विचारले. नाही घातले तर चालेल का?
|
Savani
| |
| Wednesday, August 02, 2006 - 12:20 pm: |
| 
|
सीमा, तुला खूप खूप धन्यवाद गं. रेसिपी छान वाटतीये. पूनम ने विचारलेला प्रश्न मला पण पडलाय. ह्या w/e ला थोड्या करून पाहीन. मला आमच्या इथे जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी १०० लोकांसाठी करायच्या आहेत. ३ जणी मिळून करणार आहोत.
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 12:31 pm: |
| 
|
सावनी आधी मी लिहीले होते, उडवले पण परत लिहीते. चूक असेल तर सीमा अन दिनेश दुरुस्त करतीलच. सायट्रीक acid ने दूध पनीरसारखे फाटुन रवाळ होते, नाहीतर खव्यासाठी ते फार आटवत बसावे लागते. मात्र सायट्रीक acid म्हणजे लिंबाचे कोरडे सत्वच असल्याने पनीर करतांना आपण जसे लिंबू वापरतो तशीच प्रक्रीया इथे घडते. मात्र जास्त वापरु नये, आंबट होते.
|
Savani
| |
| Wednesday, August 02, 2006 - 12:39 pm: |
| 
|
ok.. got it. Thanks, moodi 
|
Seema_
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:35 pm: |
| 
|
बरोबर मुडी . मागे बहुदा तुच मलई पेढ्याची बर्फ़ी लिहिलेलीस,त्यात conensed milk घालुन ती method पण इथ वापरता येईल अस वाटत . psg सायट्रिक acid दुध फ़ाटण्यासाठी घातल जात . लिंबाचा रस पण चालायला हरकत नाही . फ़क्त एक लक्षात ठेवायच म्हणजे थोड सुद्धा सायट्रिक acid जास्त झाल तर बर्फ़ी आंबट होईल. सावनी अगदी थोडी करुन पहा आधी. १०० माणसांची तोंड आंबट होण्यापेक्षा तुम्हा ३ मैत्रीणीची झाली तर चालत .
|
Arch
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:57 pm: |
| 
|
मग रिकोट चीज वापरून केली तर कष्ट कमी होतील न? आंबट होण्याचा सवालच रहाणार नाही आणि वेळही कमी
|
Psg
| |
| Thursday, August 03, 2006 - 11:02 am: |
| 
|
तुमची रिकोटा चीजवर फ़ारच मर्जी हं गुलाबजाम, बर्फ़ी, काही काही म्हणून सोडत नाही ~D ओके, मूडी got the point. idea चांगली आहे दूध घट्ट करायची
|
Savani
| |
| Thursday, August 24, 2006 - 2:28 pm: |
| 
|
सीमा, तुला खुप धन्यवाद. काल आम्ही गुलकंदाची बर्फ़ी केली. अजून २ दा करायची आहे. पण कालची खूपच छान झाली. त्यात आम्ही थोडा गुलाब इसेन्स आणि फ़ूड कलर टाकला. त्यामुळे छान गुलाबी रंग सुद्धा आला आहे.
|
Arch
| |
| Tuesday, October 03, 2006 - 8:51 pm: |
| 
|
सीमा, एक प्रश्ण. तू पनीर एकदा केल्यावर त्यात corn flour वाल दूध घातल्यावर परत stove वर ठेवत नाहीस का? curdle झालेल आटलेल्या दूधाच पाणी काढून टाकाव लागत असेल न?
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 04, 2006 - 4:02 pm: |
| 
|
सीमा उत्तर देईपर्यंत मी प्रयत्न करतो. आटवलेल्या दुधात आम्ल टाकल्याने, फ़ार पाणी निघणार नाही. साखर घातल्यावर आम्ल घातल्याने, पनीरसारखे चोथापाणी होणार नाही. फ़क्त दुध रवाळ फ़ाटेल. आणि या कृतीत तसेच अपेक्षित असावे. कॉर्नफ़्लोअर घालुन परत आटवण्याबद्दल लिहिले आहे, त्यामुळे त्या पाण्यात कॉर्नफ़्लोअर शिजुन गोळा होईल.
|
Seema_
| |
| Wednesday, October 04, 2006 - 9:24 pm: |
| 
|
आर्च corn flour घालुन झाल्यावरही stove चालुच ठेवायचा . मिश्रण आटत आल कि मगच stove बंद करायचा . दिनेशनी एकदम बरोबर सांगितलय बघ .
|
रेसिपी खुप आवडली.... thanx a lot!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|