|
एक सोपी रेसिपी आंबा कुल्फी साठी १ टिन ( 1lb 14 oz )केशर mango pulp , हापूस मिळाला तर उत्तमच. १ टिन (14 oz) condensed milk २ टिन 14 oz evaporated milk साखर अजीबात लागत नाही. हे सगळं blender मधून एकत्र करून किव्वा सरळ रवीनी घुसळून घ्या. शक्य तितकी कमी हवा या मिश्रणात गेलेली बरं. कुठल्याही गोल आणि घट्ट झाकण असलेलं भांड्यात हे मिश्रण ओता. freezer मधे ठेवल्यावर २-३ वेळा बाहेर काढून परत एकजीव करा. (कुल्फी smooth व्हायला). कुल्फीपात्र असल्यास शेवटच्या घोटण्यानंतर पात्रात ओतता येईल. तसं यात खूप बर्फ जमत नाही आणि freezer मधून काढून ढवळताना त्रास होत नाही. खाताना पिस्त्याच्या पावडरीनं जरा बरी सजावट होते. evaporated milk च्या १टिनाऐवजी ८-१० पेढे घातले तरी खूप छान लागते कुल्फी. पण पेढे खूप एकजीव करावे लागतात मिश्रणात.
|
धन्यवाद गं कृती दिल्याबद्दल,करून बघते लवकरच
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|