Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दही मिरची.

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » दही मिरची. « Previous Next »

Sampada_oke
Thursday, May 04, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आजीच्या पद्धतीची दही मिरचीची कृती इथे आर्चच्या मागणीवरून देतेय. नलिनीकडे गेलेले असताना तिने मला फ़क्त हाच पदार्थ करायची परवानगी दिली होती. पण आता कळलंय की त्याला सतत मागणी असते.:-)

शक्यतो गडद हिरव्या मिरच्या ह्यात वापराव्यात. एव्हढे तिखट नको असेल तर पोपटी रंगाच्या मिरच्या घ्याव्यात. त्या गॅसवर भाजून घ्याव्यात, हॉटप्लेट असल्यास स्वयंपाकाच्या जड भांड्याखाली दाबून ठेवून भाजाव्यात. त्यांची साल पूर्ण काळी होऊ द्यावी. गरम असतानाच मीठ आणि जीरेपूड घालून चुराव्यात. त्यात आंबट दही घालून, आवश्यकतेनुसार मीठ आणि चवीकरीता थोडीशी साखर घालावी.कोथिंबीर बारीक चिरून घालावी. पोळीबरोबर खायला अगदी मस्त लागते. किंवा आमटी भाताबरोबर खाल्ले की बाकी काहीही नसले तरी चालते.:-)


Dineshvs
Thursday, May 04, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे रे तुम्ही लोक मिरच्या खाता ?
माझ्याघरी आढ्याला मिरची टांगुन, आमटी तिखट झाली म्हणायची पद्धत आहे.


Pendhya
Tuesday, February 07, 2006 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आवडता एक झटपट होणारा प्रकार...

दह्यातली मिरची

२-४ मिरच्या शेगडीवर भाजुन घ्याव्या.मग, देठं काढून, दह्यात मिसळायच्या. चवीला थोडं मीठ आणी थोडीशी साखर.
आणी खायला....... TOP

तयार करायला ही सोपे आणी मुख्य म्हणजे,..... लिहायला ही सोपे.




S1sd
Saturday, April 21, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२५० ग्राम मिरच्या
२५० ग्राम ताक
मिठ चवीनुसार
मिरच्याचे पोट फ़ाडावे.
ताकात मिठ घालुन.
त्यात मिरच्या रात्रभर भिजवत ठेवाव्या.
ताकातुन कढुन उन्हात वाळवाव्या.
सुकयाख़ड्ख़डित होई पर्यन्त.
आणि बरणीत भरुन ठेवाव्यात.
ख़ाते वेळी तळाव्यात.
वरणभाता सोबत फ़ार छान लागतात.


Vishee
Thursday, September 06, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदाने दिलेल्या कृतीत लसुण चुरडून किंवा बारिक किसुन पण छान लागतं. मी साखर नाही घालत ह्यात.

Amruta
Friday, September 07, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वर संपदाने सांगितलेल्या दही मिरचीला आमच्याकडे तिखटि म्हणतात.
आणि त्यात हिंग पण घालाव. एकदम सही लागत.
आज तर मी करणारच तिखटि. :-)


Sashal
Friday, September 07, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण elecric coil असेल तर मिरच्या कशा भाजणार ..

माझा नवरा कोकणातला आहे तिकडे ह्याला 'तिकमिटलं' म्हणतात बहुतेक ..


Akhi
Wednesday, November 14, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्ग मिरची कोथिम्बीर साखर आणी मीठ दही

तेलामधे मोहरी हिन्गाची फोडणी करावी मग त्यात भरपुर मिरच्या टाकाव्या. हे सर्व थंड झाल्यावर त्यात दही आणी कोथिम्बीर टाकवी. चवी नुसार सखार मीठ घालणे.


Cutepraj
Tuesday, April 29, 2008 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लसणीची तिखटी

एकदम सोप्पी पद्धत

साहित्य ८-१० लसणीच्या पाकळ्या सोलुन, दही, लाल तिखट, चवीपुरते मीठ
लसणीच्या पाकळ्या चेचुन घ्याव्यात. त्याच्यात दही, लाल तिखट, मीठ घालुन एकत्र करावे.

तोन्डि लावायला आमटी भाताबरोबर मस्त लागते....

कच्ची लसुण पण खाल्ली जाते,...



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators