|
Moodi
| |
| Thursday, May 11, 2006 - 12:43 pm: |
| 
|
संत्र्याची बर्फी. साहित्य : २ वाटी संत्र्याचा गर बीया काढुन, १ वाटी खवा, सव्वा दोन वाटी साखर, थोडी पिठीसाखर, अर्धा चमचा पाकवलेली संत्रा साल थोडी भिजवुन. कृती : प्रथम खवा हाताने मोकळा करुन तो पॅन्मध्ये घालुन मंद गॅसवर परतावा त्यात संत्र्याचा गर व साखर पण घालावी. मिश्रण घट्ट होत आले की पिठीसाखर घालावी. आधी थोडी भिजवलेली संत्राची पाकवलेली साल मिक्सरमध्ये बारीक करुन त्या खवा मिश्रणात घालावी. मिश्रण घट्ट होवुन कडेने पुर्णच सुटले की तुप लावलेल्या ट्रे किंवा ताटात काढुन थापुन कोमटसर असतानाच वड्या पाडाव्यात.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 11, 2006 - 3:36 pm: |
| 
|
साखरेचे क्युब्ज असतील तर ते सन्त्री सोलण्यापुर्वीच, संत्र्यावर घासुन घ्यायचे आणि मग त्याची पिठीसाखर करुन ती मिश्रण घोटताना घालायची, त्याने छान स्वाद येतो.
|
Amayach
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:16 pm: |
| 
|
मूडी, रेसिपी छान वाटते आहे. सन्त्रा बर्फ़ी म्हणजे नागपुरची खासियत. माज़ा कडे रिकोटा चीज आणी सन्त्री देखिल आहेत करुन पाहते आणी कळवते तुला. रीकोटा चीज साठी काही खास टिप्स आहेत का? आणि पाकवलेले साल नाहीत तर चालेल का?
|
Moodi
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:26 pm: |
| 
|
अमया ते रीकोटा चीज जरा आधीच कढईत कोरडेच परतुन घे. जरा वेळ बाजूला ठेव मग परत ते साखर अन संत्राच्या गरासकट परतुन वड्या कर. रीकोटात थोडे पाणी असते त्यामुळे तुला ते खुप वेळ परतत बसावे लागेल. कारण मग साखर अन रसामुळे पाणी सुटेल. संत्र्याची साल घातली पाहिजेच असे काही नाही.
|
Amayach
| |
| Friday, May 12, 2006 - 1:48 pm: |
| 
|
मूडी, सन्त्रा बर्फ़ी सहीच ज़ाली. फ़क्त मी थोडीच केलेली पहील्यान्दाच करत होते म्हणुन तर नवर्यासाठी परत करावी लागणार आहे. Thanks for the nice Recipe. 'Zhali'cha z kasa lihayacha??
|
Moodi
| |
| Friday, May 12, 2006 - 1:52 pm: |
| 
|
अरे वा! मला नाही ठेवलीस का ग? आता तुला अंदाज आलाच असेल. झाली असे लिही jhaalee . चिक्कुची पण करता येईल अशी, जर तिथे मिळत असेल तर. thanks ग feedback लगेच दिल्याबद्दल. 
|
मूडी मी काल बनवली सन्त्रा बर्फ़ी..पण थोडि कडू लागत आहे.. सन्त्र्यचा गर काढताना त्याचि स्कीन सुद्धा काढावि का? कारण मी गरातल्या बिया काढून घेतल्या आनि स्किन तशिच ठेवलि, आनि हो चान्गला सुवास यावा म्हनून त्यात सन्त्र्याचे रिन्ड ग्रेट करून घातल...म्हनून ति थोडि कडवट लागत आहे...बाकि बर्फ़ी झालि सुरेख... आभार रूपाली
|
Mepunekar
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:37 am: |
| 
|
मूडी, पाकवलेली सन्त्र्याची साल म्हणजे काय ग?, ती कशी करतात? धन्यवाद!
|
Moodi
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:07 am: |
| 
|
मीपूणेकर इथे बघ मी लिहीलीय. ती केक अन पुडिंग्ज मध्ये पण घालतात. /hitguj/messages/103383/109081.html?1140022549 रुपाली शक्यतो स्कीन काढावीच. बीया तर अजीबात ठेऊ नयेत. आणि संत्र्याचे साल काढतांना संत्रे आधी धुवुन, किचन पेपरमध्ये धरुन फोडी वेगळ्या काढाव्यात, वरच्या सालीचा कडवटपणा लागु शकतो हाताला.
|
Mepunekar
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:24 pm: |
| 
|
धन्यवाद मूडी, मी नक्की करुन बघेन आता
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|