|
Tanya
| |
| Thursday, July 20, 2006 - 12:41 pm: |
| 
|
लहान माश्यांची गाभोळीही जराशीच असते, मात्र मोठ्या माश्यांची गाभोळी, भजी करण्यासाठी योग्य असते. ती आकाराने लांबट असते. गाभोळीला, मिठ, हळद, लाल तिखट व आले,लसुण,हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व वाटलेली गोळी,लावून साधारण १५ मि. ठेवावे. नंतर एखाद्या लहान भांड्यात ही मुरलेली गाभोळी वाफवुन घ्यावी. (कारण गाभोळी ही अतिशय बुळबुळीत असते, आणि ती तशीच तळली तर तळताना तेल अंगावर उडण्याची शक्यता जास्त असते म्हणुन ती आधी वाफवुन घ्यावी.) ही गाभोळी, रुमाली वड्यांच्या गुंडाळीप्रमाणे दिसते त्यांच्या वड्यापाडुन ठेवाव्या. नंतर भजीप्रमाणे बेसनाचे सरबरीत mixture बनवुन त्यात वरिल गाभोळीच्या वड्या, बुडवुन हे भजीप्रमाणे तळावे.
|
हे तनया छान रेसिपी... पण आमच्या घरी गाभोळी ही स्वच्छ करुन फ़क्त शॅलो फ़्राय करतात. जसे फ़िश फ़्राय करतो त्याप्रमाणेच.. ही नवीन रेसिपी ट्राय करुन बघायला हरकत नाहिय...
|
Bhagya
| |
| Wednesday, November 15, 2006 - 11:09 pm: |
| 
|
गाभोळी म्हणजे काय सांगेल का कोणी?
|
Anilbhai
| |
| Thursday, November 16, 2006 - 1:03 am: |
| 
|
अगो गाभोळी म्हणजे माश्यांची अंडी. मासे हो. त्या माश्या न्हाय.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 16, 2006 - 12:42 pm: |
| 
|
भाई एक सुधारणा ( आणि तीहि एका शाकाहारी प्राण्याकडुन ) माश्याची अंडी अगदीच लहान म्हणजे मोहोरी एवढीच असतात. ती कशी खाणार ? कॅव्हीयर म्हणजे माश्याची अंडी. ती खुपच महाग असतात. ती साबुदाण्यासारखी दिसतात, पण रंगाने काळी असतात. Roe नावाची पण एक माश्याची अंडी असतात. ईथे गाभोळी म्हणजे मादी माश्याच्या ओव्हरीज ( युट्रस पण नव्हे, अंडी घालणार्या माश्याना युट्रसची गरज नाही. ) साधारण गुलाबी रंगाचा चौकोनी अवयव पापलेट वैगरे माश्याच्या पोटात सापडतो. क्वचित ते बाजारात वेगळे विकायलाहि असतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|