Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पूर्वतयारी - हे आधी वाचा ...

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » चायनीज » पूर्वतयारी - हे आधी वाचा « Previous Next »

Dineshvs
Thursday, September 26, 2002 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Porcupine म्हणजे साळिन्दर. त्याच्या अन्गावर लाम्ब काटे असतात. त्याला धोका वाटल्यास तो काटे फ़ेकून मारू शकतो. साळिन्दर हे वाघाचे आवडते खाद्य. पण या नूडल्स मात्र तूमच्या घरच्या वाघोबासाठी. थोडा वेळ काढा व येत्या ऑक्टोबरच्या ऊन्हाळ्याचा फ़ायदा घ्या.

अर्धा किलो गहू तीन दिवस भिजत ठेवा. रोज पाणी बदला. हे पाणी सरबत किन्वा ताक करण्यासाठी वापरले तर त्यातली जीवनसत्वे वाया जात नाहीत. दूसर्‍या दिवशी अर्धा किलो नाचणी वेगळी भिजत ठेवा. तिसर्‍या दिवशी दोन्ही वेगवेगळे वाटून पाण्यात घाळा व गाळून घ्या.. वर राहिलेल्या गव्हाच्या चोथ्यात मीठ, मिरची व भिजवलेला साबूदाणा घालून साण्डगे करता येतात. गाळून घेतलेले सत्व स्थिर ठेवा. मग वरचे पाणी हळूच काढून टाका. कधीकधी नाचणीला चिकटपणा नसतो म्हणून गव्हाच्या सत्वापैकी पावहिस्सा सत्व नाचणीच्या सत्वात मिसळा. जेवढे सत्व असेल तेवढेच पाणी ऊकळत ठेवा. तूम्हाला नूडल्स वेगवेगळ्या फ़्लेव्हरच्या हव्या असतील तर तो फ़्लेव्हर खालीलप्रमाणे तयार करा.
कोलम्बीचे कोश ऊकळून प्रॉन फ़्लेव्हर होतो. चिकनची मान, पन्ख व हाडे ऊकळून चिकन फ़्लेव्हर होतो. बटाट्यची साल, गाजराची साल, कोबी फ़्लॉवरचे दाण्डे, फ़रसबीची टोके, मिरचीच्या बिया, पातीच्या कान्द्याची मान वैगरे जे असेल ते ऊकळून व्हेगीटेबल फ़्लेव्हर होतो. हे सर्व ऊकळून गाळून वरील प्रमाणात पाणी घ्या. तयार क्यूबही वापरता येतील, पण त्यात मीठ असते ते लक्षात असू द्या. वरील पाणी ऊकळल्यावर मीठ घाला. कूठलाच फ़्लेव्हर नको असेल तर फ़क्त मीठ व हिन्ग घाला. मग त्यात सत्व वरून हळूहळू ओता. सारखे ढवळून शिजवा. पूर्ण शिजल्यावर झाकण थेवून वाफ़ येऊ द्या. ही दोन्ही सत्व वेगवेगळी शिजवायची आहेत हे लक्षात असू द्या.
मग शेवेच्या साच्यात ही सत्व आलटून पालटून घाला. पडणारी शेव दूरन्गी असायला हवी. ( साळीन्दराच्या काट्याप्रमाणे ). प्लाष्टीकच्या कागदावर शेव घालताना वेटोळी न घालता ती सरळ घाला. कडकडीत सूकल्यावर तूमच्या नूडल्स डब्यात भरून ठेवा व आयत्यावेळी खालीप्रमाणे वापरा.
या नूडल्स नूसत्या तळून वापरता येतात. अमेरिकन चॉपसूई वरही तळून घालता येतात. त्यासाठी गाजर, सिमला मिरची, फ़्लॉवर, कोबी, अननस, स्वीटकॉर्न, मष्रूम, फ़रसबी, पतीचा कान्दा वैगरे भाज्या थोड्या परतून शिजवा. मग त्यात टोमाटोचा रस किन्वा प्यूरी, मीठ, साखर, लाल तिखट, थोडा सोया सॉस घाला. पाण्यात कॉर्नफ़्लोअर मिसळून घाला. मग वरून तळलेल्या नूडल्स घाला.
हक्का नूडल्स करण्यासाठी, या नूडल्स थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा. मग निथळून तेलात परतून शिजवा. या नूडल्स पाण्यात शिजवायच्या नाहीत. विरघळायची शक्यता आहे. झाकण ठेवून दोन मिनिटात शिजतात व खूटखूटीत राहतात. तेलात लसूण, आले वैगरे परतून मग वरच्या प्रमाणे भाज्या ( अननस सोडून ) बारीक कापून परता. बटाट्यच्या काचर्‍या करायच्या किसणीवर कोबी कन्दा वैगरे चान्गला कापता येतो. गाजराचेही पातळ काप करून मग बारीक काड्या करता येतात. ऑमलेटचे तूकडे व बोनलेस चिकनचे तूकडेही घालता येईल.
या नूडल्स खासकरून नाचणीच्या नूडल्स जर मीठ वैगरे न घालता केल्या तर त्याची खीरही चान्गली होते. या नूडल्स जरा तूपात परतून दूधात शिजवा व मग साखर किन्वा खजूर घाला. नाचणीच्या लापशीपेक्षा ही खीर आवडीने खाल्ली जाते.

