|
Moodi
| |
| Thursday, July 27, 2006 - 11:35 am: |
|
|
कच्च्या पपयाची बर्फी. साहित्य : १ किलो हिरव्यागार कच्च्या पपया, पावशेर पनीर( 250 ग्रॅम), १ टीस्पुन वेलदोडा पावडर, थोडे काजूचे बारीक तुकडे, २ वाटी साखर. कृती : पनीर शक्यतो घरीच बनवुन घ्यावे. नाही जमले तर विकतचे पनीर आधी सूरीने बारीक कापुन मिक्सरमधुन मऊ होईपर्यंत फिरवावे. पपया धुवुन साले, बीया काढुन सोलुन त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. कुकरमध्ये मऊ शिजवुन घ्यावे. नंतर हे तुकडे चाळणीत निथळून हाताने दाबुन पाणी काढुन मॅश करावे. जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत पपई गर अन पनीर एकत्र शिजवायला ठेवावे. सारखे ढवळत रहावे. या मिश्रणाला पाणी सुटेल, ते सुटून पूर्ण सुकले की मग साखर घालावी, तिचे पण पाणी सुटेल मग साखर पूर्ण सुकली की वेलदोडा पावडर अन काजू तुकडे घालावे. वड्या होऊ शकतील इतपत मिश्रण घट्ट ठेवणे.घट्ट गोळा झाला की उतरवुन तुप लावलेल्या ट्रेत किंवा थाळीत थापुन वड्या पाडाव्यात. गार झाले की डब्यात भरावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|