|
Priya
| |
| Thursday, May 11, 2006 - 7:57 pm: |
| 
|
Trader Joe's आठवत तरी नाही पाहिल्याचे. अग, बेक करते कारण तेवढेच तेल कमी! आणि थंड झालेले परत मायक्रोवेव्हमध्ये गरम करुन पाहिलेत. लगेच खाल्ले तर चालू शकतात. छोटे कॉकटेल सामोसे मिळतात ते मात्र नाही आणुन पाहिले कारण ते तळावेच लागतात म्हणे.
|
मनुस्विनी, त्यांच्या बायका छान जेवण करतात तर काय, 'हम भी कुछ कम नही' म्हणत स्वयंपाक कर दही पालक आयडिया खूप छान. पण त्यात डाळिचं पीठ टाकावं लागतं ना? छोले आणि परत हे पीठ टाकून पदार्थ छालेल का? पोटांचे फुगे टोमॅटो साराची रेसिपी सांगू का? (तुला छान जमत असेल तेव्हा मी नको आगाऊपणा करायला !
|
Ana
| |
| Thursday, May 11, 2006 - 7:58 pm: |
| 
|
मनु, मला तरी वाटत जिरा rice वर टोमटोसार लै वेळा जाइल. फ़क्त एक कर साराला तुप जिरे फ़ोडणी आणी त्यात थोडी कसुर मेथी आवर्जुन घाल. दही पालक पालक जुडी धुवुन चिरावी, कुकर मधे शिजवुन घ्यावी.मग बारीक कुस्करुन,दह्यात हिरवी मिर्ची फ़ोडणी साखर मिठ घाल्लुन mix कर. Whole milk दही वापर नाही तर थोड sour cream घाल.
|
मृन्मयी आणि ana thanks परत एकदा मी टॉमटो सार असे करते आता आणखी variation किंवा दुसरी style असेल तर आवडेल तसे करायला ५-६ टॉमटे, थोडीशी उकडलेली तुरडाळ as a base म्हणुन, हिरवी मिरची, जीरे, ओले खोबरे, कोथीबीर,किंचीत आले. ह्याचे paste करुन, तुपाची फोडणी करुन हिंग,राई,ही paste परतते मग टॉमटो सालीकदुन गरम पाण्यात टाकुन juice करुन टाकते. वरुन कोथीबीर आणि थोडेसे नाराळाचे दूध उतरताना टाकते. मृण्मयी दुसरी काही पद्ध्त असेल तर सांग आवडेल मला. actually सगळे non-marathi आहेत नाहीतर मी झकास मराठी मेनु केला असता वांगी भात, छान वरण, तुपावर परतलेला भात, कोशींबीर, उसळ,भजी वगैरे वगैरे घरचे श्रीखंड,पुरी
|
छान मेनू सुचवत आहात सगळ्या. Mrinmayee,आंबा कुल्फ़ी बद्दल सविस्तर लिहिशील का,प्रमाण वगैरे please ?Thanks..
|
मनुस्विनी, माझी साराची रेसिपी बहुतेक मी looking for recipe टाकली. वृशाली, आंबा कुल्फ़ीची कृती ' icecream , मूस आणि बरेचकाही खाली टाकतेय.
|
Karadkar
| |
| Thursday, May 11, 2006 - 11:24 pm: |
| 
|
And they are back - I am talking about Priya and Vrushali. Welcome back !!!
|
मनुस्विनी, तु खरच उरकाची आहेस ग बाई! मी सोप्पा प्रकार करते. whole peeled टोमॅटो १ टिन ( organic जरा बर्या चवीसाठी), १टिन नारळाचं दूध, थोडे जीरे आणि तेव्हडेच धणे, जरासं आलं आणि हिरवी मिरची एकत्र mixer मधून काढून त्याला कढिलिंब आणि जीर्याची तुपातली फोडणी देते एक उकळी आली की १० मिनिटात सार तयार. sorry moderator ही रेसिपी इथुन हलवली तर सांगाल please !
|
Savani
| |
| Thursday, May 25, 2006 - 2:28 pm: |
| 
|
माझ्या ऑफ़ीस मधे मला breakfast meeting साठे काहीतरी न्यायचे आहे. मीटींग सकाळी ७:३० ला आहे. आणि १० जण आहेत. सगळे american मी एकमेव non american आहे. तर मला प्लीज सुचवा नं काय नेऊ. मला bagel, donut हे नेहमीचे प्रकार नकोयेत. पण काय न्यावे तेही सुचत नाहीये.
|
Lalu
| |
| Thursday, May 25, 2006 - 2:44 pm: |
| 
|
काही विकत घेऊन जाणार असशील तर मिक्स फ्रूट प्लेट ने. फ्रूट्स आणून आदल्या दिवशी तयार करुनही ठेवता येईल. pineapple, strawberries, melons, grapes, kiwi etc. ब्रेकफास्ट कॅसरोल, बटाटा फ्रिटाटा(दोन्हीच्या रेसिपीज इथे आहेत) किंवा skillet fried potatoes (म्हणजे परतलेली भाजीच) ही चालतील. करायला फार वेळ लागत नाही पण सकाळी लवकर मीटिन्ग आहे म्हणून म्हटलं..
