Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बेबी कॉर्न आणि ईतर भाज्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » मिश्र भाज्या » बेबी कॉर्न आणि ईतर भाज्या « Previous Next »

Dineshvs
Sunday, May 28, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेबी कॉर्न हि माझी आवडती भाजी. आता भारतातहि ताजे बेबी कॉर्न मिळतात. त्याचा हा एक प्रकार. चार जणांसाठी पुरेसा होईल.

पंधरा वीस बेबी कॉर्न, एक मोठा कांदा, एक मोठे केशरी गाजर, एक सिमला मिरची, हे सगळे बारिक ऊभे कापुन घ्यावे. कोबी देखील असाच कापुन, एक कपभर होईल ईतका घ्यावा. पंधरावीस लसुण पाकळ्या सोलुन ऊभट कापुन घ्याव्यात. चार पाच हिरव्या मिरच्या व एक ईंच आले पण असेच कापुन घ्यावे.

तेल व थोडे तुप एकत्र तापवुन त्यात कांदा परतावा व तो मऊ पडल्यावर गाजर परतावे. त्यात अर्धा लसुण घालावा. किंचीत मीठ व थोडीशी साखर घालुन परतुन बाहेर काढावे.
त्याच पॅनमधे हिरव्या मिरच्या घालुन, आधी सिमला मिरची व मग त्यातच कोबी घालावा. मीठ घालुन तेहि बाजुला काढावे.
मग परत थोडेसे तेल तापवुन त्यात बेबी कॉर्न घालावा. आले व लसुण घालुन जरा परतावे. वरुन चमचाभर सोया सॉस व अर्धा चमचा लाल तिखट घालावे. जरा परतुन चमचाभर तांदाळाचे पीठ ( कॉर्नफ़्लोअर वा कणीकहि चालेल ) घालुन परतावे. ते कोरडे झाले कि त्यात गाजर व कोबीचे मिश्रण घालुन हलक्या हाताने एकत्र करुन ऊतरावे. टोस्ट बरोबर खावे.
( मी जी पुस्तके वाचतो त्यात नेहमी शेवटची ओळ टेबलावर न्यावे वा सर्व्ह करावे अशी असते. मी मात्र खावे असेच लिहितो नेहमी, एवढी मेहनत करुन स्वत : खायचे नाही का ?)
या सर्व भाज्या क्रिस्प राहतील ईतक्याच परतायच्या. यात ईतर भाज्याहि घालता येतील. ऊदा. फ़्लॉवर वैगरे. फ़रसबी कवळी असली तरच अशी शिजेल. मश्रुम ब्रोकोली पण घालता येईल. पनीरचे तुकडेहि चालतील.
या भाजीचा फोटो माझ्या रंगीबेरंगी बीबी वर टाकतोय.
सजावटीसाठी मी चिप्स आणि चेरीज वापरल्या. पण ते आवश्यक आहे असे नाही. सजावटीने पदार्थ खाण्याची ईच्छा होते हे मात्रं खरे.



Arch
Sunday, May 28, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त वाटते आहे recipe आणि जास्त कष्टपण वाटत नाहीत. सजावटीने चव नाही पण रूप नक्किच बदलत पदार्थाच. आणि अगदी खर आहे खायची इच्छा होते नक्किच.

Rajasee
Tuesday, May 30, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jar soya sauce vaparaycha nasel tar tya aivaji kaay ghalave?

Dineshvs
Tuesday, May 30, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोया सॉस नसेल तर नुसते मीठ. किंवा टोमेटो केचप पण वापरता येईल.

Maitreyee
Tuesday, May 30, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, मस्त आहे रेसिपी! आणि फ़ोटो पण:-)
पण ही भाजी टोस्ट बरोबर? combo जरा वेगळेच वाटले! simple/fried rice जास्त बरा वाटेल का याच्याबरोबर?


Dineshvs
Tuesday, May 30, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, जस्ट ट्राय धिस. खुप छान लागते हि भाजी ब्रेकफ़ास्टला.
नेहमीच्या चायनीजपेक्षा खुपच वेगळी चव येते याला.
भाताबरोबर खाता येईलहि पण या भाजीला ग्रेव्ही वैगरे नाही.



Leenas
Friday, July 20, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेबी कॉर्न ची ग्रेव्ही असलेली रेसिपी द्या ना कोणितरी...

Simm
Saturday, September 22, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Does anyone know where I can find fresh baby corn in Ca? Thanks.

Vrushs
Saturday, September 22, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सुध्दा ताजे बेबी काॅर्न नाही दिसले बोस्टनमध्ये.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators