|
Dineshvs
| |
| Wednesday, November 19, 2003 - 5:43 am: |
| 
|
गवारी चा प्रकार, गवारी मोडुन घ्यावीत. थोडे बेसन व कणीक एकत्र करावी, त्यात तेल, मीठ, तिखट दाण्याचे कुट, लिंबाचा रस किंवा दही, धणे जिरे पावडर घालुन घट्ट मळावे, त्याचे बोराएवढे गोळे करावेत. मग मोडलेली गवार व हे गोळे कुकरमधे उकडुन घ्यावेत. तेलाची फ़ोडणी करुन त्यात जिरे व हिंग घालावा, कांदा बारीक चिरुन घालावा. तिखट कोकम व काळा मसाला घालावा. थोडा गुळ घालावा.थोडे पाणी घालुन उकळावे व त्यात गोळे व गवार घालावी. यात लाल भोपळा किंवा मक्याचे दाणे ही घालता येतात.
|
Prachi_b
| |
| Friday, March 17, 2006 - 9:47 am: |
| 
|
गवारीची भाजी (अख्या गवरीची भाजी) माझी आई एका वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी करायची. ती पद्धत इथे देते आहे. नक्कि करून बघा. साहित्य: गवार पाव किलो, कान्दा मध्यम आकाराचा, २ चमचे दाण्याच कूट, तिखट, मीठ, गोडा मसाला. कृती: एका जरा मोट्या पातेल्यात पाणी तापवा. उकळी आली की थोड मीठ आणि गवारीच्या शेन्गा टाका. गवार मोडायची नाही. तशीच अख्खी वापरायची. ५ मि. शेन्गा गरम पाण्यात उकळू द्या. जास्त शिजू नयेत म्हणून काळजी घ्या. आता गवार निवडा. म्हणजे डेख खुडा आणि अलगद शिरा काढा. मग थोड्या तेलात फ़ोडणी करा. त्यात कान्दा परतवुन घ्या. मग शेन्गा टाका. तिखत मीठ मसाला आणि दाण्याच कूट घाला. खमंग परतवून खाली उतरवा. गरम गरम आस्वाद घ्या.
|
Vrushs
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:10 pm: |
| 
|
प्राची, मी तुझ्या पध्दतीप्रमाणे गवारीची भाजी केली होती काल. नेहमी माझा नवरा खायची म्हणून खातो.पण काल कमी पडली चक्क.ख़रच छान झाली होती. Keep posting new recipes
|
गवार धुवुन शिरा काधुन मोडुन घ्यावी.ती कुकर्मधे वाफ़वुन घ्यावी.त्यात मीठ,गुळ,गोडा मसाला घालुन घ्यावा,फोड्णी करुन त्यात गवार टाकावी,व चान्गली परतुन घ्यावी,त्यात वरुन दान्याचे कुट भुर्भुरावे.वरुन ओल खोबरा,आनि कोथिम्बीर पेरावी.
|
Bee
| |
| Tuesday, March 13, 2007 - 3:14 am: |
| 
|
गवार चक्क तोंडी लावायला घेतात हे मी माझ्या बहिणीच्या खेडेगावी पाहिले. ती काय करते की कोवळ्या गवार आधी धुवुन त्याला कोरड्या होऊ देते. मग जाड बुड असलेल्या तव्यावर तेल पसरवून त्यावर गवार अरतपरत करते. ही गवार कुरकुरीत होते. थोडे काळे चट्टेही पडतात तिच्यावर. मग ती मिठ शिंपडते. ह्याला कोवळी गवारच लागते. राठ गवार कडसर लागते.
|
Shilpag
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:16 am: |
| 
|
गवारीची भाजी मऊ शिजल्यावरच चांगली लागते. पण मऊ शिजण्यासाठी कांदा फ़ोडणीत चांगला शिजल्यावर त्यात गवार टाकून थोडा वेळ मंद आचेवर परतुन घेऊन मग त्यात चमचाभर दूध टाकावे आणि पुन्हा मंद आचेवर परतुन घ्यावी. वाफ़ेवर शिजवल्यास चव छान येईल.
|
Supermom
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:00 pm: |
| 
|
बी, माझ्या एका मैत्रिणीकडे कोवळी गवार बाजारात खूप यायला लागली की स्वच्छ धुवून नीट वाळवतात. अन मग लागेल तशी तेलात तळून वर तिखटमीठ घालून जेवणात सांडगे वगैरे घेतो तशी तोंडीलावणीला घेतात. छान लागते. फ़क्त अशी वाळवलेली टिकते किती ते माहीत नाही.
|
Bee
| |
| Thursday, March 15, 2007 - 3:51 am: |
| 
|
Supermom , तमिळ लोकांमधे वाळवलेली गवार त्यांच्या वतकुळंबन नावाच्या पदार्थात घालतात. माझी आई म्हणते, वाळवलेल्या वस्तू दर एक दोन महिन्यांनी परत उन्हात ठेवाव्याच लागतात जेणेकरुन त्या सादळ होऊन बुरशी लागण्याचा धोका टळतो. कडक उन द्यावे लागते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|