|
सावनी, आदल्या रात्री करून ठेवलेली (हवी तर instant ) इडली आणि चटणी चालेल का? मी आमच्या lab meeting मधे नेली होती. खूप आवडून खाल्ली सगळ्यांनी (अमेरिकेतच)!
|
Savani
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:18 pm: |
| 
|
लालू, तु सांगितलेला option चांगला वाटतोय. पण मी बघत होते की काही भारतीय पदार्थ नेता येईल का? मृण्मयी इडली ची पण idea छान आहे.
|
Chinnu
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:33 pm: |
| 
|
सावनी bagels घेवुन जा नाहीतर ढोकळा कर, चटणीचीही गरज पडणार नाही. mixed fruits पण घे सोबत.
|
Arch
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:42 pm: |
| 
|
puff pastries ने ग बटाट्याच सारण भरून. पटकन होत. कष्ट एकदम कमी जर सारणासाठी frozen Section मधले spiced hash brown किंवा tater tots वापरले तर.
|
Tulip
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:38 pm: |
| 
|
मला pls. कोणी जरासा सोपा, करायला व खायला सुटसुटीत पण जरासा celebration type असा मेनू सुचवेल का? मला तयारीला जास्त वेळ मिळणार नाही. शनिवारी संध्याकाळी जेवायला येतील आणि सलग असा वेळ शुक्रवार संध्याकाळ पासूनच मिळू शकेल. माझ्या आधीच्या एजन्सीतले कलीग्ज आहेत. बटाट्याची भाजी, पुलाव, मसालेभात, टोमॅटोचे सार, छोले हे पदार्थ सोडून सांगा कारण हेच मी नेहमी बनवते. एकूण आठजण आहेत. वयोगट 24 to 35 . तिघे जर्मन, एक अमेरिकन आणि दोघे बेन्गाली. त्यांना भारतीय, शाकाहारी जेवण आवडते. जेवणात red wine आहे. त्या सोबत काय menu combo करता येईल मला सुचत नाहीये. मदतीला एक मैत्रीण आहे पण ती भारतीय नाही. आणि मला खुप कठिण पदार्थ करता येत नाहीत.
|
Lalu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:00 pm: |
| 
|
दाल फ्राय, पांढरा जीरा राईस, ग्रीन बीन्स किंवा पालकाची एक भाजी किंवा उसळ, एखादी चटणी, मिक्स कोशिंबीर, पापड, पापड्या, कुरड्या, भजी तळून. कटलेट जमतील का? गोड पदार्थ त्या मैत्रीणीला करायला सांग. भारतीय नसला तरी चालेल तर. घाबरु नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत!
|
Sunidhee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:27 pm: |
| 
|
परवाच काहीजण आले होते त्याना जेवायला मी असा एकदम साधा आणि सोपा बेत केला होता आणि तो आवड्ला सर्वाना.. नेहमीची आमटी, पोळी भाजी वगैरे करायचा कन्टाळा आला होता.. सुरुवातीला आलु-चना चाट मुख्य जेवणात फक्त २ combinations १. mix भाज्यांचे परोठे + कोथिंबीरीचि ओलि चटणी + दही + मोड आलेल्या मूगाची कान्दाटोमटो, लिम्बु फोडणी घालुन कोरडी कोशिंबीर आणि २. कोबी-मंचुरीयन व चायनीज फ़्राईड राईस
|
Seema_
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:28 pm: |
| 
|
पापडाची कोशींबीर, fry केलेली भेंडी ( बेसन वापरण्यापेक्षा corn meal वापराव ) veg पुलाव किंवा जिरा राईस,,बटाट्याची करी or पालक पनीर , वांग्याचे काप or अगदी छोटी कांद्याची भजी किंवा थोडासा वेळ असेल तर फ़रसबीचे patties . फ़ुलके किंवा तयार नान किंवा काहीच नसेल तर dinner roll sweet म्हणुण mango moose or गाजरचा हलवा condensed milk घालुन MV मध्ये अगदी पटकन होतो .
|
Prajaktad
| |
| Wednesday, June 07, 2006 - 8:26 pm: |
| 
|
श्रेयाच्या २ 'nd b'day पार्टी साठी मेनु कॉबिनेशन मधे मदत हवि आहे.. मी आलु मटर,दहिवडे,नारळिभात,प्लेन पराठे , फ़्रुट रायता असा विचार करतेय..याबरोबर अजुन काय ठेवता येईल?एपेटायझर म्हणुन काय ठेवता येइल? १० मोठी मानस,५ लहान मुल यांना किति मोठा केक लागेल? चिकन च्या ग्रेव्ही डिशबरोबर छान जाईल असा एक मेनु सुचवा(हा घरगुती गेट्-टुगेदर असणार आहे(निम्मित श्रेयाच्या b'day चेच आहे.)२ पार्टीज मधे २ दिवसाचे अंतर असेल.
|
Mvrushali
| |
| Thursday, June 08, 2006 - 12:11 am: |
| 
|
सीमा,फरसबीचे कटलेट्स कसे करायचे,प्लीज सान्गू शकशील का? thanks in advance
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|