वरच्या किन्वा ईतर कूठल्याही चायनीज प्रकारात बीन स्प्राऊट्स घालता येतात. घरी ते करायची रीत अशी.

एक ऊन्च काठाचा थाळा घ्या. त्यात बसेल अशी त्याहून ऊन्च काठाची चाळन किन्वा निथळणी
( colander ) घ्या. चाळणीत जाद रेती पसरा. रेती म्हणजे बान्धकामाला वापरतात ती समूद्रकाठची वाळू नव्हे. रेतीचा थर एक ईन्च असावा. ती चाळन थाळ्यात ठेवून थाळ्यात फ़क्त अर्धा ईन्च होईल एवढे पाणी घाला. रेतीही ओली करा. साधारण रेतीच्या थराखाली पाण्याची पातळी असवी. मग रेतीवर भिजवलेल्या मूगाचा पातळ थर द्या. मग चाळणीसकट थाळाही झाकला जाईल असे मोठे पातेल्याचे त्यावर झाकण ठेवा. दोनतीन दिवसात जाडसर मोड येतात. ऊजेड लागू देऊ नये नाहीतर पाने फ़ूटतात. पण रोज ऊघडून बूरशी वैगरे आली नही ना ते बघा. याच मूगाबरोबर मेथी आणि मोहरीलाही असे मोड काढता येतात. मूगाबरोबर थोडी मेथी व मोहरीही अवश्य घाला. या सर्वान्चा स्वाद चान्गला लागतो. हे मोड अलगद ऊपटून मूळे धूवून घ्या. शक्यतो कच्चेच न कापता मिसळा शिजयायचेच असतील तर किन्चित तेलात अलगद परता किन्वा ऊकळत्या पाण्यात मिनिटभर थेवून निथळून घ्या.
गहू आणि ज्वारीचे मोडही यात वापरता येतात. गहू आणि ज्वारी बारा तास पाण्यात भिजवून मग एक रूमालात सैलसर बान्धून ठेवा. हा रूमाल एक भाण्ड्यात झाकून ठेवा व सतत ओलसर राहील असे बघा. तीनचार दिवसात लाम्ब मोड येतात. या गव्हाच्या व ज्वारीच्या मोडाची ऊसळ करता येते.
गव्हाच्या मोडाची वाटून खीर करता येते.


Dineshvs
Saturday, January 17, 2004 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चायनीजसाठी भात शिजवायची एक रित देत आहे.

जर दोन वाट्या तांदुळ असेल तर सहा वाट्या पाण्या उकळावे. (तांदुळ नवा नसावा). पाण्यात चमचाभर तेल, मीठ व थोडेसे व्हीनीगर किंवा लिंबुरस घालावा. भांडे जरा मोठेच घ्यावे. पाण्याला उकळी फ़ुटली की त्यात धुतलेले तांदुळ वैरावे. अधुनमधुन ढवळत रहावे. शीत शिजले का ते बघावे. थोडीशी कणी असतानाच, गॅस बंद करुन भात चाळणीत निथळावा. (हे पाणी सुपसाठी वापरावे.) परत तांदळावर थंड पाणी ओतावे. चाळणी वरखाली करुन पाणी पुर्ण निथळावे व चाळणी कलती ठेवावी. जर ढिकळे झाली असतील तर काट्याने मोडावीत. असे तांदुळ आधीच शिजवुन फ़्रीजमधे ठेवली तरी चालतात. पण फ़ार सुकण्यापुर्वीच वापरावेत.

