|
Dineshvs
| |
| Saturday, June 17, 2006 - 4:03 pm: |
| 
|
दिम सम. हा प्रकार चिनमधे खुप लोकप्रिय असला तरी आपल्याकडे फारसा मिळत नाही. मोदकासारख्या आवरणात भरलेले सारण असे याचे स्वरुप असते. त्यांच्याकडचे सारण आपल्याला रुचणारे नाही, म्हणुन आपल्या पद्धतीने त्याला वळवु या. घरी मोदक केले कि त्यात तिखट सारण भरता येईल का असे मी आईला नेहमी विचारायचो, तशी पद्धत नाही असे आई म्हणायची. आता मात्र अशी बांधने न पाळण्याईतका मी बंडखोर झालोय. तिकडे सारण बहुतेक मांसाहारीच असते. खुपदा त्यात कच्चे मासे वैगरे पण असतात. आपल्याकडे सारण म्हणुन, वर सुचवलेल्या भाज्या आहेतच. शिवाय ऊकडुन फ़ोडी केलेला बटाटा, ऊकडलेला राजमा, ऊकडुन कुस्करलेले काबुली चणे, वैगरे वापरता येतील. किवी, पपया, अननस, सफरचंद अशी फळेहि वापरता येतील. यातले सारण हे कायम कोरडे असायला हवे. त्याला पाणी सुटता कामा नये. वरुन सॉस घेऊन त्याची चव वाढवताहि येईल. खसखसीचे वाटण लावुन केलेली कच्च्या टोमॅटोची सुकी भाजी, पिठ पेरून केलेली कांद्याच्या पातीची भाजी, वैगरे सारणाचे प्रकार मी ट्राय केले. तर कव्हरसाठी एक वाटी पाणी ऊकळत ठेवायचे. त्यात मीठ, साखर चवीपुरती घालुन त्यात अर्धा चमचा वा जास्त वाटलेली हिरवी मिरची घालायची. मग अर्धी वाटी ताकात एक वाटी तांदळाचे पिठ व एक चमचा कॉर्नफ़्लोअर वा मैदा नीट मिसळुन घ्यावा. थोडे पाणी हवे तर घालावे. गुठळ्या मोडुन घ्याव्यात. आण हे मिश्रण ऊकळत्या पाण्यात ओतावे. नीट ढवळुन झाकण ठेवावे व एक वाफ आणावी. मग ऊतरुन नीट मळुन घ्यावे. याच्या पार्या करुन त्यात तयार सारण भरावे. लाडु करुन त्याला दंडगोलाक्रुति आकार द्यावा. दोन्ही बाजुने खोलगट खळगे करावेत. मग हे सगळे मोदकाप्रमाणे १० मिनिटे वाफवुन घ्यावे. खाताना, वरच्या खळग्यात थेंबभर सॉस घालावा. हे कापुनहि खाता येतील. अश्यावेळी वरुन रंगसंगतीसाठी एखादा फळाचा तुकडा वा कापलेला कोबी वा किसलेले गाजर घालता येईल. याचा आणखी एक प्रकार म्हणजे तांदळाच्या पिठाचा पातळ घोळ करायचा. त्यात दहि, मैदा मीठ वैगरे घालायचे. एका मोठ्या भांड्याला दादरा बांधुन त्यात पाणी ऊकळावे. एका थाळ्याला तेलाचा पुसटसा हात लावुन त्यात हे पीठ पातळ पसरावे. ऊकळत्या पाण्यावर ते ठेवावे. शिजुन पारदर्शक झाले कि त्यावर सारण पसरुन त्याची सुरळीच्या वडीप्रमाने गुंडाळी करायची. वरुन चिली ऑईल घालुन खायचे. यासाठी तांदुळ तीन दिवस भिजवुन वाटुन घेतले तर छान चव येते. तसे दिम सम तळुनहि करता येतील. त्यासाठी बाजारात वॉन्टॉन रॅपर्स मिळतात ते आणावेत. त्याचे चौकोनी तुकडे घेऊन त्यावर सारण भरावे मग त्याची थैलीसारखी मोटली बांधुन तेलात तळावी.
|
Mahaguru
| |
| Tuesday, June 20, 2006 - 2:06 pm: |
| 
|
दिम सम घरी करयला किती वेळ लागतो? बाकी हा प्रकार एकदम भारी. San Francisco मधे Yank Sing नावाचे रेस्टॉरंट आहे. shrimp deemsum तर एकदम मस्त ....
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:03 pm: |
| 
|
सारण आधी तयार ठेवले तर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|