|
Dineshvs
| |
| Tuesday, June 20, 2006 - 1:04 am: |
| 
|
पनीर चिली पाव किलो पनीरचे लांबट तुकडे करुन घ्यावेत. दोन मोठ्या सिमला मिरचीचेहि असेच तुकडे करुन घ्यावेत. तीन हिरव्या मिरच्यांच्या ऊभ्या चिरुन घ्याव्यात. एके ईंच आले व आठ दहा लसुण पाकळ्यांचे तुकडे करुन ठेवावेत. तीन चार पातीचे कांदे घेऊन, कांदे ऊभे व पाती बारिक चिरुन घ्याव्यात. भाज्यांचा स्टॉक अर्धी वाटी, टोमॅटॉ केचप अर्धी वाटी, सोया सॉस एक टिस्पुन, साखर अर्धा टिस्पुन व पाणी अर्धी वाटी हे सगळे एकत्र करुन ठेवावे. त्यातच एक टेबलस्पुन कॉर्नफ़्लोअर मिसळुन घ्यावे. बहुतेक चायनीज ( ओके सो कॉल्ड ) पदार्थांची तयारी आधी करुन ठेवायची असते. कारण सगळे झटपट शिजवायचे असते. तर पसरट कढईत तेल तापवुन त्यात पनीर तळुन घ्यावे. त्यावर थोडे कॉर्नफ़्लोअर शिवरावे. व बाजुला काढुन घ्यावे. मग तेलात आले लसुण परतावे. त्यात हिरव्या मिरच्या कांदा परतावा. सिमला मिरचीचे तुकडे परतावे. त्यात सॉसचे मिश्रण घालुन परतावे. हा प्रकार कोरडा हवा असेल तर पाणी कमी घालावे. चव बघुन मीठ वा अजिनोमोटो घालावे. हवे तर थोडे लाल तिखट वा मिरीपुड घालावी. मिश्रण पारदर्शक झाले कि पनीरचे तुकडे व पात घालावी. थोडी पात बाजुला ठेवावी. ढवळुन बाजुला काढावे व वरुन पात शिवरावी. यात पनीरबरोबर गाजर, बेबी कॉर्न, बटाटे घालता येतील. ऊरलेल्या ईडल्याहि यात सत्कारणी लावता येतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|