|
Dineshvs
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:00 pm: |
| 
|
चायनीज भेळ खुद्द चिनमधेहि न मिळणारा हा प्रकार आपल्याकडे अलिकडे फार लोकप्रिय झालाय. हे माझे व्हर्जन. लाल चटणीसाठी अर्धा कप साखरेत पाऊण कप पाणी घालुन ऊकळावे, साखर विरघळली कि त्यात तीन मोठे चमचे टोमॅटो प्युरी वा अर्धा कप केचप घालावे. व नीट ढवळुन, ऊतरुन थंड करावे. थोड्या तेलावर पांढरे तीळ फोडणीला टाकावेत. त्यात सहा सात लसुन पाकळ्यांचे तुकडे, अर्धा ईंच आल्याचे तुकडे टाकावेत जरा परतुन त्यात पाऊण कप पाणी घालावे. एक चमचा कॉर्नफ़्लोअर थोड्या पाण्यात घोळवुन लावावे. मग त्यात पाव कप सोया सॉस घालावा. चवीप्रमाणे थोडे लाल तिखट वा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. वर सुचवल्याप्रमाणे नूडल्स शिजवुन तळुन घ्याव्यात. काहि शेवया ऊकडुनहि घ्याव्यात. कोबी, गाजर मिरची या भाज्या बारिक चिरुन घ्याव्यात. त्या करकरीत हव्या असतील तर पाण्यात लिंबाचा रस पिळुन त्यात या भाज्या बुडवुन फ़्रीजमधे तासभर ठेवाव्यात मग निथळुन घ्याव्यात. बेक्ड बीन्स, वा ऊकडलेले छोले, फ़ावा बीन्स, बटर बीस सारखे काहितरी कडधान्य घ्यावे. मग सगळे आयत्यावेळी एकत्र करुन त्यावर वर तयार केलेया चटण्या घ्याव्यात. तयार मसाला नूडल्स पाकिटावरील सुचनेप्रमाणे पण कमी पाण्यात शिजवुन मिसळल्या तरी चालतील.
|
Heena21
| |
| Tuesday, September 26, 2006 - 5:33 pm: |
| 
|
दिनेशदा काल चायनीज भेळ केली.खूपच छान झाली. Sause recipes are just awesome. gives prefect taste .
|
Sunidhee
| |
| Tuesday, October 02, 2007 - 7:03 pm: |
| 
|
दिनेश, तुम्ही 'वर सुचवल्याप्रमाणे' लिहिले आहे पण वर काहि पोस्ट नाहिये, तेव्हा कृपया काय सुचवले ते लिहाल का? मला हे करुन पहायचे आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 03, 2007 - 4:19 pm: |
| 
|
हा बहुदा एक सलग लेख होता. नुडल्स शिजवताना नेहमीप्रमाणे भरपुर पाण्यात मीठ घालुन शिजवाव्यात. लगेच त्या मोठ्या गाळणीत काढुन त्यावर थंड पाणी ओतावे. गाळणी खालीवर करुन पुर्ण पाणी निथळावे. मग त्याला चमचाभर तेल चोळुन लावावे. तळण्याच्या नुडल्स वर थोडेसे कॉर्नफ़्लोअर शिवरुन घ्यावे. मग खोलगट पॅनमधे तेलात त्या तळुन घ्याव्यात. फ़्राईड नुडल्स भर तेलातच तळाव्या लागतात. बीन थ्रेड्स म्हणुन मुगाच्या नुडल्स मिळतात. त्या मात्र न शिजवता तळता येतात.
|
Sunidhee
| |
| Wednesday, October 03, 2007 - 8:19 pm: |
| 
|
thank you thank you.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|