Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through May 11, 2006 « Previous Next »

Maitreyee
Wednesday, May 10, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या, दह्याचा मोठा डबा मिळतो तसे ४ पुरावेत. असा माझा अन्दाज. उद्याच ते दही बान्धून ठेव आणि परवा साखर वगैरे मिसळले की झाले तयार. अगदी काही कमी जास्त झाले तर ऐन वेळी थोडे वाढवायला back up म्हणून ठेव हवे तर sour cream जवळ. किन्वा ३ दह्याचे डबे + sour cream as required असं कर:-)

Karadkar
Wednesday, May 10, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, मी मागे इथेच कुठेतरी श्रिखंड कसे करायचे दिलेले. पण तुला कुठले organic दही मिळाले तर sour creme ची गरज नाही.



Arch
Wednesday, May 10, 2006 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोह्याचे पापड ने तळून.

Mrinmayee
Wednesday, May 10, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्या, stonyfield farm चं whole milk दही घेतलस तर sour cream घालायची पण गरज़ नाही. हे दही तसं आंबट असतं. (आणि organic देखिल).

Seema_
Wednesday, May 10, 2006 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या ते nuts घातलेस तर मात्र specifically तस सांग party मध्ये. इथल्या बर्‍याच लोकाना nuts ची allergy असते आणि श्रीखंडात ते घातलेले ओळखु येत नाहीत . आणि शक्यतो कलर avoid केल तर बर . अनुभवाचे बोल .
हो आणि दह्याचा dannon brand न घेता इतर brand घेतलास especially , cultured in the pot अस लिहिलेला तर ते बर्‍यापैकी आंबट असत . whole food market किंवा farmer's market मध्ये मिळतात बघ जे brand ते आण . अगदी same भारतात करतो तस श्रीखंड होत त्यान . sour cream घालायची गरज पडत नाही .
भजी किंवा तत्सम काही नेणार असशीलच तर थाई पद्धतीच्या ब्रोकोली,वांग्याचे काप,बटाट्याचे काप अस cornflour आनि मैद्यात तळलेल असतात ना ( अजिबात मसाला ) न घालता ते ने . इथल्या लोकाना अतिशय आवडत ते .
तु खाल्ल्याच असशील thai hotel मध्ये


Lalu
Thursday, May 11, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा त्याला महाराष्ट्रीयन डीश हवी आहे.
पोह्याचे पापड जास्त झालेत काय? इकडे पाठवा. या दाक्षिणात्य, अमेरिकन आणि बल्गेरिअन लोकांना का म्हणून पोह्याचे पापड?
चाफा, आपल्या २० जणांच्या अन्दाजने करु नको श्रीखंड. उरलेलं डेझर्ट म्हणून खाणार असतील तर जास्त जाणार नाही. तुला खात बसावं लागेल आठवडाभर! ~D


Seema_
Thursday, May 11, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh!!! माझ्या लक्षातच आल नाही ते sorry लालु आणि चाफ़ा

Chafa
Thursday, May 11, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, मिनोती, आर्च, मृण्मयी, सीमा, लालू सगळ्यांचे आभार. पण काल मला सांगितलं की dessert आणू नको, आधीच २, ३ जणं आणणार आहेत. मला appetizer आणायला सांगितलाय. मला वाटतं मी Indian store मधून बाकरवड्या आणि frozen कचोरी नेईन. अजून काही सुचत असेल तर सांगा. Thank you!

Lalu
Thursday, May 11, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकरवड्या बर्‍या मिळतात का रे तिकडे? नाहीतर frozen समोसे ने तळून. कान्दाभजी येते का करता?
btw, मी काल झोपेत 'उरलेलं' डेझर्ट' लिहिलं आहे. :-( तो उरलेलं शब्द खरंतर पुढच्या वाक्याच्या सुरवातीला पाहिजे. कोणी ते वाक्य हार्श वाटून घेऊ नये. ~D



Priya
Thursday, May 11, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, लालु म्हणते तसे फ्रोजन सामोसे नेता येतील. इकडे दीप चे पंजाबी सामोसे मिळतात. खूप छान असतात. एका बॉक्समध्ये आठ असतात आणि त्याबरोबर हिरव्या चटणीची दोन पाकीटेही असतात. मी ते तळत नाही तर ओव्हनमध्ये बेक करते, आणि तसेही छान होतात. माझा तरी अनुभव छान आहे त्या सामोश्यांचा. शिवाय आकाराने चांगले मोठे असतात.

आणखी एक प्रयोग करायला सोपा म्हणजे गिट्स किंवा चितळ्यांच्या तयार मिक्सचा ढोकळा. नवर्‍याच्या ऑफीसात सगळे अभारतीय आहेत त्यामुळे मी जरा भीतभीतच ढोकळा दिला होता, पण आश्चर्य म्हणजे बहुतेकांना आवडला. तयार मिक्सचा केलास तर करायला अगदी सोपा. फक्त फोडणी, नारळ - कोथिंबीर ढोकळ्यावर न घालता वेगळी दिली होती मी. आणि ढोकळा करतानाच त्यात एक मिरची आणि थोडे आले वाटून घातले होते.


Moodi
Thursday, May 11, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा प्रियाच्या सर्व सुचना छान आहेत, फक्त गिट्स, चितळे किंवा किंवा अशोकाचा ढोकळा मिक्स खमण या नावाने मिळाला तर बघा. त्यात दोन प्रकार आहेत, एक साधा पांढरा किंचीत आंबट चव असलेला अन दुसरा खमण मात्र छान स्पॉंजी होतो. तो आवडेल सगळ्यांना. फोडणीत जर हिरवी, मिर्ची मिर्ची कटर मधुन काढुन टाकलीत तर छानच लागेल.

Ek_mulagi
Thursday, May 11, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय दुकानात patra मिळत, छान असतात चवीला,
microwave करायच २ मिनिट
गरमागरम apetizer तयार.


Milindaa
Thursday, May 11, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्याकडे चितळ्यांची 'मिक्स प्रॉडक्ट्स' मिळतात का ?

Lalu
Thursday, May 11, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे काय रे? बाकरवडी? त्यात शेव असते. 'मिक्स प्रॉडक्ट'! ~D

Chafa
Thursday, May 11, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थेंकू थेंकू. ठरलं तर मग, Indian store मधून सामोसे, बाकरवड्या, ढोकळा आणि पात्रा घेऊन जाईन. झाले मिक्सड snacks !

लालू, आमच्याकडे Indian stores मधे फ्रेश ढोकळा आणि चितळ्यांच्या बाकरवड्या मिळतात. म्हणजे त्याबरोबर शटर खाली ओढण्याचे इथले सुरस किस्से पण सांगता येतील लोकांना! :-O


Milindaa
Thursday, May 11, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं :-)
आता सुधारीत प्रश्न. तुमच्याकडे 'चितळे मिक्स' प्रॉडक्ट्स मिळतात का ? वरती प्रियाने उल्लेख केला आहे म्हणून विचारलं.

आणि आता कोणत्याच प्रॉडक्ट मध्ये चितळे मिक्स केलेले नसतात म्हणून सांगू नका


Ashwini
Thursday, May 11, 2006 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्या, तो ढोकळा फ्रेश पण mix चा असेल. :-) आमच्या इथल्या Indian Store मध्ये पण मिळतो.
बाकी ढोकळा आवडतो अमेरिकन लोकांना. मागच्या week-end ला माझ्या मुलाच्या birthday party साठी snacks म्हणून ढोकळा(घरी डाळ भिजवून केलेला :-) ) आणि समोसे ठेवले होते. सामोसे आवडतात हे माहिती होतं पण ढोकळ्याची खात्री नव्हती. पण ढोकळ्यावरच्या हिरव्या मिरचीसकट सगळ्यांनी खाल्ले. सामोसे मात्र Deep चे frozen आणून फक्त तळले होते.


Priya
Thursday, May 11, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, हो, चितळ्यांचे इडली मिक्स, ढोकळा मिक्स आणि गुलाब जामुन मिक्स मिळतात इकडे.

अश्विनी, लालु - दीप चे फ्रोजन सामोसे तळले नाही तरी चालतात. मी ते ओव्हनमध्ये बेकच करते. अर्थात, कधी तळले नाहीत त्यामुळे चवीत काही फरक पडत असला तर माहीत नाही. पण बेक केलेले आम्हाला तरी आवडतात.