चॉप सुई किंवा भेळेसाठी नूडल्स कश्या शिजवायच्या त्या बघु.
नुडल्स घेताना त्या आकाराने गोल असलेल्या म्हणजे मॅगीसारख्या घेऊ नयेत कारण त्या प्रीफ़्राईड असतात. त्यापेक्षा चौकोनी असतात त्या घ्याव्यात.
या लांबलचक असतात.
नूडल्सच्या मानाने भरपुर पाणी ऊकळत ठेवावे. भांडे मोठे घ्यावे. त्यात थोडे मीठ व थोडे तेल घालावे. पाणी खळबळ ऊकळले कि नूडल त्यात अखंडच सोडाव्यात. बर्फाचे पाणी तयार ठेवावे. अलगद हाताने ढवळत किंचीत कणी असेपर्यंतच शिजवाव्यात.
मग भसकन पाणी ओतुन टाकावे.
लगेच गार पाण्यात घालाव्यात. ढवळुन परत पाणी ओतावे. नूडल्सना एक चमचा तेल चोळावे. आणि त्या कोलॅंडरमधे अलगद आणि हवा लागेल अश्या ठेवाव्यात. ऊंच कोलॅंडरच्या कडेवर ठेवल्या तरी चालतील. सगळा ओलसरपणा गेला कि त्या तळाव्यात. सोनेरी रंगावर तळायच्या.






Dineshvs
Friday, June 09, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चायनीज जेवणात खुपदा आपल्याला बीन स्प्राऊट्स वापरलेले दिसतात. साध्या मुगाला काढलेले ते लांबलचक मोड घरीहि काढता येतात. थोडी तयारी मात्र करायला हवी.

यासाठी एका कोलॅंडरमधे वाळुचा एक ईंच जाड थर द्यायचा. वाळु म्हणजे बांधकामात वापरतात ती. समुद्रकाठची रेती नव्हे. हे कोलॅंडर एका थाळ्यात ठेवायचे. त्या वाळुवर हळुच पाणी ओतायचे. थाळ्यात अर्धा ईंच पाणी साठेल एवढे पाणी ओतायचे. मग त्यात आठ दहा तास भिजवलेले मुग पखरायचे. आणि कोलॅंडरसकट पुर्ण थाळा झाकला जाईल असे मोठ्या भांड्याचे त्यावर झाकण ठेवायचे. या मुगाना ऊन वा प्रकाश अजिबात लगता कामा नये. ऊजेड लागला तर मुगाला पाने फुटतील. आपल्याला फक्त लांब मोड काढायचे आहेत. दोन दिवसात मुगाला जाड लांब मोड येतात. प्रकाश न मिळाल्याने ते जाड होतात व पांढरे शुभ्रच राहतात. हिरवे होत नाहीत. मग हे अलगद ऊपटुन मुळाची वाळु झटकुन टाकायची. हि जाड असल्याने मुळाना फारशी लागलेली नसतेच. हवे तर निःसत्व झालेला मुगाचा दाणा तोडुन टाकावा व फक्त मोड घ्यावेत. हे कापुन वा तसेच घेता येतात. शिजवुन वा कच्चेहि चांगले लागतात.



Akshitija
Wednesday, June 21, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dineshda, Without that big kadhai is there a way to get the taste of wok or that smoky flavour?
Last time when i made fried rice with Dineshda's recipe,to add smoky flavour "Tayar rice varati 1 choti vati thevali aNi toparyant 1 chota koLasa gas var tapvun ghetla.
Ata to garam koLasa tya bowl/vati madhe thevaycha aNi tyavar 1 drop oil sodayche aNI ricevar patkaN zakaN thevun 2-3 mins tasach zakun thevaycha.Hyani koLashyacha to smoky flavour bhatala lagato aNi khatana mast vatato.Fakt kaLaji itkich ghaychi ki 2-/3 mins madhe zakaN kadhun takun koLasa kadhaycha nahitar farach kharab vaas yeto..

Dineshvs
Wednesday, June 21, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीचा चपातीचा तवा वापरला तरी तसा फ़्लेव्हर मिळतो. फक्त क्वांटिटि कमी ठेवायची.
भाज्या परतत असताना, जर अर्धा चमचा साखर टाकली तरी तसा फ़्लेव्हर येतो.
शेज्वान ऊद्या परवा लिहिन.



Leenas
Friday, May 16, 2008 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्: नागलीच्या पिठाच्या ह्या नुड्ल्स करता येतील का? काय प्रमाण घ्यावे लागेल पाणी आणि पिठाचे?

Dineshvs
Friday, May 16, 2008 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागलीचे पिठ चाळुन घ्यावे. यात बराचसा कोंडा निघुन जाईल. तिप्पट पाण्यात भिजवून मग ते फ़डक्यातून गाळुन घ्यायचे. या क्रियेने बाकिचा कोंडा निघायला हवा.
मग ते पाणी तसेच स्थिर ठेवायचे, साका खाली बसला कि वरचे पाणी अलगद ओतून टाकायचे. मग जेवढा साका असेल तेवढेच पाणी घेऊन, वरिलप्रमाणे शिजवावे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators