|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 12:06 pm: |
|
|
वांगी रोडगे हा प्रकार वर्हाडात खूप प्रसिद्ध आहे. मी नंतर ह्याची कृती लिहिन. ज्यांना लिहिता येत असेल त्यांनी लिहिली तरी हरकत नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 18, 2006 - 5:21 pm: |
|
|
सत्वर पाव गं मला भवानी आई रोडगा वाहिन तुला
|
Madhavm
| |
| Friday, May 19, 2006 - 4:15 am: |
|
|
बी सर, मस्नी लिवायला येतु. पर म्या काय लिवु?
|
Bee
| |
| Friday, May 19, 2006 - 10:07 am: |
|
|
वर्हाडात जेंव्हा एखादा नवस बोलला जातो त्यावेळी नवसाची फ़ेड रोडगा वाहूनच केली जाते. त्यासाठी एखाद्या शेतात उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मोहरलेल्या आंबाच्या झाडाखाली गौरीचे खांड चेतवून जाळ केला जातो. जसे खांड पेटून त्याची गरम राग व्हायला लागते तसे राखीच्या आत रोडगा भाजायला सुरवात केली जाते. एकीकडे खमंग रोडगे होत असतात आणि दुसरीकडे भट्टीवर अख्ख्या वांग्याची मसालेदार भाजी केली जाते. रोडगा करण्याची पद्धत - भल्या मोठ्या कोपरात तेलापाण्याने कणीक मळवून घेतली जाते. हे काम सहसा पुरुषच करतात आणि बायका वांगी चिर, कांदा काप असे काम करतात. रोडगा थरांचा असतो. म्हणजे आधी एक गोळा घ्यायचा लहानसा त्याला दुसर्या गोळ्याचे आवरण करायचे, असे तुम्ही पाच सात आवरण केले की मग तो रोडगा राखेखाली ठेवायचा. जेंव्हा रोडगा टणक व्हायला लागतो तसा खमंग वास आजूबाजूला दरवळतो. रोडगा सहसा जळत नाही. तो वरुन काळा पडेल पण आतून नरम असतो. असे हे रोडगे तीन चार दिवस जरी ठेवले तरी खराब होणार नाही. फ़क्त वरचे आवरण तेवढे काढून जनावरांना लावायचे असते. रोडगा जर खूपच टणक झाला असेल तर त्याला वरुन तुपाचा हात लावून थोडा वाफ़वून घेतला जातो जेणेकरुन तो चावायला थोडा नरम पडतो. आधुनिक कृतीमध्ये रोडग्यात तिळ, ओवा पण टाकल्या जातो. पण खर्या रोडग्यात तेला पिठाखेरीज इतर काहीच नसते. बस रोडग्याचे थर नीट जाडीचे असणे महत्त्वाचे नि ते एकमेकांना चिकटून बसायला हवे. रोडगा खाताना तो आपण कांदा जसा जमिनीवर बुक्की मारुन फ़ोडतो तसाच फ़ोडला जातो. तो तसा फ़ुटला की एक एक थर वांग्याच्या रश्श्यात बुडवून खावा. दिनेश, तुम्ही लिहा आता तुमच्याकडची कृती.
|
अरेच्या असा असतो होय रोडगा! मला वाटले होते की जाड भाकरी सारखा काहीतरी प्रकार असेल! मस्त वाटले वाचून
|
Dineshvs
| |
| Friday, May 19, 2006 - 4:36 pm: |
|
|
वा बी, छानच. मलाहि हिच रित माहित होती. पण खरे सांग, किती वर्षे झाली तुला रोडगा खाऊन ?
|
Bee
| |
| Monday, May 22, 2006 - 3:25 am: |
|
|
मैत्रेयी, दिनेश धन्यवाद! दिनेश, यंदा भारतात गेलो तेंव्हा घरीच गच्चीवर आम्ही रोडगे केले शिवाय ताईकडे गेलो तेंव्हा तिच्या नवर्यानेच रोडगे आणि वांग्याची भाजी करुन खाऊ घातली. खूप वर्षांपूर्वीची माझी ही ईच्छा पूर्ण झाली. इथे मी एकदा microwave मध्ये करुन पाहिलेत रोडगे पण जमलेच नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, May 22, 2006 - 5:36 pm: |
|
|
Bee आगीतले रोडगे वरुन शिजतील तर मायक्रोवेव्हमधले आतुन शिजतील, आणि वरुन कच्चे राहतील, हाच काय तो फरक.
|
Suparna
| |
| Wednesday, August 15, 2007 - 11:27 am: |
|
|
एकीकडे खमंग रोडगे होत असतात आणि दुसरीकडे भट्टीवर अख्ख्या वांग्याची मसालेदार भाजी केली जाते. >>> Bee, वर्हाडी पद्ध्तीची ही अख्खी मसाला वांगी रस्सा कसा करतात तुम्ही? वर्णन वाचूनच छान वाटतोय. कृती द्याल का?
|
Suparna
| |
| Wednesday, August 15, 2007 - 1:46 pm: |
|
|
दिनेशदादा, तुम्हाला सर्व recipes येतात. तुम्ही देऊ शकाल का ही वर्हाडी पध्दतीची भाजी? दिली तर आनंद वाटेल.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 15, 2007 - 3:53 pm: |
|
|
सुपरणा, वांग्यावर अगदी ग्रंथातले श्लोक देऊ शकेन, पण अश्या प्रादेशिक खासियती, बी सारख्या अस्सल अनुभवी लोकांकडुन यायला हव्यात. त्यातला एखादा दुवा निखळला असेल, तर अवश्य मदत करीन.
|
Nalini
| |
| Wednesday, August 15, 2007 - 3:58 pm: |
|
|
आमच्याकडे भरीत रोडग्यातला रोडगा म्हणजे बाजरीची विस्तवार भाजलेली बारीक चाणकी. वांगेसटीच्या दिवशी भरीत रोडगे करतो आम्ही. वरती तुम्ही ज्याला रोडगे म्हणताय त्याला काय म्हणतात ते आठवत नाही पण आमच्याकडे ते खास बहिरवाडीला जावुन करण्याची प्रथा आहे. त्यातले काही उरवुन घरी आणले जातात आणि ते पिठाच्या डब्यात ठेवतात. का ते एकदा काकुला विचारायला हवय.
|
Bee
| |
| Thursday, August 16, 2007 - 2:36 am: |
|
|
सुपर्णा, इकडे मी फ़िरलकोच नाही इतक्यात. वांग्याची भाजी अशी करतात. १) मध्यम आकाराची वांगी घेऊन त्याच्या फ़ोडी न करता विडीने मधे चार चिरा द्यायच्या. म्हणजे ते जणू वांग्याचे फ़ुल दिसेल असे. देठासहीत वांगे राहू द्यायचे. देठ काढून टाकायचे नाही. वांगी सहसा जांभळी किंवा फ़िकट जांभळी शिरा असलेली घ्यायची. विदर्भात काटेरी वांगी मिळतात ती आकारानी लहान असतात. त्याला खास मसाल्याची वांगी हे नाव आहे. पण इथे मात्र ही काटेरी वांगी घ्यायची नाही. २) मग मसाला पाट्यावर वाटून घ्यायचा. त्याचे साहित्य मला नेमके माहिती नाही. फ़क्त एक आठवते की पिटुकले कांदे गरम राखेत घालून ठेवायचे मग त्यांना बाहेर काढून पाट्यावर आधी ते वाटायची. त्या कांद्यातून जे पाणी बाहेर येत त्यामधे इतर मसाला वाटायचा असतो. आमच्याकडे कांदे भाजून देखील तशीच खातात. छान गोडसर चव येते त्यांना. ३) मग तेलात फ़ोडणी देऊन त्यात वांग्यानुसार पाणी ओतून वांगी सोडायची. रोडगी होईपर्यंत वांगी होतात. रस्सा थोडा घट्टसर करायचा. ही भाजी खूप झणझणीत असते. मी वांगी धुवून मग खातो. कारण मला इतके तिखट अजिबात सहन होत नाही. ही भाजी गोवर्यांवर केली जाते म्हणून ती ज्या तर्हेने शिजते त्यामुळे तिची चव न्यारीच लागते. गॅसवर शिजलेली भाजी, चुलीवर शिजलेली भाजी आणि ही गोवर्यावर शिजलेली भाजी तिघींच्या चवी नेमक्या ह्या शिजविण्याच्या पद्धतीमुळे वेगळ्या लागतात.
|
Suparna
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:04 pm: |
|
|
माहीती साठी धन्यवाद दिनेशदादा, नलिनि आणि Bee . Bee , असे एखादे चमचमीत पदार्थाचे वर्णन वाचले की करून पाहावासा वाटतो त्याचा प्रयोग. म्हणून तुम्हाला जरा तसदी दिली. खरच गावाकडची चव काही वेगळीच असते!! तुम्ही मुद्दाम कृती लिहिली त्याबद्दल खूप धन्यवाद!!!
|
Nalini
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:39 pm: |
|
|
त्याचे साहित्य मला नेमके माहिती नाही.>> कांदा चुलीत भाजुन घ्यायचा. मग तव्यावर थोडे तेल घालुन त्यावर खोबरे,थोडी चना डाळ, धने, २ चमचे तांदुळ वेगवेगळे भाजुन घ्यायचे. सरते शेवटी भाजलेला कांदा थोड्या तेलावर अरत परत करायचा. मग ह्यात चवीप्रमाणे काळा(गरम) मसाला घालायचा. वेळ असेल तर तयार मसाल्या ऐवजी खडा मसाला भाजुन घेऊन घालायचा. वाटणात थोडी कोथिंबीर घालायची आणि हळद, मिठ घालुन हा सगळ मसाला घसाघसा पाट्यावर वाटायचा. हा मसाला वांग्यात भरुन बीने सांगितल्याप्रमाणे भाजी करायची.
|
Suparna
| |
| Thursday, August 16, 2007 - 1:00 pm: |
|
|
ह्या भाजीत लसूण, चिंच, किंवा आले असे काही नाही का घालायचे नलिनी?
|
Dineshvs
| |
| Thursday, August 16, 2007 - 1:06 pm: |
|
|
चुलीत कांदे भाजायची पद्धत आमच्याकडे म्हणजे आजोळी पण आहे. पण आमच्याकडे चणा डाळ वा तांदुळ वापरत नाहीत वाटणात. बाकि साधारण असेच. खोबर्याचा तुकडाही भाजुन घेतात. गॅसवरही तसे भाजुन होते. खोबरे मात्र सुकेच असते. मलकापुरला क्वचित कधीतरी आमटीत कोकम घालतात. तिथे चिंच वापरायची पद्धतच नाही.
|
Nalini
| |
| Thursday, August 16, 2007 - 1:14 pm: |
|
|
सुपर्णा, लसुण लिहायची राहुनच गेले. अगं आमच्याकडे म्हणजे नगर भागात चिंच घालायची पद्धत नाही म्हणुन मी लिहिले नाही. नागपुरात कदाचित वेगळा मसाला वापरत असावेत. ह्या अश्या मसाल्याची भाजी आणि शिळ्या बाजरीच्या भाकरीचा काला आम्हाला शाळेतून आल्या आल्या मिळायचा. सोबत हाताने फोडलेला कांदा. परत कधी मिळणार? दिनेशदादा, माझी आई आणि काकू चना डाळ घालत तर सासुबाई डाळ न घालता मुठभर शेंगदाणे घालतात.
|
Bee
| |
| Friday, August 17, 2007 - 2:07 am: |
|
|
अगदी बरोबर नलिनी. तांदूळ आणि चणाडाळ घातल्यानी भाजीचा रस्सा दाट होतो आणि त्याला एक चांगली चव येते. आमच्याकडे बाजा नावाचे एक मासाल्याचे व्यंजन मिळते. तेही आम्ही वाटणात घालतो. खोबरे, शेंगदाणे, लाल मिरच्या तव्यावर तेलात अरतपरत करून वाटणात घालतात. चिंच हा प्रकार आम्ही खूप कमी वापरतो. खोबरे सुकेच वापरतो. दिनेश, बाजा ठाव हाय का तुम्हाला.. नलिनी, काला शब्द वाचून ती जर्मनची थाळी आठवली काल्यानी ओतप्रोत भरलेली.
|
Dineshvs
| |
| Friday, August 17, 2007 - 1:00 pm: |
|
|
बाजा नाही रे माहित बी. नामदेव ढसाळानी मटणाच्या वाटणात बाजरी वापरल्याचा उल्लेख केला होता. आणि नलिनी तु ज्याला काला म्हणतेस, त्याला त्यानी खदाकनं असा शब्द वापरला होता.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|