Lalu
Thursday, May 11, 2006 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, ते तळले नाही तरी चालतात. थोडे कोरडे वाटतात, पण चालते. न तळलेले थंड झाल्यावर कसे होतात माहित नाही. तुमच्या कडे Trader Joe's आहे का? त्यांच्याकडे मश्रूम चे सारण भरलेले समोसे मिळतात ते पण बेक करुन छान लागतात. छोटे असतात पण जरा.

Manuswini
Thursday, May 11, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला साधारण १०-१२ लोकांसाठी party ठेवायची आहे.

मला कोणी सुचवेल का मेन course चे combination काय असावे.
लहान मुले कोणी नाहीत.
मी छोले चांगले करते पण त्याच्याबरोबर दुसरी कुठली भाजी का प्रकार चांगला जावु शकतो?

डाळ मधे मी विचार केला की दाल मखनी करावी पण जरा सुचत नाही की काय combo छान जमेल.
बहुतेक mixeD आहेत लोक, gujju, maravadi, punjabi and madru आहेत.

pls कोणी सुचवेल का?
appetizer काय असावे?
आणी पन्जाबी छोले असतील तर दुसरी भाजी काय असावी?
मी भटुरे बनवायचा विचार करतेय


Mrinmayee
Thursday, May 11, 2006 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, जेवणात छोले म्हंटले की बाकी पचायला सोपे पदार्थ ठेवलेले बरे:-) हा मेनु कसा वाटतो बघ्:
चिप्स आणि डिप किव्वा तळलेले पापड वर बारिक कांदा, हिरवी मिरची कोथिंबीर आणि लिंबाचा रस, चाट मसाला घालून
टोफ़ुच्या कापांना हिरवी चटणी लावून oven मधे जरासे बेक करून
कॉर्न दाणे बटर वर खमंग परतून, त्यात एखादा चटपटा मासाला घलून
जेवणात..
कांदा, टोमॅटो ची दही, दाण्याचा कूट घातलेली कोशिंबीर
तुझे बढिया छोले
pillsbussry biscuit लाटून केलेले भटुरे
एखादी पनीर, सिमला मिरचिची भाजी
तुपावर कान्दा लाल करून तांदुळ परतून केलेला भात
गोडाला आंबा कुल्फ़ी ( tinned mango pulp, evaporated milk आणि condenced milk वापरून केलेली, वर पिस्ता पावडर.
तसा खूप नाविन्यपूर्ण मेनू नाही हा पण झटपट होतो आणि कुणाची मदत नसेल तर सोपा वाटतो करायला.


Mrinmayee
Thursday, May 11, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

by the way मनुस्विनी, मी सगळे व्हेजिटेरिअन आहेत असं गृहित धरून चालले. तु non-veg करत असलीस तर मेथी-मलाई-चिकन करू शकतेस ह्या मेनु बरोबर. छोले आणि दालमखनी दोन्ही साधारण एकाच कॅटगिरीत जातात असं नाही का वाटत?

Ana
Thursday, May 11, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनि आजुन एक पर्याय देवु का
appetizer : ढोकळा, chips&dip
दहीपालक
दम आलु
छोले
टोमटो सार
जिरा rice ,... काजु,बेदाणे वगैरे घालुन(शाही)
पुर्‍या( बाकी इतर वेळ खाउ नाही,म्हणुन करु शकतेस
गोड म्हणुन, बरीक cut केलेली फ़ळ आणी वर ice cream


Manuswini
Thursday, May 11, 2006 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी आणि ana
thanks very much
अग मृण्मयी मला ही तेच वाटले की छोले आणि दाल्मखनी खुपच मसाल्याचे होणार
पण दाल म्हणुन काय करु हा प्रश्ण होता
सगळेच mostly veggie आहेत ग.
thaks again

Ana
टॉमेटोचे सार चालेल ना आणि ते आपण आपल्या मराठी Style ने बनवुन ना?

मला तु दही पालक ची recipe सांगतेस का ग?

तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आता मेनु ठेवते

जीरा ricE वर टॉमेटो सार जाईल ना?

थोडेसे लोक चोंखदळ आहेत जेवायला येणारी
आणि त्यांच्या बायका चांगल्या जेवण करतात. :-)


१. टॉमटोची सार recipe कुठे आहे एथे?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators