|
Dineshvs
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:30 am: |
| 
|
अर्धा किलो कोलंबी साफ कराव्यात. मोठ्या असतील तर शेपटी तशीच ठेवावी. काळी शीर मात्र आवर्जुन काढावी. आठ दहा जरा कडक ब्रेडच्या स्लाईस घ्याव्यात. फ़्रेंच ब्रेडहि चालेल. एक अंडे थोडे फ़ेटुन त्यात २ टेबलस्पुन कॉर्नफ़्लोअर मिसळुन घ्यावे. त्यात मीठ व कोलंबी घालाव्यात. त्यात एखादा पातीचा कांदा, आल्याचे तुकडे, ऊकडलेल्या अंड्यातले पिवळे वैगरे घालावे. आपल्या चवीसाठी मिरिपुड वा हिरवी मिरची पण घालावी. मग ब्रेडच्या स्लाईसवर हे मिश्रण पसरावे. यापैके थोडे मिश्रण ऊरेल, त्यात ब्रेड बुडवुन भर तेलात हे तळुन काढावे. वरुन थोडे पांढरे तीळ दाबुन बसवले तरी चालतील. सोनेरी रंगावर तळुन तेल निथळुन, केचपबरोबर खावेत. कोलंबीऐवजी ईतर मासा वापरला तरी चालेल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|