|
Raina
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:21 pm: |
| 
|
कोफ्ता बनवण्यासाठी 1/2 कप कोबी, 1/4 कप गाजर, 1/4 कप फ्लाॅवर, सर्व खूप बारिक चिरलेले, मैदा ३ टेबलस्पून, काॅर्नप्लावर २ टेबलस्पून,मीठ चवीनुसार, 1/4 टीस्पून मिरीपावडर,२ टीस्पून कच्चे तेल- सर्व एकत्र करा, बेताचे अगदी कमी पाणी घाला, व भज्यांच्या पीठापेक्षा थोडे घटट असे पीठ भिजवा व कोफ्ते करुन तळा- ग़्रेव्ही- २ टेस्पू तेलावर कांद्याची पेस्ट व आलं लसूण पेस्ट परता, त्यात टोमेटो प्युरी, लाल तिखट, थोडी हळद, मीठ, काजूपेस्ट घालून उकळा, वाटल्यास थोडासा खवा घाला, गरम मसाला घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा. ग्रेव्ही तयार. हे झाल्यावर ५ कोफ्ते घालून उकळा. थंड झाल्यावर वरून पनीर चा कीस घालायचा..
|
Raina
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:33 pm: |
| 
|
टीप: माझ्या सारख्या दीडशहाण्या लोकांसाठी... तळण नको ( calories वाचवायला) म्हणून मी आपली अक्कल लावून ते कोफ़्ते नुसते तव्यावर थोडं तेल टाकून भाजले.. ( मागे मी मलाई कोफ्त्यासाठी हीच अक्कल वापरली होती- ते मात्र सुरेख झाले होते). तर असो- ते तसले भुना चे कोफ्ते भाजले- आणि ग्रेव्हीत टाकले... आणि त्याचे जे काय झालं त्याला 'फजिती" म्हणतात... नशीब पाहुणे यायच्या आधी चव घ्यायची हुक्की आली मला... लगोलग दुसरी भाजी करायला घेतली.... नंतर मात्र तळुनच कोफ्ते करते... चांगले होतात.. असो... जिज्ञासुंनी दोन्ही प्रकारे करुन पाहावे...
|
Moodi
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:37 pm: |
| 
|
मस्तच गं रैना. करुन बघते अन मग सांगते. छान वाटली कृती.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 06, 2006 - 4:21 pm: |
| 
|
रैना, जेंव्हा कोफ़्ते असे नाजुक असतात, तेंव्हा ते ग्रेव्हीत टाकुन ऊकळायचे नसते. अगदी शेवटपर्यंत ते वेगळेच ठेवायचे असतात. ग्रेव्ही वेगळी गरम करुन, अगदी आयत्यावेळी त्यात सोडायचे ते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|