|
आर्च, इथे मायबोलीवरच्या कृतीने केलेला मेथी पुलाव कोरडा नाही होत तितकासा. त्यात नारळाचं दूध सुद्धा असतं म्हणून मला वाटतं दोन्ही कॉंबो छान लागेल.
|
Savani
| |
| Monday, June 19, 2006 - 2:21 pm: |
| 
|
संपदा, मीही आत्ता अगदी हेच सांगणार होते. अजून एक म्हन्जे तु चने करत आहेस तर गट्टे भात पण चांगला वाटेल. पण त्यात पुन्हा बेसन आले. पण संपदा ने लिहिल्याप्रमाणे मेथी राइस चांगला होतो. किन्वा मग बिरडे भात बघ. आणि ते जैसलमेरी चने कोरडे असतात का अगदी की थोडी ग्रेव्ही असते? नाहीतर ते भातावर घेता येतील वाटल्यास.
|
Arch
| |
| Monday, June 19, 2006 - 2:35 pm: |
| 
|
सावनी आणि संपदा, thanks मग तसच करते. पुदिना किंवा मेथी rice .
|
मला मुलांच्या ( ८ आणि २) वाढदिवसाच्या पार्टीसाठी मेनु हवाय. वडा पाव करावा म्हणतेय. मुलांसाठी केक आणि पिझ्झा असेल. अजुन काय कराव? पार्टी दुपारी ३ ते ५ आहे. Please help
|
एक मुलगी, देसी लोकच आहेत का की अमेरिकन पण? देसी असतील तर चाट मधला कोणतातरी प्रकार छान वाटेल वडापाव बरोबर. .. शेव बटाटा पुरी वगैरे, हमखास हिट होणारा आयटम आणि पोटभरीसाठी एखादा पदार्थ ठेव पुलाव वगैरे. शिवाय गोड म्हणून श्रीखंड, किन्वा गाजर / दुधी हलवा.
|
Lalu
| |
| Monday, June 19, 2006 - 7:04 pm: |
| 
|
दुपारी ३ ते ५ आहे गं पार्टी. त्यामुळं खूप हेवी काही नको असं वाटतंय. तुमच्याकडे उकाडा असेल तर थंड पेय ठेव. मुले आणि मोठे दोघांसाठीही. आईसक्रीम, popsicles, pinwheel sandwiches चालतील मुलांना. भेळ, दही वडा हे combo चालेल. पण बटाटेवडा केव्हाही चालतो.
|
हो गरमच आहे High 70s. शेव बटाटा पुरी म्हणजे परत बटाटा नाही क होणार? मंगो लस्सी किंवा तसच काही smoothi सारख पेय करेन. देसी च आहेत. Thanks Lalu and Maitreyee. अजुन काही सुचत असल्यास लिहा please .
|
Chiku
| |
| Tuesday, June 20, 2006 - 12:26 am: |
| 
|
जेलो पसरट ट्रेमधे सेट करुन नंतर त्याचे कुकी कटरने छोटे तुकडे करुन उंच ग्लासेस मधे जेलो, मग फ़ळांचे तुकडे परत जेलो असे सर्व्ह करता येईल. मुलांना जेलो नक्किच आवडते.
|
श्रेयाच्या b'day पार्टीज धम्माल झाल्या.दोन्ही मधले मेनु सगळ्यांना खुप आवडले...फ़ायनल मेनु असे होते पार्टी १:-पालक कबाब,आलुमटर,जिरा पराठा,फ़्रुट रायता,व्हेज़ी पुलाव आणी केक. पार्टी २:-ढोकळा-चटणी, पनिर माखनवाला,चपाती,जिरा राईस,बुन्दी रायता,आंबा वडी आणी केक. सगळ्यांचे खुप आभार.
|
आमचीही पार्टी मस्त झाली. फ़ायनल मेनु: मन्गो लस्सी, फ़ालुदा ड्रिंक, टरबूज,पिझ्झा, केक, वडा पाव, कांदा भजी. सगळ्याच्या सुचनांबद्दल धन्यवाद!
|
आता मेनू विचारण्यासाठी माझा नंबर.. मैत्रेयीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मला कृपया मेनू सुचवा ना. मुले आणि मोठी माणसे धरून एकूण ३० लोकं आहेत. ३ फ़ॅमिलीज चिकन सोडून बाकी भाज्या वगैरे काहीही खात नाहीत. पण २ फ़ॅमिलीज शुद्ध शाकाहारी आहेत. म्हणून असा मिक्स मेनू सुचवा, मुलांसाठी ह्यातलेच काही पदार्थ कमी तिखट बनवायचा विचार आहे. तर आता मला ह्यातून मार्ग कसा काढायचा हे सांगा. आधीच सर्वांचे धन्यवाद.
|
Shonoo
| |
| Tuesday, June 27, 2006 - 4:39 pm: |
| 
|
Western Classical Music मधे variations on a theme नामे प्रकार असतो. त्या धर्तीवर variations on a theme menu combinations १. व्हेज फ़्रॅन्की, चिकन फ़्रॅंकी, मुलांकरता बटाटे उकडून कमी तिखट फ़्रॅंकी आणि फ़्रूट सॅलड. २. मिसळ पाव तिखट आणि कमी तिखट, चिकन्मटण खिमा आणि पाव. गोड फालुदा. ३.व्हेज आणि चिकन बिरयाणी, गोड डबल का मीठा अर्थात देसी bread pudding . ४. ऐनवेळेस मदतीला कोणी मिळणार असेल तर इडली चटणी, साम्बार, मसाला डोसा, आणि नॉनव्हेज लोकांसाठी खिमा डोसा लहान मुले इडली किन्वा डोसा मध, सिरप, किंवा तूप साखर लावून खाऊ शकतील. गोड पालपायसम( तान्दळाची खीर) ५. Grilling शक्य असल्यास २-३ तर्हेचे चिकन, हिरची चटणी लावून पनीर, फुग्या मिरच्या, चेरी टोमेटो, पोर्टोबेला मश्रूम, छोटे कांदे, अस्पॅरॅगस चे तुकडे इत्यादी. अननसाच्या गोल चकत्या, पीच चे अर्धगोल, केळी इत्यादी फळे पण grill करून त्याबरोबर आइस्क्रीम.
|
Bee
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:08 am: |
| 
|
केवढ करतात तुम्ही सर्व खायला.. अगदी जीव धापला इतके सगळे मेनू वाचून. एक मुलगी, प्राजक्ता, किती हा अन्याय प्राजक्ता, तो जिरा पराठा कसा करतेस तेवढ सांगतेस का?
|
Prajaktad
| |
| Wednesday, June 28, 2006 - 3:49 pm: |
| 
|
जिरा पराठा योग्य bb वर टाकते... अरे अन्याय कसला?तुला बोलवले नाही म्हणुन पण,मी तर सगळ्यांना बोलवले होते कि रे! अरे ! मी भाजी आणी पुलाव दोन्हिवेळी आदल्या दिवशी करुन ठेवले होते. पार्टीच्या दिवशी फ़क़्त पोळ्या , एपेटायझर आणी रायता मिक्स केला.
|
Supermom
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:07 pm: |
| 
|
प्राजक्ता,जरा फ़्रुट रायत्याची पण रेसिपी देशील का प्लीज?
|
सुपरमॉम! फ़्रुट रायत्याची रेसिपी दिलि आहे मुलांना खुपच आवडतो हा रायता.
|
Savani
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:09 pm: |
| 
|
चला, मला कोणीतरी पटकन सांगा बघू मेनू.. सन्ध्याकाळी weekday ला ६ लोकं येणार आहेत. २ वयस्कर आणि २ लहान मुलं आहेत त्यात. तर जेवण न करता पोटभरीचा काय मेनु करता येईल? आणि पटकन होणारा. कारण मी ऑफ़ीस मधून ५ ला जाणार आणि ते ६ ला येणार.
|
Chiku
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:33 pm: |
| 
|
१) इडली-चटणी, फ़्रुट सालड २) मुग पकोडे, कोथिंबीरीच्या वड्या, गुलाबजाम ३) दही वडे, मटाराच्या करंज्या, गोड शिरा ४) रगडा पाटीस, mango सुफ़ले यातील बहुतेक पदार्थांची आधी तयारी करुन ठेवता येईल.
|
Zelam
| |
| Friday, June 30, 2006 - 3:40 pm: |
| 
|
पाव भाजी, दहीभात, mango/strawberry milk shake with icecream भाजीची आदल्या दिवशी तयारी करुन ठेवता येईल. जमल्यास सकाळी करून जाता येईल. जमले नाही तरी एकदा तयारी असल्यावर करायला वेळ लागणार नाही.
|
किती सांग्रसंगीत करायचा आहे स्वयंपाक त्यावर अवलंबून आहे. १. पराठा दहीरायता, पुलाव, फ़्रुट सलड २. छोले-भटूरे, पुलावकढीरायता
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|